मराठीतील अलंकार || Marathi Alankar

भाषा सुंदर :–मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेत भाषा सुंदर करण्यासाठी अलंकाराचा वापर केला जातो. खाली आपण मराठीतील अलंकाराबद्दल माहिती घेणार आहोत.

मराठीतील अलंकाराचे प्रकार – marathi alankarache prakar

  • उपमा
  • उत्प्रेक्षा
  • रूपक
  • अपन्हुती
  • व्यतिरेक
  • अनन्वय
  • दृष्टांत
  • अर्थांतरन्यास
  • भ्रांतिमान
  • ससंदेह
  • अतिशयोक्ती
  • उपमा अलंकार – upmaa alankar

    एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी : — उपमा अलंकारात एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे असे सांगितले जाते. यात उपमेयाची उपमानासोबत तुलना केली जाते.

    सारखेपणा – सारखेपणा दर्शवण्यासाठी उपमा अलंकाराचा वापर केला जातो. यात दोन वास्तूतील सारखेपणा दर्शवला जातो

    उपमेय म्हणजे काय ?

    उपमेय :- उपमेय म्हणजे मुख्य घटक होय किंवा असा घटक ज्याची तुलना इतरासोबत केली जाते.

    उपमान म्हणजे काय ?

    उपमान :- उपमान म्हणजे एखाद्या घटकाची ज्याच्या सोबत तुलना केली जाते तो घटक.

    उपमा अलंकारांची उदाहरणे

    आंबा :- आंबा साखरे सारखा गोड

    वरील उदाहरणात आंबा हे उपमेय आहे व साखर ही उपमान आहे. येथे आंब्याच्या गोडपणाची साखरेच्या गोडपणा सोबत तुलना केली आहे.

    मुख :- मुख कमलासारखे सुंदर आहे.

    वरील उदाहरणात मुखाच्या सुंदरतेची तुलना कमळाच्या सुंदरतेशी करण्यात आली आहे. येथे मुख उपमेय व कमळ उपमान आहे.

    रंग :- सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी

    वरील उदाहरणात व्यक्तीच्या रंगाची तुलना पावसाळ्यातील ढगां सोबत केली आहे.

    उत्प्रेक्षा अलंकार – utpreksha alankar marathi

    उत्प्रेक्षा म्हणजे ? उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना होय.

    एक जणू दुसरी : — यात एक वस्तू जणू दुसरी वस्तूच आहे असा भास होतो. यात उपमेय जणू उपमानच आहे असे वाटते किंवा अशी कल्पना केली जाते यास उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात.

    उत्प्रेक्षा अलंकार उदाहरणे

    प्रेम जणू – ती गुलाबी उषा परमेश्वराचे प्रेम जणू

    रूपक अलंकार – rupak alankar

    एकरूपता – उपमेय व उपमान यांत एकरूपता आहे ते भिन्न नाहीत असे वर्णन जिथे असते तिथे रूपक अलंकार होतो.

    रूपक अलंकार उदाहरणे

    देवाचे मंदिर – देह देवाचे मंदिर || आत आत्मा परमेश्वर

    वरील उदाहरणात देह व मंदिर एकरूप झाले आहेत. देह हेच मंदिर असे सांगितले आहे म्हणजेच तिथे रूपक अलंकार झाला आहे.

    सोन्याचा गोळा – कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा

    वरील उदाहरणात सूर्य म्हणजेच सोन्याचा गोळा असे वर्णन करण्यात आले आहे. इथे सूर्य आणि सोन्याचा गोळा एकरूप झाले आहेत. म्हणजेच इथेपण रूपक अलंकार होतो.

    मातीचा गोळा – लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते

    वरील उदाहरणात लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा येथे लहान मूल व मातीचा गोळा एकरूप झाले आहेत म्हणजे येथे रूपक अलंकार झाला आहे.

    अपन्हुती म्हणजे ? – अपन्हुतीचा अर्थ लपवणे असा होतो.

    येथे उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे सांगतील जाते. यास अपन्हुती अलंकार म्हणतात.

    अपन्हुती अलंकार उदारहणे

    साखरच – हा आंबा नाही साखरच आहे.

    वरील उदाहरणात आंबा हा आंबा नसून साखरच आहे असे सांगितले आहे. इथे तुलना नाही किंवा एकरूपता नाही. उपमेय हे उपमानच आहे असे सांगितले आहे म्हणजेच अपन्हुती अलंकार होतो.

    नयन – न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजात

    व्यतिरेक अलंकार – vyatirek alankar

    सर्वश्रेष्ठ – उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे असे जेथे सांगितले जाते तेथे व्यतिरेक अलंकार होतो.

    व्यतिरेक अलंकार उदारहणे

    गोड – अमृताहूनी गोड नाम तुझे देवा

    वरील उदाहरणात देवाच्या नामाची गोडी अमृताच्याही गोडी पेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

    मवाळ, पातळ – तू माऊलीहुनही मवाळ, चंद्राहुनही शीतल , पाण्याहूनही पातळ, कल्लोळ प्रेमाचा

    अनन्ववय अलंकार – ananvay alankar

    उपमेय हे एखाद्या गुणांच्या बाबतीत एवढे श्रेष्ठ असते की त्याची तुलना करण्यासाठी उपमानच नसते तेव्हा अनन्ववय अलंकार होतो.

    अनन्ववय अलंकार उदाहरणे

    यासम हा – झाले बहु, होतिल बहु आहेतही बहु परंतु यासम हा.

    ताजमहाल – आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याचपरी

    दान – या दनासी या दानाहुन अन्य नसे उपमान

    दृष्टांत अलंकार – Drushtant alankar

    एखादी बाब सांगून झाल्यानंतर ती बाब समजून सांगण्यासाठी एखादे उदाहरण देणे म्हणजेच दृष्टांत अलंकार होय. यात दृष्टांत देऊन किंवा उदाहरण देऊन दिलेली गोष्ट किंवा बाब समजून सांगितली जाते.

    दृष्टांत अलंकार उदारणे

    लहानपण देगा – लहानपण देगा देवा|| मुंगी साखरेचा रवा ||ऐरावत रत्न थोर ||त्यासी अंकुशाचा मार ||

    चंदनाचे हात | पायही चंदन | तुका म्हणे तैसा सज्जनांपासून | पाहता अवगुण | मिळेचीन |

    अर्थान्तरण्यास अलंकार – arthantarnyas alankar in marathi

    सिद्धांत – एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ शेवटी एखादे उदाहरण किंवा सिद्धांत सांगितला जातो तेव्हा अर्थान्तरण्यास अलंकार होतो.

    अर्थान्तरण्यास अलंकार उदाहरणे

    बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होई गरल | श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरल |

    भ्रान्तिमान अलंकार – bhrantiman alankar

    भ्रम निर्माण – जेथे उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होतो त्यास भ्रान्तिमान अलंकार म्हणतात.

    भ्रान्तिमान अलंकार उदारहणे

    शुभ्र चांदणे थाळीत पडते दूध समजुनी मनी चाटते

    ससंदेह अलंकार – sasandeh alankar

    संदेह निर्माण – जेथे उपमेय कोणते व उपमान कोणते असा संदेह निर्माण होतो त्यास ससंदेह अलंकार असे म्हणतात.

    ससंदेह अलंकार उदाहरणे

    चंद्र व मुख – चंद्र काय असे, किंवा पद्म या संशयांतरी | वाणी मधुर ऐकोनि कळले मुख ते असे

    वरील उदाहरणात चंद्र आणि मुख कोणते यात संदेह निर्माण झाला आहे.

    अतिशयोक्ती अलंकार – atishayokti alankar

    फुगवून – कोणतीही बाब अतिशय फुगवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो

    अतिशयोक्ती अलंकार उदारहणे

    ती रडली समुद्रच्या समुद्र

    तुझे पाय असे भासतात जणू ते हवेवर नाचतात

    Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment