ब्राम्हो समाज
हिंदू धर्मातील पहिली सुधारणा चळवळ ब्रम्हो समाजाची होती. ब्राम्हो समाजावर पाश्चिमात्य विचार धारेचा प्रभाव होता. ब्राम्हो समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी केली.
ब्राम्हो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 मध्ये झाली.
ब्रम्हो समाजाचे पहिले सेक्रेटरी ताराचंद चक्रवर्ती हे होते. राजा राम मोहन रॉय यांनी ख्रिस्ती लोकांच्या धर्मांतराच्या कार्यास व जातीबेदास कडाडून विरोध केला.राजा राम मोहन रॉय ने वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी मूर्ति पूजेचे खंडन करून आपले म्हणणे वेदांताच्या आधारावर सिध्द करण्याचा प्रयत्न केला.
उपनिषदामध्ये ईश्वर एकच आहे ही कल्पना रॉय यांना मान्य होती. ते ब्राम्हो समाजाचे मुख्य तत्व होते. त्यांच्या मते ईश्वर निराकार, अदृश्य , सर्वव्यापी, शाश्वत असून सर्व विश्वाची मार्गदर्शक शक्ति आहे.
ब्राम्हो समाजाला कोणत्याही प्रकारची मूर्ति पूजा मान्य नव्हती
समाजाच्या इमारतीत प्रतिमा, पुतळा, शिल्प, चित्र, इत्यादींना स्थान नव्हते.
ब्राम्हो समाजात यज्ञ, धर्मगुरू इत्यादि प्रकारांना देखील मान्यता नव्हती
1833 मध्ये राममोहन यांचा मृत्यू झाल्याने या समाजाचा खरा मार्गदर्शक नव्हता
ब्राम्हो समाजाला नवसंजीवनी देण्याचे काम महर्षि देवेन्द्रनाथ टागोर यांनी केले. समाजात त्यांनी 1842 मध्ये प्रवेश केला.
ब्राम्हो समाजाचा आणखी एक पुढारी केशवचन्द्र शेण यांनी 1858 मध्ये या समाजात प्रवेश केला.
ब्राम्हो समाजाची महत्वाची कार्ये
दैवी अवतारला मान्यता दिली नाही
मानवता आणि अंतरात्म्या चा आवाज हयापेक्षा धर्मग्रंथ श्रेष्ठ नाहीत
एकेश्वरवाद मान्य पण मूर्तिपूजेला मान्यता नाही
ब्राम्हो समाजाने कर्माचा सिद्धांत आणि पुंनर्जन्म ह्या बाबत निश्चित मत प्रकट न करता ती बाब समाजांच्या अनुयायांच्या वैयक्तिक विश्वासावर सोपवली
सत्यशोधक समाज
24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आर्य समाजाची स्थापना केली. या समाजाची तत्वे पुढील प्रमाणे होत
- ईश्वर निर्गुण निराकार आहे
- ईश्वर एकच आहे
- ईश्वर एकच असून तो सत्य स्वरूप आहे. सर्व मनुष्यप्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत.
- मनुष्य जातीने श्रेष्ठ नाही तो गुणाने ठरतो
- परमेश्वर धरती वर आवतार घेत नाही
- आईला भेटण्यास आगर बापाला प्रसन्न करण्यास ज्या प्रमाणे मध्यस्थाची गरज नसते त्याप्रमाणे देवाची प्रथणा करण्यास पूरोहित किंवा गुरु यांची गरज नाही.
- कोणताही धर्म ग्रंथ ईश्वर निर्मित नाही
सत्यशोधक समाजाने समाजातील जाती भेदाची भावना कमी करण्याचा प्रयत्न केला. ब्राम्हणाशिवाय व मराठीतून मंगलाष्टके म्हणण्यास सुरुवात केली . विभिन्न ठिकाणी शूद्रा साठी शाळा स्थापन केल्या. देशाच्या स्वातंत्र्या साठी लढणार्या व्यक्तींचा त्यांनी सत्कार केला. सामाजिक परिवर्तनाची चळवळ सुरू केली.
प्रार्थना समाज
मुंबई येथे केशव चंद्र सेन यांनी प्रार्थणा समाजाची स्थापना केली. 31 डिसेंबर 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली.
प्रार्थना समाजाची शिकवण
- परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता, नियंत्रक, सर्वशक्तिमान पापनाशक, अनंत अनादि व पालनकर्ता आहे.
- परमेश्वराला भक्ति भावाने शरण गेले म्हणजे परमेश्वर प्राप्त होतो
- मूर्तिपूजा करू नाही कारण मूर्तिपूजा परमेश्वरा पर्यन्त पोहचत नाही
- सत्य, सदाचार, आणि भक्ति हे परमेश्वराच्या उपासनेचे मार्ग आहेत
- मानवाने परस्पराशी प्रेमाने वागावे
- परमेश्वराने कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही
- परमेश्वर अवतार घेत नाही
- प्रत्यक प्राणी मात्रा च्या ठिकाणी परमेश्वर निवास करतो
- प्रत्यक मनुष्याने परमेश्वराची पूजा केली पाहिजे
आर्य महिला समाज
आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाईनी केली
आर्य महिला समाजाच्या स्थापणे साठी पंडिता रमाबाईस रमाबाई रानडे, कशीबाइ कानीटकर,व रखमाबाइ राउतांची आई यांची मदत झाली त्यांनी आर्यमहिला समाजातर्फे अनेक व्याख्याने दिली व स्त्रिया मध्ये प्रबोधनाचे कार्य घडवून आणले. आर्य महिला समाजाची स्थापना 1 मे 1882 रोजी करण्यात आली
या समाजाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती.
- भारतातील स्त्रियावर अंधापरंपरेच्या चालीप्रमाणे जे अत्याचार होत आहेत त्यापासून त्याची मुक्तता करणे
- स्त्रियांची उन्नती करणे
अहमदनगर व ठाणे येथे आर्य महिला समाजाच्या शाखा स्थापन करण्यात आल्या
आर्य महिला समाजाच्या कार्यावर काही सनातनी पुरुषांनी पंडिता रमाबाई वर टीका केले त्यात टिळक पक्षाचे व्यक्ति देखील होते.
आर्य समाज
पश्चयात्या प्रभावाच्या प्रतिक्रीयेतून आर्य समाजाची चळवळ उदयास आली. 10 एप्रिल 1875 ला स्वामी दयानंद सरस्वती ने आर्य समाजाची स्थापना केली. वेदांताकडे परत जा असा नारा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला . 1877 मध्ये लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन झाली. आर्य धर्म हाच देशाचा धर्म असावा असी दयानंद सरसवतींची इच्छा होती.
आर्य समाजाचे सिद्धांत
- खर्या ज्ञानाचा मूल स्त्रोत ईश्वर आहे
- सत, चित, आनंद (सच्चिदानंद) स्वरुपातील सर्वशक्तिमान, निराकार, अनादि, अनंत ईश्वर सृष्टी चा निर्माता आहे व त्याची उपासना केली पाहिजे
- सर्व सत्यज्ञानाचा ग्रंथ वेद आहे. त्याचे अध्ययन व अध्यापन तसेच ते ज्ञान ऐकने व ऐकवीने सर्व आर्यांचे परम कर्तव्य आहे
- सत्य गृहण करण्यास आणि असत्याला त्यागण्यास सदैव तत्पर असले पाहिजे
- सर्व कार्य धर्मा प्रमाणेच म्हणजे सत्य असत्याचा विचार करून केले पाहिजे
- शारीरिक, आत्मिक व सामाजिक उन्नती करून जगाचे कल्याण करणे समाजाचा मुख्य उद्देश आहे
- सर्वांशी धर्मानुसार प्रेमाने यथायोग्य व्यवाहार करावा
- अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश उजळावा
- वैयक्तिक कल्याणाचे ध्येय न ठेवता सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण समजावे
- वैयक्तिक प्रगतीपेक्षा मानवजमातीचे कल्याण श्रेष्ठ मानावे
आर्य समाजाने हिंदू धर्मातून इतर धर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्या करिता आर्य समाजाने शुद्धीकरन आंदोलन सुरू केले. वेळेण्टाइन चिरोली आर्य समाजालाच खर्या अर्थानेच भारतीय असंतोषाचा जनक मानतो. आर्य समाजाचा प्रामुख्याने प्रसार पंजाब, उत्तर प्रदेश , राजस्थान व बिहार येथे झाला