SBI मध्ये एक महिला बँक व इतर पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण

                   

                       स्टेट बँक ऑफ इंडिया 1955 च्या 35 व्या कलमानुसार 1 एप्रिल 2017 रोजी एक महिला बँक व इतर पाच सहयोगी बँका यांचे विलीनीकरण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये झाले.

no. एस बी आय मध्ये विलीन झालेल्या बँका
1 स्टेट बँक ऑफ हैद्राबाद
2 स्टेट बँक ऑफ म्हैसूर
3 स्टेट बँक ऑफ त्रावनकोर
4 स्टेट बँक ऑफ पटियाला
5 स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर
6 भारतीय महिला बँक
                         भारत सरकार च्या इंद्रधनुष कृती आराखड्याचा एक भाग म्हणून 6 बँकांचे विलीनीकरण करण्यात आले.  विलींनीकरणानंतर एसबीआय च्या एकूण 24 हजार च्या वर शाखा झाल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया चा बाजार भाग विलीनीकरना आधी 19 टक्के होता आता तो 24 टक्के झाला आहे. विलीनीकरना नंतर भारतीय स्टेट बँकेचा समावेश जगातील वरच्या पन्नास बँका मध्ये झाला आहे. विलीनीकरना नंतर एस बी आय च्या बँकेच्या एटीएम ची संख्या तब्बल 59 हजारावर गेली आहे. विलीनीकरना नंतर एस बी आय च्या मालमत्तेत भर पडली आहे. व तिची मालमत्ता एकूण 21. 9 लाख कोटी रूपायावर गेली आहे.

विलीन झालेल्या बँका विषयी 

स्टेट बँक ऑफ हैद्राबाद

                 या बँकेची स्थापना 1941 मध्ये करण्यात आली होती.  ती पूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया ची सहयोगी बँक म्हणून कार्य करत होती.  एसबीआय मध्ये विलीन होण्या आधी तिच्या एकूण 2000 ब्रांचेस होत्या व एकूण 18000 कर्मचारी होते.  

स्टेट बँक ऑफ म्हैसूर

                  या बँकेची स्थापना 1913 मध्ये करण्यात आले होते व स्टेट बँके मध्ये विलीन होण्या आधी तिचे मुख्यालय बेंगलोर येथे  होते. महाराजा कृष्ण राज वाडियार च्या काळात या बँकेची स्थापना करण्यात आली होती. 1953 मध्ये या बँकेला रिजर्व बँकेची एजेंट बँक म्हणून नियूक्त करण्यात आली होती. 

स्टेट बँक ऑफ त्रावनकोर  

                   या बँकेची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली असून एसबीआय मध्ये विलीन होण्या आधी तिचे मुख्यालय तिरूअनंतपुरम येथे होते. 1 एप्रिल 2017 ला तीच एसबीआय बँकेत विलीनीकरण करण्यात आले.

स्टेट बँक ऑफ पटियाला 

                    स्टेट बँक ऑफ पटियाला ची स्थापना 1917 मध्ये करण्यात आली होती. तिचे एसबीआय बँकेत विलींनीकरण होण्या आधी ती एसबीआय ची सहयोगी बँक म्हणून कार्य करत होती. पटियाला चे महाराज यांनी या बँकेची स्थापना केली. 

स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर

                     स्टेट बँक ऑफ बीकानेर व स्टेट बँक  ऑफ जयपूर यांच्या एकत्रीकरनातून 1963 साली स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर बँकेची स्थापना करण्यात आली होती. 

भारतीय महिला बँक 

                   19 नोव्हेंबर 2013 मध्ये भारतीय महिला बँकेची स्थापना करण्यात आली होतो. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते तिचे उद्घाटन झाले होते. या बँकेची स्थापना मुंबई येथे करण्यात आली होत. विशेष करून महिलाना बँकिंग सेवा पुरवण्यासाठी या बँकेची स्थापना करण्यात आली होती तसेच पुरुष देखील या बँकेत आपले खाते उघडू शकत होते. पाकिस्तान व टांझानिया नंतर महिला बँक असलेला भारत हा तिसरा देश ठरला होता.

    

                 

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment