भीमा नदी (bhima river )
उगम
भीमा नदीचा उगम पुण्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो. भीमा ही नदी कृष्णेची उपनदी आहे परंतु महाराष्ट्रातून स्वतंत्रपणे वाहते.
भीमा नदी कोणत्या दोन पर्वताच्या मधून वाहते ?
शंभू महादेव डोंगररांगेच्या उत्तरेकडून वाहते. हरिश्चंद्र बालाघाट च्या दक्षिणेकडून वाहते.
कोणत्या ठिकाणी भीमा आणि कृष्णा नदीचा संगम होतो ?
कर्नाटकातील कुरगुडडी येथे भीमा आणि कृष्णा नदीचा संगम होतो.
भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
451 किमी.
भीमा नदीचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ किती ?
46184 चौ किमी.
भीमा नदी महाराष्ट्रात कितव्या क्रमांकाची मोठी नदी आहे ?
गोदावरी नंतर भीमा नदी महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे.
भीमा नदीचे राजकीय क्षेत्र ?
भीमा नदी पूर्णपणे पुणे व सोलापूर जिल्ह्यातून वाहते. साताऱ्यातील खंडाळा, फलटण व मान तालुक्यातून वाहते. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून भीमा नदी वाहते व उस्मानाबाद मधील परांडा, भूम, तुळजापूर व उमरगा तालुक्यातून भीमा नदी वाहते जाते व पुढे कर्नाटकात कुरगुडडी येथे कृष्णा नदीस मिळते.
हे पण वाचा :- कृष्णा नदी
Bhima Nadi ani ghod Nadi cha jithe sangam hoto te thikan sangavi dumola he thikan shrivonda – nagar ithe yet mg nagar jilha ka include kela gela nahi