सावित्रीबाई फुले
पहिल्या शिक्षिका स्त्री सुधारणे साठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणार्या समाजसेविका म्हणजेच सावित्री बाई फुले या होत. यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज कार्यासाठी वाहून घेतले.
जन्म –– 3 जानेवारी 1831. मृत्यू –– 10 मार्च 1897.
3 जानेवारी हा सावित्रीबईचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाई खांडुजी नेवासे पाटील यांची कन्या होती. सावित्रीबईचा जन्म सातार्या जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.
1840 मध्ये वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबईचा विवाह महात्मा ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी ज्योतिबा फुले यांचे वय 13 वर्षे होते. 1841 पासून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईच्या शिक्षणास प्रारंभ केला. स्त्री शिक्षणाची प्रेरणा महात्मा फुले यांना त्यांच्या मावस भगिनी सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून मिळाली आणि ज्योतीरावांनी सावित्रीबाई व सगुणाबाई यांना घरीच शिकविले.
सावित्रीबाईच्या शिक्षणाची जबाबदारी ज्योतीरावाचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव सीताराम भवाळकर यांनी घेतली होती. सखाराम यशवंत परांजपे हे मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल ट्रेनिंग स्कूल येथील शिक्षक होते. अहमदनगर येथील फरारबाईच्या व पुण्यात मिचेल बाईच्या नॉर्मल स्कूल मध्ये सावित्रीबाईने अध्यापनाचे शिक्षण घेतले. सावित्रीबाईंची ग्रहण क्षमता खूप चांगली होती. फक्त काही वर्षात त्यांनी शिक्षण पूर्ण करून घेतले. त्या उत्तम शिक्षिका बनल्या. 1846-47 मध्ये त्यांचे अध्यापनाचे चवथे वर्ष पूर्ण होऊन त्या उत्तम शिक्षिका बनल्या. महात्मा ज्योतिबा यांच्या कार्यात सावित्री बाईंनी पूर्ण साथ दिली. शिक्षणाची गंगा त्यांनी घराघरात वाहिली. स्त्री शिक्षणाचे कार्य करताना त्यांना सनातनी ब्राम्हणाकडून त्यांना नेहमीच विरोध होत असे त्यांना भर रस्त्यात शेण व दगड फेकून मारले जात असे पण सावित्री बाईंनी आपले कार्य समाप्त करण्याचा विचारही केला नाही परिणामस्वरूप त्यांच्या शाळेतून अनेक विद्यार्थिनी शिकून बाहेर पडल्या. 3 जुलै 1848 साली महात्मा फुले व सावित्री बाई फुले यांनी भिडयाच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.या शाळेत सुरूवातीला सहा मुली शिकत होत्या. ह्या शाळेत सावित्रीबाईंनी शिकवण्याच्या कार्यास सुरुवात केली. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व भारतातील पहिली मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई नावारूपास आल्या. सावित्रीबाई शिक्षिकेचे काम करत होत्या म्हणून त्यांच्या माहेरचे देखील दरवाजे बंद झाले होते. 15 मे 1848 रोजी दुसरी महिला शाळा देखील सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हे मुलींना शिक्षण देण्याचे काम करत होते म्हणून सनातनी मंडळी ज्योतीरावांच्या वडिलांना देखील धमक्या देत. ज्योतीरावांच्या वडिलांनी ज्योतिरवांना त्यांचे कार्य थांबवण्यास संगितले. पण त्यांनी तसे केले नाही म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढले(1849).
सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजातर्फे 52 अन्न छत्रालये चालवली. सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी चार वर्षात आठरा शाळा काढल्या.
सावित्रीबाईंनी लिहिलेला पहिला काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ 1850 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांनी ‘बावनकशी’, ‘सुबोध रत्नाकर’, हे काव्यसंग्रह 7 नोव्हेंबर 1892 साली अमरावती जिल्ह्यातील करजगाव येथील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते स्वामी लक्ष्मणशास्त्री सोनार यांच्याकडे प्रकाशित झाला.
1893 साली भीषण दुष्काळ पडला त्यावेळी सावित्रीबाईंनी इंग्रज सरकारला रिलीफ कामे करायला भाग पाडले. 1897 साली पुण्यात भयंकर प्लेगची साथ आली. प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना एक दिवस एका दलित बाळाला आपल्या खांद्यावर आणताना सावित्रीबाईंना रोग झाला.यातच 10 मार्च 1897 ला सावित्रीबाईंचे निधन झाले.
खूप छान भाषण सावित्रीबाई फुले भाषण >