कर्नाटक युद्धे
प्रथम कर्नाटक युद्ध
- पहिले कर्नाटक युद्ध 1746 ते 48 दरम्यान झाले.
- युरोपात ऑस्ट्रिया युद्धा चा प्रारंभ झाल्यामुळे त्याचा परिणाम स्वरूप प्रथम कर्नाटक युद्ध घडून आले.
- कर्नाटक युद्ध इंग्रज व फ्रेंच यांच्यात घडून आले.
- पहिले कर्नाटक युद्ध घडून येत असताना कर्नाटक चा नवाब अनवरुद्दीन हा होता.
- दोन परकीय सत्ता कर्नाटक मध्ये लढताना पाहून कर्नाटक च्या नवाबाने आपल्या राज्याची शांतता भंग न करण्यास सांगितले परंतु अशात फ्रेंच गोव्हर्नर डुप्ले ने मद्रास जिंकल्यावर नवाबला देण्याचे आश्वासन दिले.
- डुप्ले ने दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे नवाबाने फ्रेंचा सोबत संघर्ष केला पण तो फ्रेंचांच्या छोट्या सैनिकांच्या गटा समोर हरला.
- प्रथम कर्नाटक युद्धात डुप्ले ने कोणत्या गोव्हर्नर ची मदत मागितली होती ? उत्तर :– मॉरिशिस चा गोव्हर्नर ला बोर्डेन .
- युद्धाचा शेवट :– एक्स ला शापेल च्या तहानुसार युरिपातील युद्ध संपले व त्यामुळे 1748 मध्ये कर्नाटक चे युद्ध देखील संपले.
द्वितीय कर्नाटक युद्ध
- दुसरे कर्नाटक युद्ध 1748 ते 54 मध्ये घडून आले.
- 1748 मध्ये निजाम उल मुल्क आसफजाह यांचा मृत्यू झाला व यांच्या मृत्यू मुळे हैद्राबाद च्या सत्ते साठी त्याच्या वारसा मध्ये संघर्ष सुरू झाला याचा फायदा घेऊन इंग्रज व फ्रेंचांनी भारतीय राजकारणात हस्तक्षेप केला.
· निजामाच्या मृत्यू नंतर कोणत्या दोन व्यक्ती मध्ये हैद्राबाद च्या सत्ते साठी संघर्ष सुरू झाला.? उत्तर :– निजामाचा मुलगा नासिरजंग व निजामाचा नातू मुजफ्फरजंग.
- हैद्राबाद येथे सत्ता संघर्ष चालू असताना कर्नाटक मध्ये नवाब अनवरुद्दीन व त्याचा मेहुणा चांदसाहेब यांच्यात देखील सत्ते साठी संघर्ष चालू झाला.
- फ्रेंच गोव्हर्नर डुप्ले याने निजामाचा नातू मुजफ्फरजंग व कर्नाटक नावाबाचा मेहुणा चांदसाहेब यांना समर्थन देण्याचे ठरवले.
- इंग्रजानी देखील कर्नाटक चा नवाब अनवरुद्दीन व निजाम उल मुल्क चा मुलगा नासिरजंग यांचे समर्थन करण्याचे ठरवले.येथेच दुसरे कर्नाटक युद्ध सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली.
· कोणत्या युद्धा मुळे डुप्ले ची कारकीर्द संपवण्यात आली. ? उत्तर:–दुसरे कर्नाटक युद्ध
- मुजफ्फरजंग, चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने 1749 मध्ये अंबुर जवळ कर्नाटक चा नवाब अनवरुद्दीन ला पराभूत करून ठार केले.
- पुढे डिसेंबर 1750 मध्ये निजाम उल मुल्क चा मुलगा नासिर जंग देखील।मारला गेला याचा फायदा घेऊन निजाम उल मुल्क चा नातूर मुजफ्फर जंग दक्षिणेचा सुभेदार बनला व त्याने आपल्या समर्थकांना बक्षिसे दिली.
· दुसऱ्या कर्नाटक युद्धा वेळी फ्रेंचानी कोणत्या दोन व्यक्तींचे समर्थन केले होते ? उत्तर :– निजाम उल मुल्क चा नातू मुजफ्फरजंग व कर्नाटक नवाबाचा मेहुणा चांदसाहेब.
- मुजफ्फरजंग च्या सांगण्यावरून बुसी च्या नेतृत्वाखाली एक फ्रेंच तुकडी हैद्राबाद ला ठेवण्यात आली.व तिकडे कर्नाटक मध्ये चांदसाहेब कर्नाटक चा नवाब बनला.
- अशा तऱ्हेने डुप्ले ला दोन्ही ठिकाणी यश मिळाले.
- परंतु फ्रेंच गोव्हर्नर डुप्ले चे हे यश जास्त काळ टिकू शकले नाही कारण कर्नाटक चा नवाब अनवरुद्दीन याचा मुलगा मुहम्मदअली हा त्रिचनापल्ली ला जिवंत होता त्यास मारण्यासाठी फ्रेंच व चांदसाहेब यांनी प्रयत्न केले परंतु इंग्रजाना मोहम्मद अली यास वाचवण्यास यश आले. 1752 च्या जून मध्ये त्रिचन्नापल्ली ला वेडा घातलेल्या फ्रेंच सैनिकांनी इंग्रज सैनिका समोर शरणागती स्वीकारली त्यामुळे फ्रेंचांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. हे सगळे घडत असताना चांदसाहेब तंजावर च्या राजाकडून मारला गेला. हे सर्व घडल्यामुळे फ्रेंचांची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्या मूळे डुप्ले ला मायदेशी परत बोलावण्यात आले.
· डुप्ले नंतर कोणत्या व्यक्तीला फ्रेंच गोव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले.? उत्तर :— गॉडेव्ह्यू.· पोंडेचरी च्या तहामुळे दुसरे कर्नाटक युद्ध संपुष्टात आले.
तिसरे कर्नाटक युद्ध
-
- तिसरे कर्नाटक युद्ध 1756 ते 1763 दरम्यान लढण्यात आले. युरोपात 1756 ते 1763 मध्ये झालेल्या युद्धास सप्तवर्षी युद्ध
- फ्रेंच सरकारने पाठवलेला काऊंट लाली एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला.
- काऊंट लाली भारतात येण्या आधीच इंग्रजानी सिराजउडदौला पराभूत करून बंगाल वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
- कोणत्या युद्धाने फ्रेंचांचा पराभव झाला? तिसरे कर्नाटक युद्ध.
- 1758 ला सेंट डेव्हिड किल्ला जिंकून घेतल्या नंतर काऊंट लाली याने 56 लक्ष रु साठी तंजावर वर हल्ला केला परंतु लाली ची ही मोहीम अपयशी ठरली.
- काऊंट लाली ने मद्रास ला वेढा घातला परंतु इंग्रजांच्या शक्तिशाली आरमार मुळे फ्रेंचांना हा वेढा उठवावा लागला. लाली ने हैदराबाद येथून बुसी ला बोलावून घेतले तरीही त्याचा काही फायदा झाला नाही व इंग्रजानी फ्रेंचांस हरवले. वांदीवाश येथे फ्रेंचाचा शेवट चा पराभव झाला.
· 1760 मध्ये कोणत्या इंग्रज सेनानी ने वांदीवाश येथे फ्रेंचांचा पराभव केला. ? उत्तर :– सेनानी सर आयरकूट.
- पुढे इंग्रजानी पोंडेचरी ला वेढा घातल्या नंतर फ्रेंचांनी पोंडेचरी देखील इंग्रजांच्या स्वाधीन केले.
- 1763 च्या पॅरिस च्या तहाने युरोपातील इंग्रज फ्रेंच युद्ध संपल्याने भारतात देखील इंग्रज फ्रेंच संघर्ष थांबला.
- या युद्धाने फेंचांचा निर्णायक पराभव झाला.