ग्रामपंचायत (gramapanchayat)

           ग्रामपंचायत हा पंचायत संस्थेचा पायाभूत घटक मानला जातो. ग्रामपंचायतीत लोकसंख्येच्या प्रमाणात कमीत कमी सात व जास्तीत जास्त सतरा सदस्य असतात. त्यापैकि काही जागा अनुसूचीत जाती जमाती साठी लोकसंख्येच्या प्रमाणात तर काही जागा इतर मागास वर्गीय घटकासाठी आरक्षित असतात. समाजातील सर्व घटकांना त्यात सदस्यत्व मिळावे हा आरक्षणा मागील मूळ हेतु आहे. गावचा कारभार पहाण्यासाठी गावातून काही गावचे प्रतींनिधी निवडून दिले जातात. पंच निवडून देण्यासाठी गावाचे काही भाग तयार केले जातात त्यास आपण वार्ड असे म्हणतोत. ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची निवड प्रौढ व गुप्त मतदान पद्धती ने होते.
      वेगवेगळ्या राज्यातील ग्रामपंचायतीची नावे 
आसाम———————गावपंचायत
गुजरात———————नगरपंचायत
तामिळनाडू—————-शहरपंचायत
उत्तरप्रदेश——————गावसभा
ओडिशा——————–पालीसभा
बिहार———————–पंचायत
      गावाची लोकसंख्या पाचशे पेक्षा कमी असल्यास आशा गावांची मिळून एक ग्रामपंचायत तयार केली जाते आशा ग्रामपंचायतीस गट ग्रामपंचायत असे म्हणतात.
      ग्रामपंच्यातीच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात. सदस्यांची निवड पाच वर्षा साठी केली जाते. ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी त्या व्यक्तीचे वय 21 वर्षे पूर्ण असावे व त्या व्यक्तीचे
नाव स्थानिक मतदार यादी मध्ये समाविष्ट केलेले असावे.

ग्रामपंचायतीची बैठके

·         ग्रामपंचायतीच्या एका वर्षाला 12 बैठका घेणे बंधनकारक आहे
·         ग्रामपंचायतीची पहिली बैठक तहसीलदार बोलावितात या बैठकीमध्ये सरपंच आणि उपसरपंचाची निवड केली जाते.
·         ग्रामपंचायतीच्या दोन बैठका मधील अंतर एक महिन्याचे असते.
·         ग्रामपंचायतीची सभा घेण्यासाठी अर्ध्या संख्ये पेक्षा अधिक सदस्य उपस्थित रहाणे आवश्यक असते.
·         ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना सभेच्या किमान तीन दिवस आगोदर नोटिस देणे आवश्यक असते.

ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या निकष

गावाची लोकसंख्या ————————————सदस्यसंख्या
1500 किवा कमी——————————————-7
1501 ते 3000———————————————-9
3001 ते 4500———————————————11
4501 ते 6000———————————————13
6001 ते 7500———————————————15
7501 पेक्षा जास्त——————————————17
     

      सरपंच(sarpanch)

      निवडणूक झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य आपल्या मधून एकाची सरपंच व उपसरपंच म्हणून निवड करतात. सरपंचाच्या पडसासाठी महिलांना प्राधान्य दिले जाते. सरपंचाच्या मार्गदर्शना खाली गावचा कारभार चालतो. गावाच्या कल्याणकारी योजना राबवण्याची जीमेदारी सरपंचाची असते. ग्रंपंच्यायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षाखाली भरवल्या जातात सरपंचाला त्याच्या कामात उपसरपंच मदत करतो. सरपंच आगर योग्य पद्धतीने कारभार पाहत नसेल तर त्यावर पंचायत समितीचे सदस्य अविश्वासाचा प्रस्ताव आणू शकतात.
      महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 30(1) नुसार दोन उमेदवारांना समान मते पडल्यास सबंधित आधिकार्‍या समोर चिठ्ठ्या टाकून सरपंच व उपसरपंच यांची निवड केली जाते.
      सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीबद्दल वाद निर्माण झाल्यास निवड झाल्यापासून सात दिवसाच्या आत जिल्हा आधिकार्‍याकडे लेखी तक्रार करतात येते. जिल्हा आधिकार्‍याने सबंधित तक्रारीवरती 30 दिवसाच्या आत निर्णय देणे बंधनकारक आहे.

सरपंचाची  रजा

      ग्रामपंचायतीचा सरपंच चार महिन्या पर्यंत विना परवानगी गैर हजर राहू शकतो.  सरपंचची सहा महिन्या पर्यंत ची रजा ग्रामपंचायती द्वारे मंजूर केली जाते. अगर सरपंच सहा महिन्यापेक्षा अधिक काल रजेवर असल्यास राज्य सरकार कार्यवाही करू शकते   
सरपंचाचे मानधन
सरपंचास लोकसंख्येनुसार मानधन दिले जाते
600 ते 2000 ———————————-1000 रुपये
2001 ते 8000———————————1500 रुपये
8000 पेक्षा जास्त——————————–2000 रुपये

ग्रामसेवक(gramsevak)

      गावाचा दैनंदिन कारभार सांभाळण्यासाठी व गावाचे दफ्तर सांभाळण्यासाठी ग्रामसेवकाची निवड केली जाते. ग्रामसेवक हा ग्रामपंच्यायतीचा सचीव असतो. गावाच्या विकासासाठी असणार्‍या विविध योजनांची माहितीत ग्रामसेवक ग्रामस्थांना देतो. शासन आणि गावकरी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून ग्रामसेवक काम करतो. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे कामही ग्रामसेवक करत असतो.
      महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 60 नुसार प्रत्यक ग्रामपंचायती साठी एक ग्रामसेवक असतो. एका ग्रामपंचायती साठी एक ग्रामसेवक किंवा एका पेक्षा अधिक ग्रामपंचायती साठी एक ग्रामसेवक ठेवता येतो. ग्रामसेवकाचे वेतन जिल्हानिधी मधून दिले जाते. त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी आधिकार्‍या मार्फत होत असते. ग्रामसेवकास रजा हवी असल्यास किरकोळ रजा गट विकास आधिकारी देतात जास्त काळा साठी रजा हवी असल्यास मुख्य कार्यकारी आधिकार्‍याकडे अर्ज करावा लागतो. त्यांच्या मार्फत ती रजा मंजूर केली केली जाते. ग्रामसेवकाचा राजीनामा केवळ मुख्य कार्यकारी आधिकारी स्वीकारतात.

ग्रामपंचायतीची कामे (grampanchayatichi kaame)

ग्रामपंचायतींना खालील प्रकारची कामे पार पाडावी लागतात. गावातील लोकांना सोयी व सुविधांची उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचे काम असते.
·          गावात रास्ते बांधणे
·          दिवाबत्तीची सोय करणे
·          गावात स्वच्छता राखणे
·          सांडपाण्याची व्यवस्था करणे
·          पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे
·          गावात बाजार, उत्सव जत्रा यांची व्यवस्था करणे
·          जन्म, मृत्यू व विवाहाची व्यवस्था करणे
·          आरोग्यविषयक सोयी सुविधा पुरविणे
·          शेती व पशुधन विकासाच्या योजना अंमलात आणणे
·          गावाच्या परिसरात झाले लावणे व पर्यावरणाची रक्षा करणे
·          उद्याने व क्रीडांगणाची  सुविधा उपलब्ध करून देणे
·          शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे
·          गावात ग्रामसभेचे आयोजन करणे
भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तरप्रदेश मध्ये आहेत.

 ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने—-

      गावाच्या विकासाठी कामे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायती जवळ पैसा असणे आवश्यक असते. हा पैसा ग्रामपंचायतीला विविध मार्गानी प्राप्त होत असतो. यात्रा कर, घर पट्टी, पाणी पट्टी, आठवडे बाजार, यावरील कर ही ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने आहेत. राज्य सरकार व जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला अनुदान मिळते. गावातील एकूण महसुलापैकी 70 टक्के महसूल जिल्हा परिषदे कडे द्यावा लागतो. 30 टक्के महसूल ग्रामपंचायत खर्च करू शकते.

ग्रामसभा(gramsabhaa)

      गावातील सर्व वयात आलेल्या किंवा प्रौढ ग्रामस्थांचा ग्रामसभे मध्ये समावेश होतो. ग्रामसभेच्या वर्षातून चार सभा होतात. ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी सरपंचाची असते. ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते. ग्रामसभेच्या बैठकी आधी महिला सदस्यांची बैठक होते( 26 जानेवारी 2003 पासून). या बैठकीत महिलाना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळते. महिला ग्रामसभा घेणारे महाराष्ट्रातील पहिले राज्य.
      महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 6 मधील ग्रामसभेचा उल्लेख करण्यात आला आहे. 1992 साली झालेल्या 73 व्या घटनादुरुस्तीमुळे ग्रामसभांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243ए मध्ये ग्रामसभेची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामसभेच्या एका वर्षातून पुढील प्रमाणे चार बैठका होतात.
·         26 जानेवारी
·         1 मे
·         15 ऑगस्ट
·         2 ऑक्टोबर

ग्रामसभेचे महत्व(gramsabheche mahatva)

      गावातले प्रौढ नागरिक ग्रामसभेत एकत्र येतात. ते ग्रामपंचायतीला विकास योजना बाबत मार्गदर्शन करतात. ग्रामसभेमुळे गावातील लोकांना ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रभावी नियंत्रण ठेवता येते. गावातील नागरिक विकासाच्या योजना विषयी व त्याच्या खर्चाविषयी माहिती मिळवू शकतात. ग्रामसभेमुळे ग्रामीण भागाचा कायापालट होतो. गावाच्या विकासाला योग्य दिशा मिळते.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment