sti psi aso साठी दरवर्षी एमपीएससी आयोगाद्वारे संयुक्त परीक्षा घेण्यात येते. या साठी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा याविषयी माहिती देत आहोत
STI PSI ASO
pre exam
- राज्यघटना :–रंजन कोळंबे, वी, मा. बाचल. लक्ष्मीकांत.
- इतिहास:– आधुनिक भारताचा इतिहास ग्रोव्हर आणि बेल्हेकर, महाराष्ट्राचा इतिहास महेश कठारे, इतिहास जयसिंगराव पवार. इतिहास जयसिंगराव पवारांचे छोटे पुस्तक. रंजन कोळंबे यांचा इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास साठी गाठाळ यांचा इतिहास रेफर करा. तसेच उपलब्ध असतील तर पुणे येथील पवन सरांचे इतिहासासाठी चे नोट्स.
- भूगोल :–महाराष्ट्राचा भूगोल ए बी सवदी, 5 वी ते 10 वी ची शालेय पुस्तके, महाराष्ट्राचा भूगोल खतीब यांचे पुस्तक,
- अर्थशास्त्र :–11 वी व 12 वी चे अर्थशास्त्र, रंजन कोळंबे यांचे अर्थशास्त्र, देसाई भालेराव यांचे अर्थशास्त्र,सध्या घडणार्य आर्थिक घडामोडी चा अभ्यास, जागतिक संस्थेद्वारे व भारत केंद्राद्वारे जाहीर करण्यात येणारी आकडेवारी व याद्या यांचा अभ्यास करावा. देसले सरांचे अर्थशास्त्र पुस्तक एक व दोन.
- गणित : पंढरीनाथ राणे, सतीश वसे यांचे fastrack math, गणितावर आधारित यूट्यूब videos. सचिन ढवळे सरांचे युट्युब व्हिडीओज तसेच त्यांची ऑनलाइन क्लासेस किंवा ऑफलाईन क्लासेस. सचिन ढवळे सरांची पुस्तके.
- बुद्धिमत्ता : अनिल अंकलंगी, fastrack बुद्धिमत्ता, सुरुवाती सरावासाठी पुलीस भारतीचा प्रश्नसंच सोडवावा. confusion दूर करण्यासाठी यूट्यूब वरील videos.सचिन ढवळे सरांची ऑफलाईन किंवा ऑनलाइन क्लासेस तसेच त्यांची पुस्तके.
- महितीचा आधिकार:-यशदा पुस्तिका. –
- संगणक व माहिती तंत्रज्ञान :अरिहंत व केसागर.
- समाज सुधारक :के सागर, किशोर लवटे. ( ज्या पुस्तकावर बेस्ट सेलर लिहिले असेल ती पुस्तके टाळा.) धूपस्तंभ चे समाजसुधारक पुस्तक टाळा अपूर्ण माहितीमुळे वेळ व गुणांचे नुकसान होऊ शकते.
- सामान्य विज्ञान :-– सामान्य विज्ञान सचिन भस्के, 5 ते 10 ची शालेय पुस्तके इंटरनेट व pdf मिळतील, रंजन कोळंबे यांचे विज्ञान व तंत्रज्ञान, चंद्र्कांत गोरे यांचे विज्ञान.
- श्रद्धा नोट्स चे मोठे पुस्तक
- चालू घडामोडी : लोकसत्ता पेपर, तसेच vision current affairs चे हिन्दी pdf, योजना, लोकराज्य निवडक मुद्दे. spotlight academy च्या युट्युब चॅनल वर दररोज 30 मिनिटे+ चालुघडामोडी विषयक लेक्चर घेतले जाते. online marathi current affairs या युट्युब चॅनल वर दररोज चालू घडामोडीशी संबंधित बारा प्लस प्रश्न घेतले जातात.
- पंचायतराज : — के सागर, किशोर लवटे लिखित.
main exam
प्री परीक्षेचा रीझल्ट आल्या नंतर जवळपास तीन महिन्यांनी मेन परीक्षा असते. मेन परीक्षेत दोन पेपर सोडवावी लागतात पहिला पेपर मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरनावर आधारित असतो व दूसरा पेपर इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायतराज, गणित , बुद्धिमत्ता इत्यादि विषयावर आधारित असतो. हे दोन्ही पेपर एकाच दिवसी असतात ज्यात एक पेपर सकाळून घेतला जातो व दूसरा पेपर दुपारून असतो.
पुस्तकांची यादी :—-
- मराठी व्याकरण व शब्दसंग्रहासाठी :—मो. रा. वाळंबे, शब्द सामर्थ्याचे कोणतेही एक पुस्तक, के सागर चे परिपूर्ण मराठी व्याकरण केवळ शब्द ज्ञान वाढवण्यासाठी. बाळासाहेब शिंदे यांचे मराठी व्याकरण इत्यादि. मागे झालेल्या परीक्षांचा प्रश्नसंच घ्यायला विसरू नका. सरावाने या विषयात स्कोअर वाढण्याची शक्यता वाढते.
- इंग्रजी विषयात आपल्याला व्याकरण , समानार्थी व विरुद्धर्थी शब्द, phrases and idioms व इंग्रजी म्हणी इत्यादींचा अभ्यास करावा लागतो. यासाठी पुढील प्रमाणे पुस्तकांचा वापर करावा. 1) पाल व सूरी यांचे english grammer and compostion, बाळासाहेब शिंदे यांचे इंग्रजी व्याकरण, अरिहंत व अग्रवाल यांचे इंग्रजी पुस्तक, तसेच एम जे शेख यांचे इंग्रजी पुस्तक. phrases and idioms साठी इंटरनेट वर pdf files available आहेत. online video लेक्चर्स हवे असतील तर इंग्रजी साठी आशा अकॅडमी चे app उत्तम राहील या ठिकाणी कमी दरात व कमी वेळेत इंग्रजीचे योग्य ते रिव्हिजन होईल.
- paper 2:–प्री साठी दिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करावा.
प्री व मेन च्या तयारी साठी आपण 5 वी ते 12 च्या शालेय पुस्तकांचा अभ्यास करावा