खाली आपण काँग्रेसशी संबंधित पहिल्या वहिल्या घटनांचा अभ्यास करणार आहोत. स्पर्धा परीक्षेत अशा पहिल्या वहिल्या घटनांना जास्त महत्व दिले जाते.
- काँग्रेस चे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 साली मुंबई या ठिकाणी झाले.
- काँग्रेस चे पहिले अध्यक्ष पी आनंद चारलू हे होते. यांनी 1891 च्या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
- काँग्रेस चे पहिले फारशी अध्यक्ष दादाभाई नौरोजी हे होते. यांनी पहिल्यांदा 1886 साली कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष पद भूषविले होते. ते एकुणात तीन वेळा काँग्रेस च्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते पुढे ते 1893 व 1906 ला काँग्रेस च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले.
- काँग्रेस चे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी हे होते यांनी 1887 च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
- काँग्रेस चे अध्यक्ष असणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती सर नारायण गणेश चंदावरकर हे आहेत. यांनी 1900 साली झालेल्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
- काँग्रेस चे पहिले युरोपियन अध्यक्ष जॉर्ज युल हे होते यांनी 1888 च्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले.
- काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा ऍनी बेझंट या होत्या यांनी 1917 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते. हे अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी झाले होते.
- काँग्रेस च्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू या होत्या यांनी 1925 च्या कानपूर अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते.