मूलभूत कर्तव्य — mulbhut kartavya

           
            समाजातील व्यक्तींनी किंवा देशाच्या नागरिकांनी समाजाप्रती व देशाप्रती काही महत्वपूर्ण जबाबदर्‍या पार पाडाव्या लागतात ह्याच जबादार्‍या किंवा कर्तव्याची तरतूद घटणे मध्ये करण्यात आली आहे.
                        1976 मध्ये 42 व्या घटनादुरूस्ती नुसार घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली व 11 वे मूलभूत कर्तव्य 2002 मध्ये 86 व्या घटनादुरूस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले. जगातील केवळ जपान च्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आल आहे. सरदार स्वर्ण  सिंह समितीच्या सिफारशीनुसार  घटनेमध्ये  मूलभूत कर्तव्यांचा  समावेश करण्यात आला आहे.
स्वर्ण सिंह समितिविषयी:—–
                        1976 मध्ये  सरदार स्वर्ण सिंह समितीची स्थापना करण्यात आली व याच समितीने मूलभूत कर्तव्यांचे प्रकरण घटणे मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 1976 च्या 42 व्या  घटनादुरूस्तीनुसार घटनेत भाग 4ए समाविष्ट करण्यात आले व त्यात कलम 51ए समाविष्ट करण्यात आले. सुरुवातीला यात 10 मूलभूत कर्तव्य टाकण्यात आली पुढे 2002 मध्ये 86 व्या घटनादुरूस्तीनुसार 11 वे कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आले.

घटनेतील मूलभूत कर्तव्य :—

1.      घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  
2.      ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 
3.      भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 
4.      देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 
5.      धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 
6.      आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 
7.      वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 
8.      विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 
9.      सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 
10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 
11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.   
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment