प्राथमिक लहरी
ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर सर्वप्रथम याच लहरी भूपृष्ठावर येतात. या लहरी द्रव पदार्थातून जातात. यांचा सरासरी वेग 5 किमी/सेकंद एवढा असतो. कठीण खडकाच्या ठिकाणी या जास्त जोरात पसरतात.
दुय्यम लहरी
प्राथमिक लहरीनंतर निघणाऱ्या लहरी. या चाहुबाजुनी पसरतात. यामुळे कणांची हालचाल वरखाली होते. या लहरी घन पदार्थातून जातात. या लहरी अधिक विध्वंसक आहेत. या लहरी द्रव पदार्थातून प्रवास करू शकत नाहीत. या लहरींचा वेग प्राथमिक लहरींच्या तुलनेत कमी असतो. पृथ्वीच्या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप असतो त्यातून या लहरी प्रवास करू शकत नाहीत.
भुपृष्ठ लहरी
भुपृष्ठ लहरी पृथ्वीच्या अधिक खोलात जात नाहीत. म्हणून यांना भूपृष्ठ लहरी म्हणतात. यांचा वेग कमी असतो. सर्व भूकंप लहरी मध्ये या लहरी अधिक विध्वंसक असतात. या लहरी केवळ पृथ्वीच्या गोलाभोवती फिरतात. पृथ्वीच्या आत जात नाहीत
1) कोणत्या भूकंप लहरी द्रवपदार्थातून प्रवास करू शकतात ?
उत्तर:— प्राथमिक लहरी
2) कोणत्या लहरी द्रव पदार्थातून प्रवास करू शकत नाहीत ?
उत्तर:—- दुय्यम लहरी
3) कोणत्या लहरी जास्त विध्वंसक असतात ?
उत्तर:— भूपृष्ठ लहरी
4) प्राथमिक लहरींचा वेग किती आहे ?
उत्तर:— 5 किमी / सेकंद
5) कोणत्या लहरी घन पदार्थातून जातात ?
उत्तर:— दुय्यम लहरी
6) भूकंप मापक यंत्रामध्ये सर्वात शेवटी कोणत्या लहरींची नोंद होते ?
उत्तर:— भूपृष्ठ लहरी