स्वामी विवेकानंद (swami vivekanand )

स्वामी विवेकानंद

     








     जन्म —- 12 जानेवारी 1863
     मृत्यू—- 4 जुलै 1902
     



     स्वामी विवेकानंद खूप मोठे आध्यात्मिक गुरु होते.  त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला कोलकता येथे जन्म झाला. त्यांच्या वडलांचे नाव विश्वनाथ दत्त व त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्त्यातिल एक प्रख्यात व्यक्ति होते. त्यांनी आपल्या धंद्यातून खूप पैसा कमविला होता. त्यांच्या पोटी स्वामी विवेकानंदा चा जन्म झाला.
      स्वामी विवेकानंदाचे पूर्व नाव नरेंद्र असे होते. पुढे चालून त्यांचे नाव स्वामी विवेकानंद असे पडले. त्यांचा जन्म दिवस 12 जानेवारी भारतीय युवा दिन (राष्ट्रीय युवा दिवस) म्हणून साजरा केला जातो. वयाच्या सातव्या वर्षी नरेंद्र दत्त (स्वामी विवेकानंद) ला शाळेत टाकण्यात आले. नरेंद्र शाळेतून वाईट संस्कार झाले म्हणून त्याच्या आईने त्याला शाळेतून काढले व स्वतः त्यास शिकवण्याची जिम्मेदारी घेतली. त्यास त्याच्या आईने बंगाली व इंग्रजी भाषा शिकविल्या तसेच रामायण व महाभारतातील गोष्टी सांगितल्या पुढे नरेंद्र हुशार झाला. त्यानंतर त्यास आठवीत शिकण्यास टाकण्यात आले.
        

       
      त्यांच्या जवळ विलक्षण बुद्धी होती पाहिल्याच वर्गात त्यांनी अमरकोश पाठ केला. एका मुसलमान गायकाकडुन नरेंद्र ने गायन शिकले. तो आखाड्यात जाऊन कुस्त्या खेळू लागले. त्यांनी यातूनच चांगले पिळदार शरीर कमावले. 1879 ला शाळा सुरू झाल्यानंतर त्यांनी ग्रंथालयात जाऊन अनेक मोठी मोठी ग्रंथे वाचली.
      मूर्ति मध्ये देव नाहीत, जाती नाहीश्या केल्याच पाहिजेत, स्त्रियांना शिक्षण दिलेच पाहीजेत हे विचार ऐकून त्यांच्या मनात गोंधळ होत असे. तेव्हा देव खरच आहे की नाही? असल्यास कोठे भेटेल? त्याची भेट कोण घडवून आणणार या सर्व विचारांनी त्यांचे मन अस्वस्थ झाले. ब्राम्हण मंडळी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकले नाही. तेव्हा प्राचार्‍य हेस्टी यांनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्याकडे पाठविले.
      स्वामी विवेकानंदांच्या गुरूचे नाव काय होते ? उत्तर — रामकृष्ण परमहंस
      

      रामकृष्ण परमहंसानी नरेंद्र मधील एक अद्वितीय पुरुष ओळखला होता. त्यांनी नरेंद्र ला मार्गदर्शन केले. सन 1881 साली डफ कॉलेजातून उत्तम गुणांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नरेंद्रांनी वडिलांच्या मृत्यू नंतर नोकरी करून घराच्या भार उचलण्या ऐवजी संन्यास घेतला म्हणून आप्तेष्टा मंडळी त्यांच्या मागे त्यांची निंदा करू लागले. पण नरेंद्रांनी गुरु कडून योग्य मार्ग मिळवला होता.
      15 ऑगस्ट 1886 रोजी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले. 31 मे 1893 ला स्वामी विवेकानंद अमेरिकेला निघाले हिंदू धर्माचा सर्व जगभर प्रसार करण्याचा त्यांचा उद्देश होता.
      त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे 4 जुलै 1902 ला त्यांच्या मृत्यू झाला.

स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल विशेष मुद्दे.

·         12 जानेवारी हा त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला.
·         11 सेप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत “बंधु-भगिनो” आशा संबोधनाने भाषण सुरू करून या 30 वर्षाच्या युवकाने जगाचा भारताकडे भागण्याचा दृष्टीकोन बदलला.
·         अमेरिकेत ओळख पत्र हरवल्यामुळे डॉ राइट यांनी त्यांची मदत केली होती.
·         “विवेकानंदांचा परिचय मागणे म्हणजे सूर्याला त्यांच्या प्रकाशाच्या आधिकाराचे पत्र मागण्यासारखे आहे” असे डॉ. राइट यांनी परिचय पत्रात लिहिला.  
·          शिकागो धर्मपरिषदेनंतर त्यांनी अमेरिकेत दोन वर्षे वास्तव्य केले परत येत असतांना टोकियो येथील धर्मपरिषदेत देखील त्यांनी भाग घेतला.
·         स्वामी विवेकानंदांच्या आदेशावरून 16 नोव्हेंबर 1893 अॅनी बेझंट भारतात आल्या.
·         विवेकानंदाला “हिंदू नेपोलियन” असे रोमा रोला या विचारवंताने म्हटले.
·         विवेकानंदांनी “वेदांकडे परत जा ” असे म्हटले.
·         ‘I am socialist’ हे पुस्तक विवेकानंदांनी लिहिले
·         1 मे 1897 ला कलकत्याजवळील बेलुर येथे रामकृष्ण मिशन ची स्थापना करण्यात आली
·         रामकृष्ण मिशन ची परदेशातील शाखा सॅंनफ्रान्सिस्को येथे आहे.
·         त्यांनी बेलुर येथे 1899 ला मायावती (हिमालय) येथे दोन मठ स्थापन केले.
·          विवेकानंदांनी उद्बोधन (बंगाली) व प्रबुद्ध भारत (इंग्रजी) ही वर्तमानपत्रे काढली.
·         4 जुलै 1902 ला कन्याकुमारी येथे त्यांचे निधन झाले. 




Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment