इंग्रजांच्या काळातील विविध शैक्षणिक ब्रिटिश समित्या
हंटर आयोग hunter aayog :-
हंटर आयोगाची स्थापना ब्रिटिशांच्या काळात 1882 मध्ये लॉर्ड रिपन द्वारे करण्यात आली. चार्ल्स वूड च्या अहवाला चे निरीक्षण करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष विल्यम हंटर हे होते. या आयोगात आठ भारतीय सदस्य देखील होते. या आयोगाचे क्षेत्र केवळ प्राथमिक व माध्यमिक शिक्षणा पूरते मर्यादित होते. वुड चा अहवाल 19 जुलै 1854 ला सादर करण्यात आला. या अहवालाचा प्रभाव पुढील 50 वर्षे होता. या अहवालाचे निरीक्षण करण्यासाठी हंटर आयोग स्थापन करण्यात आला होता.
या आयोगाने प्राथमिक शिक्षण विषयक धोरण , कायदे, व्यवस्थापन, प्राथमिक शाळांना प्रोत्साहन, शिक्षकाचे प्रशिक्षण इत्यादी वर आपला अहवाल प्रसिद्ध केला.
या आयोगाने प्राथमिक शिक्षण विषयक धोरण , कायदे, व्यवस्थापन, प्राथमिक शाळांना प्रोत्साहन, शिक्षकाचे प्रशिक्षण इत्यादी वर आपला अहवाल प्रसिद्ध केला.
हंटर आयोगाच्या शिफारशी
हंटर आयोगाने खलील काही महत्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या
० प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेत द्यावे
० प्राथमिक शिक्षणाला अधिक वित्त पुरवठा मिळावा
० कोणत्याही व्यक्तीला नोकरी देतांना त्या व्यक्तीस लिहिता वाचता येते की नाही हे पाहावे
० इंग्लंड मध्ये 1870 ते 1876 प्रमाणे केलेल्या कायद्यासारखे शिक्षण विषयक कायदे भारतात देखील करावे
० प्राथमिक शिक्षणाची जिम्मेदारी जिल्हा किंवा नगरपरिषदा कडे सोपवावी
० स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे.
० प्राथमिक शाळांतील शिक्षका साठी प्रशिक्षणाची सोय करावी.
भारतीय विद्यापीठ आयोग — bharatiy vidyapeeth aayog
लॉर्ड करझन ने विद्यापीठाच्या सुधारणेकडे लक्ष दिले व त्यांच्या सुधारणा साठी 27 जानेवारी 1902 मध्ये विद्यापीठ आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे अध्यक्ष ब्रिटिश व्हाईस रॉय यांच्या मंडळाचे एक सभासद रॅक्ले हे होते. हा आयोग विद्यापीठाच्या सुधारणेसाठी स्थापन करण्यात आला होता भारतातील विद्यापीठाची अंतिम व्यवस्था निश्चित करणे व प्रचलित पद्धती मध्ये योग्य ते बदल करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली.
या आयोगाने मूलभूत परिस्थिती चा अभ्यास न करता केवळ विद्यापीठ स्तरीय गोष्टींचा अभ्यास केला व योग्य त्या शिफारशी केल्या. या आयोगाच्या शिफारशी खलील प्रमाणे सांगता येतील.
भारतीय विद्यापीठ आयोगाच्या शिफारशी
भारतीय विद्यापीठ आयोगाने पुढील प्रमाणे शिफारशी केल्या.
० विद्यापीठ व्यवस्थापनाची पुनर्रचना करावी.
० विद्यापीठाना कडक नियम घालून व्यवस्थितपणे त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवावे.
० विद्यापीठाने काही प्रमाणात अध्यापनाचे कार्य केले तरी चालेल
कलकत्ता विद्यापीठ आयोग – kalkatta vidyapeeth aayog
कलकत्ता विद्यापीठ आयोगाची स्थापना 1917 मध्ये करण्यात आली.लीड्स विद्यापीठाचे त्या वेळेचे कुलगुरू सर एम्. ई.सॅडलर यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन करण्यात आला. भारतीय विद्यापीठा समोरील समस्या व भविष्या विषयी अभ्यास करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाचे नाव जरी कलकत्ता विद्यापीठ आयोग असे असले तरी याचे क्षेत्र भारतातील सर्व विद्यापीठा पर्यंत सीमित होते तसेच यांच्या शिफारशी सर्व विद्यापीठांना लागू होणार होत्या. या आयोगाने उच्च शिक्षणा बरोबर माध्यमिक शिक्षणाचा देखील अभ्यास केला कारण या आयोगाच्या मध्ये उच्च शिक्षणाचा पाया माध्यमिक शिक्षणात घातला जातो.
कलकत्ता विद्यापीठ आयोगाच्या शिफारशी
कलकत्ता विद्यापीठ आयोगाने खालीलप्रमाणे काही महत्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या.
० उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया मॅट्रिक ऐवजी इंटरमेडियट असाव्या
० शासनांने इंटरमेडियट महाविद्यालय ही नवीन व्यवस्था स्थापन करावी.
० महाविद्यालयात कला, स्थापत्य, वैद्य इत्यादी अभ्यासक्रम असावे.
० ही महाविद्यालये स्वायत्त संस्था असू शकतील किंवा इतर शाळांना जोडलेली असतील.
० प्रत्यक राज्यातील शाळांत इंटरमेडियट शिक्षण मंडळ असावे.
० कलकत्ता येथील विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे ढाका येथे देखील एक विद्यापीठ स्थापन करावे
० विद्यापीठ नियमनाचे नियम शिथिल करावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यालयांचा अशा तऱ्हेने विकास करावा की त्यातून नवीन विद्यापीठे स्थापन करता येतील.
० विद्यापीठातून सामान्य तसेच विशेष गुणवत्ता पूर्ण अभ्यासक्रम सुरू करावे.
० इंटरमेडियट परिक्षेनंतर पदवी अभ्यासक्रमाचा तीन वर्षांचा असावा
० मुसलमान समाजातील शैक्षणिक मागासलेपण लक्षात घेऊन या वर्गातील लोकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे.
० प्रत्येक विद्यापीठाने शारीरिक शिक्षण संचालक, विद्यापीठ कल्याण मंडळ, आरोग्य अधिकारी इत्यादींची नेमणूक करावी.
० कलकत्ता विद्यापीठात मुलींच्या शिक्षणासाठी विशेष मंडळ स्थापन करावे व मुलींसाठी पडदा शाळा सुरू कराव्यात. सर्व विद्यापीठात व्यावसायिक शिक्षणाची सोय करावी . Etc