भारतातील निवडणुका
कॅबिनेट मिशन भारतात आले त्यांच्या प्लॅन नुसार सविनधान सभेची रचना पुढील प्रमाणे करण्यात आली
· सविधान सभेत एकूण 389 सदस्य असतील
· त्यापैकि 292 सदसी ब्रिटिश प्रांटाकडून निवडून दिले जातील
· 4 सदस्य चीफ कमिशनर च्या प्रांटाकडून निवडून दिले जातील (दिल्ली, अजमेर , मारवाड, कुर्ग, बलुचिस्तान )
· 93 सदस्य भारतीय संस्थानिकांचे प्रतींनिधी असतील
त्या काली प्रत्यक 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असेल असे घोषित करण्यात आले. मतदात प्रौढ मतदान पद्धतीने न घेता निवडणुका अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रतिंनिधीत्वाच्या पद्धतीने घेण्याचे ठरले
जागांचे विभाजन तीन प्रमुख गटामद्धे करण्यात आले शीख, मुस्लिम, सर्वसाधारण
ब्रिटिश प्रांताना देण्यात आलेल्या जागासाठी (296) निवडणूका जुलै-ऑगस्ट 1846 ला घेण्यात आल्या
जुलै – ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या व त्या निवडणुकांचे परिणाम
· मुस्लिम लीग ने 78 जागा पैकी 73 जागा मिळवल्या
· 8 जागा अपक्षांना मिळाल्या
· यूनियनिस्ट पार्टी ला एक जागा मिळाली
· यूनियनिस्ट मुस्लिम ला एक जागा मिळाली
· यूनियनिस्ट शेडुल्ड कास्ट ला एक जागा मिळाली
· कृषक प्रजा पार्टी ला एक जागा मिळाली
· शेडुल्ड कास्ट फेडरेशन ला एक जागा मिळाली
संस्थानिकांच्या 93 जागा भरल्या जाऊ शकल्या नाही.
निवडणूक आयोगा विषयी थोडक्यात
भारताने लोकशाही चा स्वीकार केला आहे. लोकशाहीत देशाचे नागरिक आपला प्रतींनिधी मतदाना मार्फत निवडून देतात.
भारतीय राज्यघटनेमधील कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. निवडणूक आयोग केंद्र व राज्यासाठी सामायिकरित्या कार्य करते.
निवडणूक आयोगाची कार्य
· संसदेच्या व प्रत्यक राज्य विधानमंडळाच्या सर्व निवडणुका पार पाडणे व त्यासाठी मतदार यादी तयार करणे
· राष्ट्रपति व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका पार पाडणे.
· लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, व विधानपरिषद यांच्या निवडणूका पार पाडणे
· मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगाचा अध्यक्ष असतो
· निवडणूक आयुक्त व प्रादेशिक आयुक्त यांच्या सेवाशर्ती राष्ट्रपति निर्धारित करतात
· मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपति मार्फत केली जाते.
निवडणुकी सबंधित कलमे
· कलम 325 नुसार संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या आथवा राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या निवडणुकीसाठी प्रत्यक प्रदेशीक मतदार संघासाठी एकाच सर्वसाधारण यादी असेल
· कलम 326 नुसार निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीनुसार होतात
· कलम 327 नुसार संसदेला संसदेच्या व राज्याविधान मंडळाच्या कोणत्याही सभागृहाबाबत सर्व बाबीविषयि वेळोवेळी कायद्या द्वारे तरतूद करण्याचा आधिकार असेल .
· कलम 329 या कलमामध्ये निवडणूकी विषयक बाबी मध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप टाळण्यात आला आहे.
61 व्या घटना दुरूस्ती कायदा 1988 अन्वये मतदानासाठीची वयोमार्याद 21 हून 18 करण्यात आली आही
इलेक्त्रोनिक वोटिंग मशीन चा वापर
इलेक्ट्रोंनिक वोटिंग मशीन चा वापर सर्वप्रथम 1992 मध्ये केरळ मध्ये परूर विधानसभा मतदार संघा मधील 50 मतदन केंद्रावर करण्यात आला या मशीन चा वापर करण्यासाठी लोकप्रतींनिधीत्व कायदा 1951 मध्ये 1989 साली बदल करण्यात आला. गोवा या राज्याने संपूर्ण राज्या साठी इलेक्ट्रोंनिक वोटिंग मशीन चा वापर 1999 मध्ये केला इ.वो मशीन महत्तम 3840 मतदान रेकॉर्ड करू शकते. या मशीन्स एकम एकांना जोडल्या जाऊ शकतात.
विविध स्तरावर निवडणुकी साठी लागणारी अनामत रक्कम
· लोकसभेच्या निवडणुका लढवण्याची इच्छा असणार्या उमेदवारास जी अनामत रक्कम भरवयाची असते त्या रकमे मध्ये वाढ करण्यात आली आहे. ती अशी की पूर्वी साधारण उममेदवारास 500 रुपये अनामत रक्कम भरावी लागत असे सध्या ती वाढवून 10000 रु करण्यात आली आही आणि अनुसूचीत जाती व जामातीच्या उम्मेदवारासाठी पूर्वी 250 एवढी अनामत रक्कम होती ती सध्या 5000 रु एवढी करण्यात आली आहे
· विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणार्या उमेदवारास सर्वसाधारण पूर्वी 250 रु भरावे लागत असत जे सध्या वाढून 5000 रु एवढे करण्यात आले आहे. आणि अनुसूचीत जाती जमातीच्या उम्मेदवारासाठी पूर्वी 125 रक्कम भरावी लागत असे जी सध्या 2500 एवढी करण्यात आली आहे.
· राष्ट्रपति तसेच उपराष्ट्रपती साठी उभे राहिलेल्या उमेदवारांना पूर्वी 2500 एवढी अनामत रक्कम भरावी लागत असे जी सध्या वाढून 15000 रु एवढी करण्यात आली आहे
· ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी सर्वसाधारण व्यक्ति साठी 500 रु एवढी अनामत रक्कम भरावी लागते तर अनुसूचीत जाती व जमातीतील व्यक्तीस 100 रु एवढी अनामत रक्कम भरावी लागते
· पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी सर्वसाधारण गटातील व्यक्तीसाठी 750 एवढी अनामत रक्कम भरावी लागते तर अनुसूचीत जात व जमतीतील व्यक्तीस 500 रु एवढी अनामत रक्कम भरावी लागते
· जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्या साठी सर्वसाधारण व्यक्तीसाठी अनामत रक्कम 1000 रु एवढी ठरवण्यात आली आहे तर अनुसूचीत जाती व जमातीतील व्यक्तीसाठी अनामत रक्कम 750 रु एवढी ठरवण्यात आली आहे
· नगरपालिका किंवा नगारपरिषदा साठीच्या निवडणुकीसाठी उममेदवारास सर्वसाधारण गटातील व्यक्तीस 1000 रु एवढी रक्कम भरावी लागते तर अनुसूचीत जाती व जमातीतील व्यक्तीसाठी 500 रु एवढी अनामत रक्कम ठरवण्यात आली आली आहे
· महानगर्पालिकेच्या निवडणुका लढवण्यासाठी व्यक्तीस सर्वसाधारण गटातील उम्मेदवारास पूर्वी 5000 एवढी रक्कम भरावी लागत होती जी वाढून सध्या 10000 रु एवढी करण्यात आली आहे तसेच अनुसूचीत जातीतील व्यक्तीस पूर्वी 2500 रु एवढी अनामत रक्कम भरावी लागत असे जी सध्या वाढून 5000 रु एवढी झाली आहे.
विविध स्तरावर निवडणूक लढवण्यासाठी लागणारी वयोमार्यादा
· राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उम्मेदवाराने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी
· उप-राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उम्मेदवाराची वयाची 35 वर्षे पूर्ण झालेली आवश्यक
· संसदेतील राज्यसभा या सभागृहातील जागेसाठी व्यक्तीचे 30 वर्षे वय पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे
· संसदेतील लोकसभा या सभागृहातील जागेसाठी व्यक्तीचे 25 वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे
· राज्यपाल या पदासाठी व्यक्तीचे वय 35 किंवा 35 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
· राज्याच्या विधानपरिषदेतील जागेसाठी व्यक्तीस 30 वर्षे वय पूर्ण करणे आवश्यक आहे तर राज्याच्या विधानसभेतील जागेसाठी 25 वर्षे वय पुर करणे आवश्यक आहे
· स्थानिक स्वराज्य संस्था जसे की ग्रामपंचायत , पंचायत समिति, जिल्हा परिषद,नगरपालिका, महानगरपालिका इत्यादि निवडणुकी मध्ये भाग घेण्यासाठी वयाची 21 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.