सिंधु संस्कृती बेसिक माहिती—sindhu sanskruti basic mahiti

महाराष्ट्रातील प्रमुख संस्कृती आणि त्यांचे कालखंड

     

            सुमारे 5000 वर्षापूर्वी जगातील चार प्रमुख नद्यांच्या काठी मानवी संस्कृती निर्माण झाल्या. यामध्ये तैग्रीस आणि युफ्रेटीस नद्यांच्या काठी मेसोपोटेमिया संस्कृती, नाईल नदीच्या काठी इजिप्त ची संस्कृती, सिंधु नदीच्या काठी सिंधु संस्कृती आणि हो हॅंग हो नदीच्या काठी चीनी संस्कृतीचा उदय झाला.
        नद्यांच्या काठी संस्कृतीच्या उदयाचे कारण म्हणजे मानवी जीवनास लागणारे महत्वाचा घटक पाणी नद्यांच्या काठी असलेली सुपीक गाळाची मृदा जेथे माणूस शेती करू शकत होता. जीवनास आवश्यक वस्तूंचा पुरवठा शेती पासून होत होता येथे प्रामुख्याने सिंधु संस्कृती विषयी चर्चा करण्यात आली आहे.
        शेतीस योग्य वातावरन आणि पाण्याचा उपयोग करून मानवाने शेतीतून अन्नधान्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. अन्न धण्याचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त झाल्याने त्यातूनच व्यवसायास पूरक असे वातावरण तयार झाले अनेक उद्योगाणी जन्म घेतला. यातूनच नागरी संस्कृतीची निर्मिती झाली.

सिंधु संस्कृती ———–

        सिंधु संस्कृतीचा पहिला उल्लेख चार्ल्स मेसन यांनी 1826 मध्ये केला. 1920- 21 साली लाहोर—मुलतान रेल्वेसाठी खोदकाम करताना सापडलेल्या विटा, मुद्रा व इतर पुरातत्वीय अवशेषामुळेच झाली. जॉन मार्शल, राखालदास बॅनर्जी, दयाराम साहणी, यांनी 1921 मध्ये हडप्पा शहराच्या उत्खनांनातून शोध लावला.
        हडप्पा हे शहर सिंधु संस्कृतीमधील सर्वप्रथम उत्खननीत स्थळ असल्याने व सिंधु संस्कृतीच्या इतर उत्खननीत शहरातील सर्वच लक्षणे या शहरात आढळत असल्याने सिंधु संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असे म्हणतात.  

       स्थान व विस्तार

       पूर्वेस आलमगिरपूर, पश्चिमेस सुत्केगेंडोर, दक्षिण महाराष्ट्रातील दायमाबाद व उत्तरेस जम्मू मधील मांडा आशा याच्या सीमा आहेत.  पूर्व पश्चिम 1600 किमी व दक्षिण उत्तर 1100 किमी यांची लांबी, रुंदी असून एकूण 12,99,600 चौकीमी भारताचा भाग याने व्यापलेला आहे. पंजाब, राजस्थान, गुजरात, बलुचिस्तान, हरियाणा व महाराष्ट्रा इत्यादि परदेशात या संस्कृतीचा विस्तार झालेला आहे.
        सिंधु संस्कृतीची वैशिष्टे —
        हडप्पा, मोहंजोडदो, रंगपूर, सुरकोटडा, कालीबांगण, रोपड, दायमाबाद मेहरगढ, चाहुदांडो. ढोलविर. अशा 400 हून अधिक ठिकाणच्या उत्खननीत अवशेषावरून सिंधु संस्कृतीची पुढील वैशिष्ठ्ये दिसून येतात.
·         सिंधु संस्कृती ही कांस्य युगीन संस्कृती आहे
·         ही एक नागरी व व्यापार प्रधान संस्कृती आहे.
·         सिंधु संस्कृतीमध्ये सामाजिक व धार्मिक वैमनस्यांचा अभाव दिसून येतो.
·         अन्य संस्कृतीशी सिंधु संस्कृतीचे व्यापारीक संबंध असल्याने उत्खननीत पुराव्यावरून दिसून येते.
·         सिंधु संस्कृतीमधील लोकांना लिपीचे ज्ञान होते.
·         सिंधु संस्कृती ही शांतताप्रिय संस्कृती होती.
·         सिंधु संस्कृतीमध्ये मंदिरांचा अभाव दिसून येतो.
·         सिंधु संस्कृतीत नगर नियोजनास महत्व होते.
·         सिंधु संस्कृतीच्या सर्व नगरांना तटबंदी होती.
 
 

     सिंधु संस्कृतीच्या शेवट —- 

          सिंधु संस्कृतीचा शेवट कसा झाला या बाबत विविध इतिहासकारांचे विविध मते आहेत काहींच्या मते हवामानातील बदल, सिंधु नदीच्या प्रवाहाच्या दिशेतील बदल,सततचा दुष्काळ यामुळे लोकांनी स्थलांतर केले असावे असे काही इतिहास कारांचे मत होते तर काही इतिहासकार आर्यांच्या आक्रमणामुळे, व्यापारतील मंदीमुळे व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही संस्कृती नष्ट झाली असावी असे मत नोंदविले आहे. ईसपूर्व 1750 ला सिंधु संस्कृतीचा शेवट झाला  





Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment