सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती :–
मूळच्या रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या सर्वात द्क्षिणेकडील जिल्हा असून त्याच्या पूर्वेला कोल्हापूर जिल्हा आहे. दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्या आहे व पश्चिमेस अरबी समुद्र आहे. या जिल्ह्यास 120 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. या जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहे. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून शुक नदी वाहते. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5207 चौकीमी एवढे आहे. या जिल्ह्याच्या
दक्षिणेस तेरेखील नदी आहे.
दक्षिणेस तेरेखील नदी आहे.
या जिल्ह्यातील डोंगराळ भागात वानरमारे जमात आहे तसेच धनगराची मोठी वस्ती देखील येथे आहे. जिल्ह्याच्या किनारी भागापासून जसे जसे पूर्वेकडे जावे तसे तसे समुद्रसपाटी पासून जमिनीची ऊंची वाढत जाते. हवामान सम, उष्ण व दमट आहे. जसे जसे पूर्वेकडे जावे तसे तसे हवामान विषम व कोरडे होत जाते. एकूण क्षेत्रफळा पैकी 49.49 क्षेत्र वनव्याप्त आहे.
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती :–
धुळे जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 ला करण्यात आली. एकूण लोकसंख्येशी आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत येथे आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. म्हणून या जिल्ह्यास आदिवासी जिल्हा असे म्हणतात. या जिल्ह्याच्या पूर्वेस मध्येप्रदेश राज्य व धुळे जिल्हा आहे. पश्चिमेस गुजरात राज्य आहे. तसेच उत्तरेस गुजरात व मध्यप्रदेश राज्य पसरलेले आहे. या जिल्ह्याच्या दक्षिणेस धुळे जिल्ह्याचा भाग येतो. या जिल्ह्यात तालुक्यांची संख्या एकूण चार आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या एकूण 16 लाख एवढी आहे. येथील आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण 69.3 टक्के एवढे आहे.
जिल्ह्याच्या उत्तर भागात सातपुडा पर्वत रांग पसरलेली आहे. तर जिल्ह्याच्या ईशान्येस तोरणमाळ डोंगररांग पसरलेली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात तापी नदीचे खोरे पसरलेले आहे. हा प्रदेश समुद्र सपाटीपासून कमी उंचीचा असून याची ऊंची 300 मीटर च्या आसपास आहे तसेच हा भाग सपाट आहे. येथील हवामानाचा विचार केला असता हवामान उष्ण व कोरडे आहे. नर्मदा नदी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून पूर्व पश्चिम दिशेने वाहाते.
जालना जिल्ह्याची निर्मिती :–
औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन 1 मे 1981 रोजी जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. या जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव आहे. ईशान्येस व काहीसा पूर्वेस बुलढाणा आहे. पूर्वेस परभणी जिल्हा तर दक्षिणेस बीड जिल्हा आहे. औरंगाबाद जिल्हा जालना ज्जिल्हयाच्या पश्चिमेस आहे. या जिल्हयाचे एकूण क्षेत्रफळ 7718 चौ किमी एवढे आहे. या जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. भिल्ल, लमान कैकाडी इत्यादि जमाती या जिल्ह्यात आढळतात. या जिल्ह्याचे हवामान उष्ण, विषम व कोरडे आहे. जिल्ह्यात एकूण भौगोलिक प्रदेशाच्या 0.84 टक्के वने आहेत त्याचे क्षेत्रफळ एकूण 65 चौ किमी एवढे आहे. जालना जिल्ह्यातील महिको हे संकरीत बियाणे प्रसिद्ध आहे.
लातूर जिल्ह्याची निर्मिती :–
उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 16 आगस्ट 1982 रोजी लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या जिल्ह्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस उस्मानाबाद आहे. या जिल्ह्याच्या वायव्येस बीड जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस नांदेड तर आग्नेय दिशेकडे कर्नाटक आहे. . जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7157 चौ किमी आहे.
या जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या दहा एवढी आहे. जिल्ह्याचा पश्चिम व मध्यभाग बालाघाट डोंगररांगांनी व्यापलेला आहे. मांजरा ही लातूर जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र लातूर जिल्ह्यात आहे. ते एकूण जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या 0.07 टक्के एवढे आहे.
हिंगोली जिल्ह्याची निर्मिती :—
परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 मे 1999 रोजी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 4827 चौ किमी एवढे आहे. या जिल्ह्यात तालुक्यांची संख्या पाच एवढी आहे. या जिल्हयाच्या उत्तर भागात अजिंठा डोंगररांग पसरलेली आहे. या डोंगररांगाना हिंगोली टेकड्या म्हणून ओळखले जाते. जिल्ह्याच्या उत्तर सीमावर्ती भागातून पैनगंगा नदी वाहते. हिंगोली जिल्ह्याचा दक्षिण भाग पूर्णा, आसणा व कयाधू या नद्यांच्या खोर्यानी व्यापलेला आहे. हा प्रदेश मैदानी आहे.
वाशिम जिल्ह्याची निर्मिती :–
अकोला जिल्हयाचे विभाजन करण्यात येऊन 1 जुलै 1998 ला वाशीम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.. वाशिम हा विदर्भातील दहावा जिल्हा आहे. वाशिम जिल्ह्याच्या उत्तरेस अकोला व अमरावती हे जिल्हे आहेत. दक्षिणेस यवतमाळ व हिंगोली हे जिल्हे आहेत. तर पश्चिमेस बुलढाणा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या सहा आहे. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 4898 चौ किमी एवढे आहे. आंध व गोंड यांसारख्या आदिवासी जमाती येथे रहातात.
जिल्ह्याचा उत्तर मध्यभाग अजिंठ्याच्या डोंगररांगांनी व्यापालीला आहे. हा जिल्हा समुद्र सपाटीपासून 450 मीटर उंचीवर वसलेला आहे. या जिल्ह्याचे हवामान अत्यंत विषम स्वरूपाचे आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पश्चिम पूर्व वहाणारी पैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती :–
26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपुर जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन गडचिरोली जिल्हयाची निर्मिती करण्यात आली. गडचिरोली हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडे वसलेला जिल्हा आहे. याच्या पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे. तर काहीसा दक्षिणेस व खालच्या भागात तेलंगाणा राज्य आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 14412 चौ किमी एवढे आहे.
लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला असता राज्यातील कोणत्याही जिल्हयापेक्षा या जिल्ह्याची घनता सर्वात कमी आहे (74 प्रती चौ किमी ). जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत.एकूण लोकसंख्येशी आदिवाशी लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करता या जिल्ह्याचा राज्यात दूसरा क्रमांक लागतो.
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती :–
भंडारा जिल्ह्याचे विभाजण करण्यात येऊन 1 मे 1999 ला गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश तर पूर्वेस छत्तीसगड आणि दक्षिणेस गडचिरोली आहे. व पश्चिमेस भंडारा जिल्हा आहे. राज्याचे एकूण क्षेत्रफळ 5234 चौ किमी एवढे आहे. जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. येथील पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. वैनगंगा नदी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरुण वाहाते.