सुरूवातीचे जीवन
सर्वात दीर्घायुषी समाजसुधारक ज्यांनी आपले सर्व आयुष्य समाज सेवेसाठी चंदना सारखे झिजवले. महर्षि धोंडो केशव हे असे समाज सुधारक होते ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री उद्धाराचे कार्य करण्यात व्यतीत केले. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते समाजकार्य करत राहिले.
महर्षि कर्वे यांची चार मुले होती. रघुनाथ हा पहिल्या पत्नीचा मुलगा होता. तो गणिताचा प्राध्यापक आणि समाजस्वास्थ्य मासिकाचे संपादक होता. त्यांच्या दुसर्या मुलाचे नाव शंकर हे होते त्याने एम बी बी एस पूर्ण केले होते. त्यांचा तिसरा मुलगा बी एस्सी झाला होता.
जन्म — 18 एप्रिल 1858.
महर्षि धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या खेडेगावी झाला. शेरवली हे त्यांचे आजोळ होते.
मृत्यू — 9 नोव्हेंबर 1962
महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या आईची नाव लक्ष्मीबाई असे होते. मुरुड या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. विनायक लक्ष्मण सोमण या शिक्षकाकडून त्यांना समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली. कर्वेना सहावीची परीक्षा देण्यासाठी कुंभार्ली घाटातून पायी चालत सातारा येथे चालत जावे लागत असे. 125 मैल अंतर त्यांनी तीन दिवसात कापले त्यांनी काही दिवस रत्नागिरीला शिक्षण घेतले.
महर्षि धोंडो केशव कर्वे 1881 साली मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1884 साली त्यांनी मुंबई येथील विल्सन कॉलेज मधून गणित विषय घेऊन बी ए ची पदवी संपादन केली.
1884 ते 1888 पर्यंत त्यांनी उपजीविकेसाठी मुंबईत विविध शालेय शिकवण्या घेतल्या.
विवाह
महर्षि धोंडो केशव कर्वे यांचा विवाह 1873 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव राधाबाई असे होते. परंतु त्यांना राधाबाई चा सहवास अधिक काळ लाभला नाही राधाबाईचे निधन 1891 मध्ये झाले.
पुनर्विवाह
त्यांचा दूसरा विवाह एका विधवेशी झाला. त्यांची मित्र नरहरपंत यांची धाकटी बहीण असलेल्या पंडिता रमाबाई यांच्या शारदासदन मधील गोदुबाई (आनंदीबाई) यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह 13 मार्च 1893 मध्ये झाला. गोदुबाई चा मृत्यू 29 नोव्हेंबर 1950 ला झाला
सामाजकार्याकडे
पत्नीच्या मृत्यूनंतर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून 15 नोव्हेंबर 1891 साली फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. त्या वेळी त्यांना 75 रुपये मासिक पगार होता. येते शिक्षक म्हणून काम करत असतांना त्यांनी विद्यार्थी निधि ही योजना काढली या निधीत दर महिन्याला 10 एवढी रक्कम कर्वे जमा करत असत. त्यांस समाज सुधारणेकडे वळवणारे सोमण गुरुजी होते त्यांनी महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले व गोपाळ गणेश आगरकर यांच्या कडून देखील समाज सुधारणेची प्रेरणा घेतली.
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना विधवांची दुख समजले होते
. जो पर्यंत विधवेचा विवाह होत नाही तोपर्यंत त्या स्त्री चे आयुष्य सुधारणार नाही हे त्यांना समजले होते. विधवांचा विवाह व्हावा याच्या प्रयत्नात त्यांनी 31 डिसेंबर 1893 रोजी वर्धा येथे विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. पुढे 20 ऑगस्ट 1895 ला विधवा विवाहोत्तेजक मंडळाचे नाव बदलून विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी असे नाव करण्यात आले.
विधवा विवाहोत्तेजक मंडळाची कार्य पुढीलप्रमाणे सांगता येतील.
· विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह घडवून आणणे.
· पुनर्विवाहित कुटुंबाचे मेळावे घडवून आणणे.
· पुनर्विवाहा बाबतीत लोकमत तयार करणे.
· पुनर्विवाह केलेल्या कुटुंबास समाजात मानाचे स्थान मिळवून देणे.
· पुनर्विवाहाच्या बाबतीत समाज जागृती करण्यासाठी दौरे काढणे व व्याख्यान देणे.
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना जणू समाजसुधारनेचे व्यसनच लागले होते. त्यांनी स्त्री सुधारणेसाठी अनेक संस्था स्थापन केल्या. त्यापैकीच एक अनाथ बालिकाश्रम होय. स्त्रियांच्या शिक्षणाकडे लक्षे दिले जावे असे त्यांना वाटत होते. त्यांनी 14 जून 1899 रोजी पुणे येथे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. या संस्थेचे चिटणीस महर्षि कर्वे व अध्यक्ष डॉ आर. जी. भांडारकर हे होते. प्लेगच्या साथीच्या वेळी ही संस्था हिंगणे येते स्थलांतरित करण्यात आली होती.
अनाथ बालिकाश्रम संस्थेचे उद्देश खालील प्रमाणे सांगता येतील
· विधवा स्त्रियांना शिक्षण देऊन स्वावलंबी करावे.
· आपले जीवन नारर्थक नसून एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हा विचार स्त्रियांमध्ये दृढ करणे.
· विधवांच्या विचारात आणि मनोवृत्तीत बदल करणे.
· विधवांची दुखे हलकी करण्यास मदत करणे.
1902 मध्ये 25 वर्षे वयाच्या पर्वतीबाई आठवले ह्या आश्रमात आल्या. त्यांनी तेथेच शिक्षण घेतले आणि आश्रमाचेही काम पाहिले. त्या आश्रमाच्या आधारस्तंभ बनल्या. 1904 मध्ये वेणुबाई नामजोशी व कशीबाई देवधर यांनी 1913 पर्यन्त आश्रमात महिला अधीक्षक म्हणून काम पहिले.
महर्षि धोंडो केशव कर्वे हे सर्वात जास्त काळ जगलेले समाज सुधारक होत. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्यक क्षण समाजसुधारणेसाठी लावला. स्त्रियांच्या सुधारनेचे जणू त्यांनी शपथच घेतली होती. त्यांनी 1907 मध्ये महिला विद्यालय सुरू केले. या विद्यालयात स्त्रियामंध्ये सुपत्नी आणि सुमाता म्हणून होण्याची पात्रता निर्माण करणारे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. सुरवातीस हे महिला विद्यालय 4 मार्च 1907 रोजी पुणे येथे लाकडी पुलाजवळ एका वाड्यात सुरू केले. सुरूवातीस 6 विद्यार्थी या विद्यालयात शिकत होते. पुढे हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रमाच्या शेजारी हे विद्यालय नेण्यात आले.
निष्काम कर्म मठाची स्थापना
स्त्री शिक्षणाचे कार्य करीत असताना स्त्रियांनी आवश्यक ते उद्योग व्यवसाय निर्माण करून देणे, व्यावसायिक शिक्षण देणे, त्यांच्या उदर्निर्वाहासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून इत्यादि कार्यास महर्षि कर्वे यांनी सुरुवात केली.
1910 मध्ये महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली.
निष्काम कर्म मठाची नियम खालील प्रमाणे सांगता येईल
· सेवक व सेविकांनी आपले राहणीमान साधे ठेवावे.
· मठाच्या नियमांचे पालन करावे.
· वागणूक शुद्ध ठेवावी.
· विद्यार्थ्यांसाठी धान्य जमविणे.
· कोणाचाही द्वेष न करणे.
· मठाच्या कार्यासाठी खर्च करणे.
महिला विद्यापीठाची स्थापना
महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी जपान या देशातील महिला विद्यापीठाविषयी एका पुस्तकातून माहिती मिळाली. जपान मधील महिला विद्यापीठविषयी माहीत झाल्यावर त्यांना आपल्या देशात देखील एक महिला विद्यापीठ असावे असे वाटू लागले. त्यांनी अनेक कष्ट करून मुंबई येथे 3 जून 1916 ला महिला विद्यापीठाची स्थापना केली.
महिला विद्यापीठाचा उद्देश
· स्त्रियांना उच्च शिक्षण देणे.
· स्त्रियांना प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला. चित्रकला व गायनकलेचे शिक्षण देणे.
· स्त्रियांना स्वावलंबी, स्वाभिमानी व कर्तृत्ववान बनविणे.
· आधुनिक शिक्षणास आधार देणे.
· समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विज्ञान विषय शिकवणे.
· आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आरोग्यशास्त्राविषयी माहिती देणे.
· समाजातील सर्व स्त्रियांना शिक्षण उपलब्ध करून देणे.
· शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षण मातृ भाषेतून उपलब्ध करून देणे.
1917 मध्ये महिला विद्यापीठाच्या वतीने अध्यापिका विद्यालय सुरू करण्यात आले. 1920 मध्ये सर विठ्ठलदास ठकरसी यांनी महिला विद्यापीठास आपली आई श्रीमती नाथिबाई दामोदर ठकरसी यांचे नाव देण्याच्या मोबदल्यात 20 लाखरुपये विद्यापीठास देणगी म्हणून दिली.
महर्षि धोंडो केशव कर्वेंनी स्त्री शिक्षणाचे जेवढे प्रयत्न केले ते केवळ शहरापूर्ते मर्यादित होते. स्त्री शिक्षणाचा प्रसार खेड्या मध्ये पण व्हावा असे त्यांना वाटत होते. त्या साठी त्यांनी 1935-36 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ सुरू केले. त्या मुळे अनेक खेडे गावात शाळा सुरू झाल्या. ज्या गावात बोर्डाच्या शाळा नाहीत आशा ठिकाणी प्राथमिक शाळा चालवण्यासाठी मदत करणे हा वरील मंडळाचा उद्देश होता. कर्वेंनी 1935 पासून 1947 पर्यंत या मंडळासाठी कार्य केले.
महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी आपल्या शेवटच्या काळात जातिभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या काळात समाजात खूप मोठ्या प्रमाणावर जातिभेद मनला जात असे. असा जातिभेद त्यांना पसंद नव्हता. म्हणून महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी 1 जानेवारी 1944 ला समता संघाची स्थापना केली. मनुष्य-मनुष्यात असलेले आर्थिक व सामाजिक मतभेद आणि भेद कमी करून सर्वांत समतेची भावना उत्पन्न व्हावी हा समता संघाचा प्राथमिक उद्देश होता.
महर्षि धोंडो केशव कर्वेंनी आपली कर्मभूमी हिंगणे हे गावच नियुक्त केले. या अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. या आश्रमास 1946 ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने 14 जून 1946 रोजी एक समारंभ आयोजित करण्यात आला या समारंभात या संस्थेचे नाव बदलवून हिंगणे स्त्री शिक्षण असे ठेवले.
अध्यापिका विद्यालय
महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी 1917 साली अध्यापिका महाविद्यालयाची सुरुवात केली. हे विद्यालय महिलांच्या मदतीने चालविले जात असे. शैक्षणिक चळवळीमध्ये स्त्रियांचा अधिक सहभाग व्हावा या उद्देशाने जे अध्यापिका विद्यालय स्थापन करण्यात आले होते.
महर्षि कर्वे यांना मिळालेल्या पदव्या
· पुणे विद्यापीठाकडून 1952 ला डी. लिट पदवी मिळाली.
· बनारस विद्यापीठाकडून 1952 ला डी. लिट ही पदवी मिळाली.
· S.N.D.T. विद्यापीठाकडून 1954 ला डी. लिट ही पदवी मिळाली.
· भारत सरकारने 1955 ला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला.
· मुंबई विद्यापीठाने एल. एल. डी ही पदवी 1957 ला प्रदान केली.
· भारत सरकारने 1958 ला भारतरत्न दिला.