ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वपूर्ण नेते होत. स्वतंत्र भारतातील पहिले उपपंतप्रधान होते.
त्यांचा जन्म गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील करमसद खेड्यातील गरीब कुटुंबात झाल.
जन्म –31ऑक्टोबर 1875
विद्यार्थी देशेतच त्यांनी एका कठोर शिक्षका बद्दल संप घडून आणला. मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी वकिलीची परीक्षा पास करून गोध्रा येथे वकिली सुरू केली. 1910 साली ते इंग्लंड ला गेले बॅरिस्टर ची परीक्षा चांगल्या क्रमांकाने पास झाले. अहमदाबाद ला परत येऊन त्यांनी वकिली सुरू केली. सुरूवातीला टिळकांच्या जहाल पक्षात त्यांनी काही काळ व्यतीत केला . परंतु महात्मा गांधी अहमदाबाद ला आल्यानंतर वल्लभ भाईना त्यांचा सहवास लाभला. बस या गोष्टी मुळे त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून आला.
महात्मा गांधी गुजरात सभेचे अध्यक्ष, तर वल्लभाभाई पटेल सरचिटणीस बनले. 1917-18 च्या खेडा सत्याग्रहात वल्लभभाई पटेल ने भाग घेतला होता. त्यांच्या नेतृत्वात सत्यगृह यशस्वी झाला. व शेतकर्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या
ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष बनले व त्यांनी नागरी प्रशासनात अनेक सुधारणा घडून आणल्या. गांधीजीच्या असहकार चळवळीत देखील त्यांनी भाग घेतला होता. वकिली सोडून दिली व सार्वजनिक जीवनाशी एकरूप झाले.
10 लाखाचा निधि उभारून गुजरात विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली. 1921 मध्ये ते गुजरात प्रांतिक कॉंग्रेस चे अध्यक्ष बनले.
1928 च्या बर्डोली च्या सत्यगृहाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या कडे होती. त्या सत्यगृहात त्यांनी पुर्णपणे यश मिळवले, त्यांना या प्रकरणामुळे भारतभर प्रसिद्धी मिळाली. व ते सरदार म्हणूम ओळखले जाऊ लागले. 1931 ते 1936 मध्ये त्यांनी प्रांतीय कायदेमंडळात निवडणूक मंडळाचे अध्यक्ष पद देण्यात आले. त्यांनी कराची कॉंग्रेस पदाचे अध्यक्ष पद देखील उपभोगले आहे. 1940 च्या वैयक्तिक सत्यगृहात देखील त्यांना महत्वाचे स्थान मिळाले होते. चलेजाव च्या चळवळीत त्यांना अटक झाली. 15 जून 1945 त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे 550 संस्थाने भारतात विलीन झाली. हैद्राबाद संस्थान त्यांच्या पोलिस कार्यवाही मुळे भारतात विलीन झाले व त्या तारखेपासून मराठवाडा मुक्ति संग्राम दिन साजरा केला जातो
या कार्यात त्यांना सनदी आधिकारी व्ही पी मेनन यांचे सहाय्य घेतले.
सोरटी सोमनाथ मंदिराचा त्यांच्या सहाय्याने जिर्णोधार करण्यात आला. सर्वधर्मीयांना व अस्पृशांना या मंदिरात प्रवेश देण्यात आला.
ते संविधान सभेची समिति प्रांतिक घटना समिति चे अध्यक्ष होते , अल्पसंख्याक व मूलभूत हक्क समितिचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते.
त्यांचा मृत्यू हार्टअटॅक ने झाला.मुंबई येथे त्यांचे निधन झाले
निधन 12 डिसेंबर 1950