छत्रपती शाहू महाराज -chatrapati shahu maharaj

छत्रपती शाहू महाराज



·         जन्म—–26 जून 1874 कोल्हापूर, लक्ष्मी विलास पॅलेस
·         मृत्यू—-6 मे 1922 मुंबई, पन्हाळा अतिथिगृह
·         कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या देहांता नंतर कोल्हापूर संस्थानास कोणीही वारस नव्हते आशा वेळी चौथ्या शिवाजी ची पत्नी आनंदीबाई यांनी कागल च्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव घाटगे यांचा ज्येष्ठ मुलगा यशवंतराव यास 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले.

·         दत्तकविधान 


           17 मार्च 1884 रोजी कोल्हापूर च्या राणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले.

·         शाहू महाराजांचे सुरूवातीचे शिक्षक—-

            श्री कृष्णाजी भिकाजी गोखले, हरिपंत गोखले, फिटझरीलाल.

·         प्राथमिक शिक्षण

                प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले.
·         त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे आरक्षणाचे जनक म्हणून संबोधले जाते. त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टींचा पाया घातला. त्यांनी महाराष्ट्रात अनेक वसतिगृहांची निर्मिती केली. त्यांनी समाजाच्या अनेक क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली.

·         आई—

           जनक माता राधाबाईसाहेब त्यांच्या धर्मामाता (ज्यांनी त्यांना दत्तक घेतले होते. ) आनंदीबाईसाहेब.  
·         राजर्षि शाहू महाराजांना 1885 साली राजकोट येथील राजकुमार कॉलेजात पाठवण्यात आले.

·         निधंनवार्ता—

            महाराज राजकोट येथे शिक्षण घेत असतानाच त्यांचे वडील 1886 साली मरण पावले.
·         1890 ते 1894 या  या काळात महाराजांचे शिक्षण पूर्ण झाले. महाराजांची इंग्रजी भाषा, राज्यशास्त्र, जगाचा इतिहास इत्यादि विषयांचा अभ्यास केला होता.
·        

विवाह—- 

          राजर्षि शाहू महाराजांचा विवाह 1 एप्रिल 1891 साली झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई असे आहे विवाहच्या वेळी लक्ष्मीबाई यांचे वय केवळ 11 वर्षे एवढे होते.

·         राज्याभिषेक

             छत्रपती महाराजांचा राज्यारोहण समारंभ 2 एप्रिल 1894 रोजी झाली त्या दिवसापासून त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार आपल्या हाती घेतला. पुढे त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूर संस्थानात अनेक चांगली कामे घडून आली. समाजात अनेक सुधारणा घडून आल्या.

शाहू महाराजांनी राज्यकारभारात खालीलप्रमाणे सुधारणा केल्या होत्या.

·         राज्प्रातींनिधी मंडळाला दिलेले कारभाराचे आधिकार काढून घेऊन त्यांनी त्या ठिकाणी सल्लागार मंडल स्थापन केले.
·         सल्लागार मंडळात 13 एप्रिल 1894 रोजी रघुनाथ सबनीस याची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली.
·         आपल्या राज्यात चहा कॉफी ची लागवड केली.
·         त्यांनी प्रथम आपल्या राज्यात कृषि जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. तसेच बाहेर देशात फिरायला गेले असता त्यांनी कालव्यांचे जाळे पाहिले ज्या द्वारे शेतीस पाणीपुरवठा केला जात असे. ते पाहून त्यांनी आपल्या राज्यात देखील कलव्यांची निर्मिती केली.
·         त्यांनी कोल्हापुरात शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ 1895 साली स्थापन केली.
·         आपल्या राज्यात प्लेग ची साथ पसरली होती तेव्हा त्यांनी जनतेतील लसी बदलचे गैरसमज दूर करून देण्यासाठी स्वतः लस टोचून घेतली.
·         आज शासनाने अनेक ठिकाणी गरीबांना अन्न धान्य मिळावे म्हणून विविध ठिकाणी स्वस्त धान्याचे दुकाने स्थापन करत आहे परंतु याचा पाया राजर्षि शाहू महाराजांनी घातला आहे. त्यांनी दुष्काळ जन्य परिस्थितीत गरीबांना अन्न-धान्याचा पुरवठा करण्यासाठी स्वस्त अन्न-धान्यांची दुकाने स्थापन केली.
·         त्यांनी उद्योग धंद्याना प्रोत्साहान देण्यासाठी 27 सेप्टेंबर 1906 साली शाहू छत्रपती स्पीनिंग आणि विव्हिंग मिलची स्थापना केली.
·         1907 मध्ये सहकारी तत्वावर कापड गिरणीची सुरुवात केली.
·         1907 साली कोल्हापुरातील भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले. 1908 मध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. त्यास महारांनी लक्ष्मीबाई असे नाव देण्यात आले. 
·         त्यांनी सर्वप्रथम जातिभेद नष्ट करणारी सनद काढली. कोल्हापुरातील जातिभेद नष्ट केला.
·         1902 साली राजर्षि शाहू महाराजांनी पाटबंधारे विषयक धोरण जाहिर केले.
·         1912-13 मध्ये त्यांनी किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इंस्टीट्यूट ची स्थापना केली.  
·         ए-लॉरेन्स हे रोमन कथेलिक जातीचे धीपाड पहिलवान महाराजांचे अंगरक्षक होते.
·         बलोपासनासाठी त्यांनी जुन्या राजवाड्यात आखाडा बांधला.
·         तंबाखूच्या व्यापारास उत्तेजन देण्यासाठी त्यांनी जयसिंगपूर वसाहत स्थापन केली.
·         1895 साली त्यांनी प्रसिद्ध मोतीबाग तालिम बांधली.
·         मल्लाना गदा देण्याची प्रथा शाहू माहाराजांनी सुरू केली. इमामबक्ष यास शाहू महाराजांनी पहिली गदा देली.
·         त्या काळी अस्पृश्यतेमुळे पाहिलवानास इतर पाहिलवाना सोबत कुस्ती खेळता येत नसे. त्यामुळे महाराज अस्पृश्य पहिलवानास सूर्यवंशी, चांभारांना सरदार भांग्याना पंडित म्हणून संबोधत असे. 

महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रात घडवून आणलेली प्रगती

·         त्यांनी मजूर, कारागीर, शेतकरी यासाठी रात्रीची शाळा सुरू केली.
·         त्यांनी आपल्या महसुलापैकी 6 टक्के खर्च शिक्षणावर करण्याचे ठरवले.
·         1913 साली महाराजांनी निदान प्रत्यक गावात एक तरी शाळा असावी असा आदेश काढला. त्यांनी पगारी शिक्षकांची नेमणूक करावयास सुरुवात केली.
·         1912 साली त्यांनी मराठी ब्रदरहुड संस्थेला हायस्कूल काढण्यासाठी 1500 रुपये ची देणगी दिली.
·         25 जुलै 1917 साली त्यांनी शाळेतील फी माफीची घोषणा केली.
·         21 नोव्हेंबर 1918 साली त्यांनी प्राथमिक शिक्षणाची सक्ती केली.
·         चांगले शिक्षक निवडण्यासाठी त्यांनी जून 1918 पासून शिक्षकासाठी परीक्षा सुरू केली.
·         त्यांनी 100 रु पेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या व्यक्तीवर शिक्षण कर लावण्यास सुरुवात केली.
वेदोक्त प्रकरण—
·        शाहू महाराजांच्या काळात सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजेच वेदोक्त प्रकरण होय. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते.
·        शाहू महाराज धार्मिक प्रवृत्तीचे होते. ते अनेक धार्मिक विधी वेळच्या वेळी पार पाडीत असत. ते धार्मिक विधी पार पाडण्यासाठी ब्राम्हनांची मदत घेत असत.
·        महाराज दररोज कोल्हापूर च्या काठी असलेली पंचगंगा नदी येथे स्नान करण्यासाठी जात असत. शाहू महाराज स्नान करत असतांना एक ब्राम्हण मंत्रे म्हणीत असत. पण एके दिवशी तो ब्राम्हण स्नान न करताच मंत्राचा उच्चार करीत होता अशा वेळी महाराजांनी त्यास विचारले की आपण स्नान न करता मंत्राचा उच्चार कसे करत आहात. त्या वेळी त्या ब्राम्हणाने पुराणोक्त मंत्र म्हणण्यासाठी स्ंनाना ची आवश्यकता नसते असे म्हणाला. शुद्राला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात असे तो म्हणाला.
·        त्या ब्राम्हनाचे बोलणे ऐकून शाहू महाराजास आश्चर्य झाले. क्षत्रीय असलेल्या व्यक्तीस शूद्र म्हणून हीनवावे हे शाहू महाराजांना आवडले नाही. आपले सर्व विधी वेदोक्त मंत्राने झाले पाहीजे असे शाहू महाराजांनी त्या भटजीस संगितले. ही घटना नोव्हेंबर 1899 ला घडली ही घटना वेदोक्त प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे.
·        हा माणूस आपला नोकर असून असा निर्लज्ज पणे वागत आहे हे पाहून महाराजास खूप दुख झाले. ऑक्टोबर 1901 मध्ये कोल्हापूर संस्थानातील राजपुरोहित अप्पासाहेब राजोपाध्याय यांनी दरबारातील धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिला. तेव्हा महाराजांनी राज्योपाध्याय यांना राज्यसेवेसाठी दिलेले 30 हजाराचे इनाम जप्त केले.
·        1901 मध्ये टिळकांनी केसरी मध्ये वेदोक्त खूळ या शीर्षकाखाली दोन अग्रलेख लिहिले.
·        वेदोक्त प्रकरण पेटविणारे दोन व्यक्ति कोणते?–>लोकमान्य टिळक केसरीद्वारे व प्रो विष्णु गोविंद विजापूरकर ग्रंथमालेदवारे. टिळकांनी ब्राम्हंनांची बाजू उचलून धरली होती. 6 मे 1902 साली ब्राम्हण प्रभुत्व मोडण्यासाठी शाहू महाराजांनी ब्राम्हंनांच्या वतनदाऱया रद्द केल्या. याच वेळी राजोपाध्याय यास नोकरीवरून काढून टाकले.
सत्यशोधक समाजाची स्थापना
·        शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ब्राम्हण विरोधी चळवळीचे महत्व ओळखून 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
·        सत्यशोधक समाजात अध्यक्ष—भाष्करराव जाधव, उपाध्यक्ष—आनासाहेब लठ्ठे, कार्यवाह —हरिभावू चव्हाण, सर्वाधिकारी—म. ग. डोंगरे, कोल्हापूर प्रमुख—बाबुराव कदम असे महत्वपूर्ण व्यक्ति होते.
कुळकर्णी वतनांचा शेवट
·        पूर्वी पाटलास मदत करण्यासाठी कुळकर्णी असत. ते गावाच्या जमीनिंचा हिसोब ठेवत असत. परंतु ते गरिबांची लुबाडणूक करत असत ते शेतजमणीच्या संदर्भात खोट्या नोंदी ठेवत असत.
·        मुकुंदाराव पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत ग्रंथात कुळकर्ण्याच्या खोट्या पृवृत्तीवर प्रकाश टाकला आहे. अशा कुळकर्ण्यांचा अन्याय संपुष्टात आणण्यासाठी शाहू महाराजांनी 15 सेप्टेंबर 1918 रोजी कुळकर्णी वतणे नष्ट केली.
शाहू महाराजांची इतर महत्वांची कार्ये
·         आपली प्रजा किमान चौथी पास तरी शिकलेली असावी अशी शाहू महाराजांची इच्छा होती. त्या काळी शिक्षण क्षेत्रावर ब्राम्हण लोकांचा अधिकार होता, शिक्षण ही ब्राम्हण लोकांची मक्तेदारी होती. शाहू महाराजांनी 1916 साली शिक्षण सक्तीचे करणारा कायदा केला.
·         शाहू महाराजांनी 1913 साली प्रत्यक गावात एक तरी शाळा असावी अशी घोषणा केली.
·         शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सार्वजनिक पाणवठे, मंदिरे खालच्या जातीतील लोकांसाठी खुली केली.
·         कोल्हापूर च्या पश्चिमेस असलेल्या 55 किमी अंतरावर दाजीपूरजवळ भोगावती नदीला बंधारा घालून जमनिला पाणी पुरवठा करण्यासाठी 1907 मध्ये योजना आखण्यात आली. 1908 मध्ये धरणाचे बांधकाम करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यास महाराणी लक्ष्मीबाई असे नाव देण्यात आले. श्रीयमंत बापूसाहेब महाराज यांचे नियंत्रण व देखरेखीखाली व इंजिनियर सबनीस यांच्या मार्गदर्शना खाली काम सुरू करण्यात आले. अक्कसाहेबांचा विवाह झालं तेव्हा धरणाच्या शेजारी राधानगरी हे गाव वसवण्यात आले.
·         जुलै 1917 मध्ये विधवांच्या पुनर्विवाहस कायदेशीर करण्यात आले. 12 जुलै 1919 रोजी कोल्हापुरात विवाहसबंधि कायदा पास करण्यात आला. या कायद्यात पुढील गोष्टी मान्य करण्यात आल्या. –18 वर्षे पूर्ण झालेल्या स्त्री ला विवाहासाठी पिता अथवा पालकांची संमती राहणार नाही. —जाती निर्बंध न पाळता स्त्री कोणत्याही जाती धर्मातील व्यक्तीशी विवाह करू शकते. –विवाहसमयी स्त्रीचे वय 14 वर्षे व पुरुषाचे वय 18 वर्षे किमान असले पाहिजे.
·         1913 मध्ये कोल्हापूर येथे चित्रपट प्रदर्शनासाठी सिनेमागृह स्थापन केले.
·         1907 मध्ये शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना केली व त्या वसतीगृहास मिस क्लार्क या यूरोपियन विदुषीचे नाव दिले. मिस क्लार्क यांनी अस्पृश उध्दारासाठी अनेक कार्ये केली आहेत.
·         त्या काळी समाजात अनेक रूढी व चालीरीत होत्या. अनेक छोट्या जातीस गुन्हेगारी जाती म्हणून ओळखले जाई. आशा जातींच्या लोकांना दररोज पोलिसस्टेशन वर हजेरी द्यावी लागत असे. ही पद्धत बंद व्हाही म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी 27 जुलै 1918 साली एक आदेश काढून महार, मांग, रामोशी व बेरड या जातीतील लोकांची हजेरी पद्धत बंद केली.  
·         शाहू महाराजांनी तलाठी पदावर अस्पृश्यांना प्राधान्य द्यावे असाही 26 ऑगस्ट 1919 रोजी एक आदेश काढला. 1920 साली शाहूणी शहरातील पोलिस गेटवर सोळा महारांची नेमणूक केली.
·         शाहू महाराजांनी 26 जून 1902 या आपल्या जन्मदिनी मागास वर्गीयांना सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण जाहिर केले.
मानगाव परिषद —
      इतिहास प्रसिद्ध मानगाव परिषद 20 व 21 मार्च 1920 ला भरविण्यात आली होती.  या परिषदेचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते. या परिषदेचे प्रमुख पाहुणे छत्रपती शाहू महाराज हे होते. 21 मार्चला परिषदेची सुरुवात दुपारी 5 वाजेला सुरू झाली. दादासाहेब राजेसाहेब हे स्वागत अध्यक्ष होते त्यांनी स्वागत पर भाषण केले. अशा वेळी शाहू महाराजांनी स्पृश्यांना संबोधून भाषण केले. ते म्हणाले “माझ्या दलित बांधवानो तुम्ही आपला पुढारी शोधून काढला आहे, बाबासाहेब आंबेडकर हे एकना एक दिवस तुमचा उद्धार केल्या शिवाय रहाणार नाहीत. ते तुमचेच पुढारी नसून एक दिवस ते अख्या हिंदुस्तानाचे पुढारी होतील.” छत्रपती शाहू महाराजांचे हे बोल अखेर खरे ठरले. बाबासाहेबांनी अस्पृश्यांचा उद्धार केला होता.
शाहू महाराजांनी स्थापन केलेली वसतिगृहे
·         व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग—————18 एप्रिल 1901.
·         दिगंबर जैन बोर्डिंग————————1901.
·         मुस्लिम वसतिगृह————————–15 नोव्हेंबर 1906.
·         वीरशैव लिंगायत वसतिगृह—————1907.
·         अस्पृश्यसाठी मिस क्लार्क वसतिगृह—–14 एप्रिल 1908.
·         सोनार समाजासाठी वसतिगृह————-1908.
·         शिंप्यासाठी नामदेव वसतिगृह————1911.
·         पांचाळ समाजासाठी वसतिगृह————1912.
·         सारस्वत ब्राम्हंनासाठी वसतिगृह———-1915.
·         ख्रिस्ती वसतिगृह—————————1915.
·         कोष्ठी समाज वसतिगृह——————-1921.
·         सुतार समाजासाठी वसतिगृह————–1921.
     
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment