राष्ट्रपती
राष्ट्रपती संघराज्य कार्यकारी विभागाचा घटक असतो राष्ट्रपती भारतीय संसदेचा अविभाज्य भाग आहे.
निवडणूक
निवड अप्रत्यक्षरित्या होते
राष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही गृहातील निवडून आलेले सदस्य भाग घेतात, तसेच राज्य विधान सभेतील निवडून आलेले सदस्य भाग घेतात. दिल्ली व पद्दुचेरी च्या विधानसभेतील सदस्य राष्ट्रपती च्या निवडणुकीत भाग घेतात
संसदेतील किंवा राज्य विधानमंडळातील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत.
राष्ट्रपतींच्या निवडणुकी विषयी शंका व विवाद यांची चौकशी सर्वोच्च न्यायालय करते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो.
निवडणुकीसाठी पात्रता
भारतीय नागरिक असणे
वय 35
लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र
निवडणुकीसाठी नामांकन भरताना कमीत कमी 50 मतदारांनी प्रस्तावित केले पाहिजे आणि किमान 50 मतदारांनी त्याच्या नावास अनुमोदन दिले पाहिजे.
1/6 पेक्षा कमी मते मिळाल्यास त्याचे डिपॉजीट जप्त होते.
कार्यकाळ
5 वर्षे
राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतो
राज्यघटनेचा भंग केल्यास त्यावर महाभियोग चालवता येतो.
महाभियोग संसदेच्या कोणत्याही गृहातून सुरू करता येतो.
महाभियोग संसदेतील अर्धन्यायिक क्रिया आहे.
महाभियोग
महाभियोग घटनेच्या भंग केल्यामुळे चालवला जातो.
महाभियोगात केवळ संसदेतील सदस्य भाग घेऊ शकतात (निर्वाचित तसेच नामनिर्देशित)
महाभियोगात राज्याच्या विधानसभेतील सदस्य भाग घेऊ शकत नाहीत.
आतापर्यंत एकाही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यात आला नाही.
अधिकार
देशाचा कारभार राष्ट्रपतींच्या नावे चालवला जातो.
तो भारताच्या महान्यायवाद्याची नेमणूक करतो. जो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर असतो.
राष्ट्रपती खालीलव्यक्तीची निवड करतो
भारताचा महालेखपरीक्षक
मुख्य निवडणूक आयुक्त
इतर निवडणूक आयुक्त
केंद्रित लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य
राज्यपाल
वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य
आंतरराज्यीय परिषद