कशी झाली WTO ची स्थापना, कधी झाला GATT करार, GATT करार कशाशी संबंधित आहे

कशी झाली WTO ची स्थापना (WTO-world trade orgnisation)

 1 जानेवारी 1995 WTO ची स्थापना झाली

WTO च्या स्थापने आधी GATT करार अस्तित्वात होता तो करार रद्द करूनच WTO ची स्थापना करण्यात आली होती.

Q:– काय आहे GATT करार  ?

30 ऑक्टोबर 1947 ला 23 देशांनी जिनिव्हा येथे आयात व्यापरावरील प्रशुल्क कमी करण्याच्या दृष्टीने एक करार केला होता त्या करारास GATT करार असे म्हणतात.

GATT (Genaral Agreement on Tariff And Trade)

गॅट च्या चर्चेच्या फेऱ्या

1947 ते 1994 दरम्यान GATT विषयी च्या ज्या बैठका झाल्या त्यास  गॅट च्या फेऱ्या असे म्हणतात.

अशा आठ फेऱ्या झाल्या होत्या. गॅट च्या पहिली बैठक जिनिव्हा येथे झाली. ही बैठक प्रशुल्क कमी करण्याविषयी होती. इतर सात बैठकीत प्रशुल्कऐवजी इतर व्यापाराच्या अडथळ्याविषयी चर्चा करण्यात आली होती.
गॅट चा आठवा राउंड उरुगवे देशाच्या पुंडा डेला ईस्ट या ठिकाणी 1986 रोजी सुरू झाला. यात आंतरराष्ट्रीय व्यापरावरील प्रत्येक घटकावर चर्चा करण्यात आली.

प्रश्न :— गॅट चा 8 वा राउंड कधी व कोणत्या ठिकाणी पार पडला ?
उत्तर:—- उरुगवे देशाच्या पुंडा डेल ईस्ट या ठिकाणी 1986 ला.

डांकेल प्रस्ताव

काय आहे डांकेल प्रस्ताव ?

उरुगवे राउंड वर सहमती झाली नव्हती आणि कोणताही सामान्य करार झाला नव्हता त्यामुळे गॅट चे तत्कालिक महासंचालक ऑर्थर डांकेल यांनी स्वतःच एक विस्तृत प्रस्ताव तयार केला यास डांकेल प्रस्ताव असे म्हणतात.

या प्रस्तावाचे 15 डिसेंबर 1993 रोजी अंतिम कायद्यात रूपांतर करण्यात आले. आणि अशा तऱ्हेने उरुगवे फेरी जिनिव्हा येथे संपुष्टात आली.

15 एप्रिल 1994 ला भारतासह 124 देशांनी डांकेल प्रस्तावावर सह्या केल्या 12 डिसेंबर 1995 रोजी GATT संपुष्टात आला आणि त्या आधीच WTO ची 1 जानेवारी 1995 रोजी स्थापना झाली होती.

काही महत्त्वाचे प्रश्न.
1) WTO ची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर:– 1 जानेवारी 1995 ला.
2)GATT करार कधी संपुष्टात आला ?
उत्तर:– 15 डिसेंबर 1995 ला.
3) डांकेल प्रस्ताव कोणी मांडला होता ?
उत्तर:– GATT चे महासचिव ऑर्थल डांकेल यांनी.
4) डांकेल प्रस्तावावर किती देशांनी केव्हा सह्या केल्या होत्या ?
उत्तर:– भारतासह 124 देशांनी 15 एप्रिल 1994  रोजी सह्या केल्या होत्या.
5) GATT करार कधी करण्यात आला होता ?
उत्तर:— 30 ऑक्टोबर 1947 ला.
6) किती देशांनी मिळून GATT करार केला होता ?
उत्तर:– 23 देशांनी मिळून केला होता.
7) कोणत्या ठिकाणी GATT करार करण्यात आला होता ?
उत्तर:— जिनिव्हा येथे.

वरील माहितीत काही चुका असल्यास आमच्या FACBOOK पेज वर मेसेज करावा

फेसबुक:– MPSCMINDMAP

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment