उपराष्ट्रपती
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पद
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावर आधारलेले
निवडणूक अप्रत्यक्षपणे होते
निवडणुकीत संसदेच्या दोन्ही गृहातील संपूर्ण सदस्य भाग घेतात (निर्वाचित तसेच नामनिर्देशित देखील).
राज्य विधानसभांचे सदस्य निवडणुकीत भाग घेत नाहीत
राष्ट्रपतींची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधीत्व पद्धतीने एकल संक्रमनिय पद्धतीने होते
निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही गृहाची संयुक्त पद्धतीची तरतूद होती जी 11 वी दुरुस्तीने काढून टाकण्यात आली.
उपराष्ट्रपतीसाठी पात्रता
भारताचा नागरिक
वय 35 किंवा या पेक्षा जास्त
राज्यसभा सदस्य निवडून येण्यास पात्र असावा.
लाभाचे पद धारण केलेले नसावे
नामांकनासाठी 20 मतदारांनी नाव सुचवले पाहिजे व 20 मतदारांनी अनुमोदन दिले पाहिजे
कार्यकाळ
पाच वर्षे
राजीनामा राष्ट्रपतीला उद्देशून देऊ शकतो
गृहातील प्रभावी बहूमताने त्याला काढता येते.
त्याला काढण्यासाठी महाभियोगा सारखी पद्धत नसते
इतर
राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.
राष्ट्रपती नसल्यास राष्ट्रपतींच्या जागी कार्य करतो (जास्तीत जास्त सहा महिने)
त्याला वेतन राज्यसभेचे अध्यक्ष म्हणूनच दिले जाते.
सबंधित कलमे
कलम 63 – भारताचा उपराष्ट्रपती
कलम 64 – उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो
कलम 65 – प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य करणे
कलम 66 – उपराष्ट्रपतीची निवडणूक
कलम 67 – कार्यकाळ
कलम 68 – पद रिक्त झाल्यास निवडणूक घेण्याचा कालावधी
कलम 69 – शपथ
कलम 70 – इतर आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपती चे कार्य करणे
कलम 71 – उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित बाबी