लसावी:–
लसावी म्हणजे लघुत्तम सामाईक विभाजक होय
लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला उदाहरणात दिलेल्या सर्व संख्येने भाग जातो. त्या संख्येस लसावी असे म्हणातात.
समजा आपल्याला B व C या दोन संख्यांचा लसावी काढावायाचा आहे अशा वेळी आपल्याला अशी लहानात लहान संख्या शोधावी लागेल जिला B व C ने भाग जाईल. दिलेल्या संख्यांचे अवयव पाडून आपल्याला लसावी काढता येतो.
उदा ::
12 व 15 चा लसावी काढा. ?
वरील उदाहरणात आपण 12 व 15 चा लसावी काढला. जो 60 ही संख्या आहे. 60 अशी लहानात लहान संख्या आहे जिला 12 व 15 ने भाग जातो म्हणजेच 60 हा 12 व 15 चा लसावी आहे
उदाहरणात आपण अवयव पद्धतीने लासावी काढला. ज्यात आपण दिलेल्या संख्यांचे अवयव पाडले व त्या अवयवापैकी दोन्ही संख्येच्या अवयवा मध्ये दोनदा आलेल्या अवयांना वगळून इतर अवयांचा गुणाकार केला व शेवटी लसावी मिळवला. लसावी 90 हा आला आहे. म्हणजेच लसावी ला 30 ने पण भाग जातो व 45 ने पण 90 पेक्षा लहान संख्येला 30 किंवा 45 ने भाग जाणार नाही. 90 ही 30 व 45 ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या आहे त्या पेक्षा लहान संख्येस वरील दोन संख्येने भाग जाणार नाही. म्हणूनच 90 हा 30 व 45 चा लसावी होय. (लघुत्तम सामाइक विभाजक)
मूळ संख्यांचा लसावी
कोणत्याही मूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. (मूळ संख्या :- ज्या संख्यांना त्या संख्या व्यतिरिक्त केवळ 1 या अंकानेच भाग जातो त्यास मूळ या संख्या असे म्हणतात.)
उदा : 11 व 13 चा लसावी काढा ?
11 * 13 = 143
वरील प्रमाणे 11 व 13 चा लसावी 143 निघाला आहे आता 143 ला 11 किंवा 13 ने भागून बघा तर आपल्याला दुसरी संख्या मिळते म्हणजेच लसावी दिला असता व दोन्ही पैकी एक संख्या दिली असता आपल्याला दुसरी संख्या शोधण्यासाठी आपल्याला दिलेल्या संख्येने लसावी ला भागावे लागले.
अपूर्णांकाचा लसावी :-
अपूर्णाकांच लसावी कसा काढावा यासाठी आपण खालील उदाहरण समजून घेऊ यात
लसावी काढताना अंशातील संख्येचा लसावी काढावा व छेदातील संख्येचा मसावी काढावा. अपूर्णकांचा मसावी काढताना याच्या उलटे करावे.
चालू घडामोडी च्या क्विझ साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा