11 मार्च ते 15 मार्च 2024 चालू घडामोडी क्विझ – current affairs quiz 11 march to 15 march 2024

चालू घडामोडीवर पकड बनवण्यासाठी केवळ वाचन नाही तर प्रश्न सोडवण्यावर देखील भर द्यावा लागतो. आपण आपल्या साईट वर चालू घडामोडी संबंधी क्विझ अपलोड करत असतो. जास्तीत जास्त सराव करा व जास्तीत जास्त मार्क मिळवा. खाली आपण 11 मार्च ते 15 मार्च 2024 दरम्यान च्या चालू घडामोडी क्विझ बघणार आहोत.

1) कोणत्या राज्यात महतारी वंदन योजना सुरू करण्यात आली आहे ?
  • महाराष्ट्र
  • मध्य प्रदेश
  • छत्तीसगड
  • राजस्थान
  • छत्तीसगड
  • या योजनेनुसार विवाहित महिलांना प्रतिमाच हजार रु मिळणार आहेत
  • 2) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेला बोगदा चे उदघाटन केले आहे. हा बोगदा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे ?
    • अरुणाचल प्रदेश
    • मेघालय
    • मणिपूर
    • महाराष्ट्र
  • अरुणाचल प्रदेश
  • हा बोगदा 13 हजार फूट उंचावर उभारण्यात आला आहे
  • हा बोगदा तवांग ला भारताशी जोडणार आहे
  • आसाम चे तेजपुर व अरुणाचल प्रदेश चे कामेंग या पुलाने जोडले जाणार आहे
  • 3) पॅरालिम्पिक समितीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
    • रवी शहा
    • देवेंद्र झाझरीया
    • किशन रेड्डी
    • अरुण गोयल
  • देवेंद्र झाझरीय
  • 4) पंतप्रधान मोदी यांनी द्वारका एक्सप्रेस चे उदघाटन केले आहे. या महामार्गाची लांबी किती किमी आहे ?
    • 30.11 किमी
    • 29.5 किमी
    • 31.8 किमी
    • 23.6 किमी
  • 29.5 किमी
  • दिल्ली ते गुरुग्राम दरम्यान हा एक्सप्रेस वे उभारण्यात आला आहे.
  • हा एक्सप्रेस वे उभारण्यासाठी 9 हजार कोटी रु चा खर्च आला आहे
  • 5) भारत शक्ती युद्ध सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ?
    • राजस्थान
    • मध्य प्रदेश
    • ओडिशा
    • उत्तर प्रदेश
  • राजस्थान
  • भारत शक्ती हा युद्ध सराव तिन्ही सेना दलाचा युद्ध सराव आहे
  • पोखरन फिल्ड फायरिंग रेंज मध्ये हा युद्ध सराव 50 मिनिटे चालला
  • 12 मार्च रोजी हा सराव पार पडला
  • यात तेजस विमान, हेलिकॉप्टर mk4, रणगाडे के9 वज्र, धनुष्य, सारंग इत्यादींनी सहभाग घेतला होता
  • 6) फेब्रुवारी महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
    • राजेंद्र अग्रवाल
    • यशस्वी जैस्वाल
    • किरण भटनागर
    • नरेंद्र गोस्वामी
  • यशस्वी जैस्वाल
  • 7) राष्ट्रपती द्रोउपदी मुर्मु यांना डॉ ऑफ सिव्हिल लॉ ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली आहे ?
    • पुणे विद्यापीठ
    • मॉरिशस विद्यापीठ
    • कॅलिफोर्निया विद्यापीठ
    • सिंगपोर विद्यापीठ
  • मॉरिशस विद्यापीठ
  • राष्ट्रपती मॉरिशस च्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर होत्या
  • 8) सिप्रि च्या नवीन अहवालानुसार 2019 ते 2023 दरम्यान सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणारा देश कोणता ?
    • अमेरिका
    • फ्रांस
    • भारत
    • चीन
  • भारत
  • 9) महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता पोलीस पाटील यांचे महिना किती रु मानधन असेल ?
    • 13 हजार रु
    • 16 हजार रु
    • 18 हजार रु
    • 15 हजार रु
  • 15 हजार रु
  • 10) महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यात आले आहे. हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ?
    • पुणे
    • नाशिक
    • सातारा
    • कोल्हापूर
  • पुणे
  • 11) अग्नी 5 च्या निर्मितीत खालीलपैकी कोणत्या महिलेचा मोलाचा वाटा आहे ?
    • शीना राणी
    • किरण आहुजा
    • राधा अग्रवाल
    • किरण जाधव
  • शीना राणी
  • यांचे वय सध्या 57 एवढे आहे
  • यांच्या नेतृत्वाखाली कौटिल्य उपग्रह 2019 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता
  • 12) केंद्र सरकारने हैद्राबाद मुक्ती दिवस साजरा करण्याचे घोषित केले आहे. हा मुक्ती दिवस केव्हा साजरा केला जाणार आहे ?
    • 13 सप्टेंबर
    • 14 सप्टेंबर
    • 16 सप्टेंबर
    • 17 सप्टेंबर
  • 17 सप्टेंबर
  • 13) लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?
    • 106 वा
    • 108 वा
    • 110 वा
    • 111 वा
  • 108 वा
  • भारत 2021 च्या अहवालात 122 व्या क्रमांकावर होता
  • 14) मराठवाड्यातील कोच कारखान्यात वंदे भारत चे स्लीपर कोच तयार केले जाणार आहेत. हा मराठवाडा कोच कारखाना कोठे आहे ?
    • लातूर
    • नाशिक
    • अहिल्यानागर
    • कोल्हापूर
  • लातूर
  • या कोच चे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले
  • या कारखाण्याद्वारे 2026 पर्यंत स्लीपर कोच तयार करून मिळतील
  • 15) जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिप कोणत्या कंपनीचे आहे ?
    • स्पेस एक्स
    • स्पॉटलाईट
    • ब्ल्यू ओरिजिन
    • बिंगलो ऐरोस्पेस
  • स्पेस एक्स
  • हे रॉकेट अमेरिकेतील खाजगी कंपनी स्पेस एक्स ने अमेरिकेतून अवकाशात सोडले आहे
  • जास्तीस्त जास्त वजन वरच्या दिशेने पाठवणे हे या रॉकेट चे वैशिष्ट्य आहे
  • हे पण वाचा – चालू घडामोडी क्विझ 1 मार्च ते 10 मार्च 2024

    चालू घडामोडी क्विझ साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा

    Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment