फाजल अली आयोग – fajal ali commission in marathi

ऑक्टोबर 1953 मध्ये आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती भाषा या तत्वावर झाली. पोट्टी श्रीरामलु या काँग्रेस कार्यकर्त्याची 56 दिवसाच्या उपोषणामुळे मृत्यू झाली या मुळे आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करावी लागली.

आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मिती नंतर भाषावार राज्याची निर्मिती ची मागणी देशाच्या अन्य क्षेत्रातही जोर धरू लागली या विषयी चा अभ्यास करण्यासाठी फाजल अली आयोगाची स्थापना करण्यात आली.

   फाजल अली आयोग (faajal ali aayog in marathi)

          भाषावार प्रांताच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी फाजल अली आयोगाची स्थापना करण्यात आली.

        फाजल अली आयोगाचे सदस्य :-  फाजल अली (अध्यक्ष) , के. एम. पन्नीकर , एच. एन. कुंझरू
        डिसेंबर 1953 मध्ये फाजल अली आयोगाची स्थापना झाली व सप्टेंबर 1955 मध्ये फाजल अली आयोगाने आपला अहवाल सादर केला. या आयोगाने भाषा या तत्वावर राज्यनिर्मिती मान्य केली परंतु एक भाषा एक राज्य हे तत्व अमान्य केले.

   राज्य निर्मितीशी संबंधित कलम :-  कलम 3

       या कलमानुसार कोणतेही राज्य निर्माण करणे किंवा कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ कमी करणे अथवा वाढवणे या विषयी चे सर्व आधिकार संसदेकडे असतील. वरील बाबी करण्याआधी संसदेला राष्ट्रपती ची संमती घ्यावी लागेल. राष्ट्रपती संबंधित राज्याकडे या विषयी विचारणा करतील. संबंधित राज्याचा निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक असणार नाही
       कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ कमी करणे किंवा वाढवणे या बाबी साध्या घटनादुरुस्ती अनुसार केल्या जातात. यासाठी कलम 368 प्रमाणे घटनादुरुस्ती करण्याची आवश्यकता नसते.
 
 
   हे पण वाचा  : 
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment