राज्यघटनेत बालकल्याणाविषयी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या खालील प्रमाणे सांगता येतील.
कलम 15(3)–—
राज्य महिला व बालकल्यानासाठी विशेष तरतुदी करू शकते.
कलम 21(अ)—
6 ते 14 वयोगटातील मुलांना राज्याने मोफत व सक्तीचे शिक्षण द्यावे.
कलम 23—
मानवाचा व्यापार व वेठबिगारीस प्रतिबंध.
कलम 24—
धोकादायक कारखाने, खानी आथवा धोखादायक व्यवसायात 14 वर्षाखालील बालकामगारास प्रतिबंध.
कलम 39 ई-—
कामगार व बालके यांच्या आरोग्याला हानिकारक नसेल असा रोजगार मिळवून देणे
कलम 39 एफ —–
बालकांना निकोप, मुक्त व प्रतिष्ठेच्या वातावरणात विकसित होण्याची संधी आणि सुविधा दिल्या जातात. तसेच बालकांच्या व युवकांच्या शोषणापासून आणि नैतिक पतनापासून बचाव केला जाईल.
कलम 45—-
सहा वर्षापर्यंत सर्व बालकांना प्रारंभीक बालसंगोपन व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्य प्रयत्न करेल.