कोकण रेल्वेची स्थापना
………….कोकण रेल्वे, कोकण रेल्वे महामंडळाद्वारे चालवली जाते. कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना 19 जुलै 1990 ला करण्यात आली. आणि याच महामंडळाने 1993 ला कोकण रेल्वेच्या बांधकामाचे कार्य सुरू केले. मुंबई ते कर्नाटकातील मंगळूर दरम्यान कोकण रेल्वेचा रूळ टाकण्यात आला. काही ठिकाणी रोहा ते मंगलोर दरम्यान कोकण रेल्वे धावते अशी नोंद आहे. या रेल्वेच्या निर्मिती साठी जवळजवळ 22 हजार कोटी रु एवढा खर्च आला. यातील 51 टक्के निधि केंद्र सरकार ने पुरवला केंद्रा नंतर सर्वाधिक निधि महाराष्ट्राने पुरवला तसेच सर्वात कमी निधि केरळ आणि गोवा या राज्यांनी पुरवला. कोकण रेल्वे पहिल्यांदा कधी धावली याचे उत्तर असे सांगता येईल की 26 जानेवारी 1998 ला कोकण रेल्वे पहिल्यांदा धावली. म्हणजेच 1993 ला सुरू झालेले कोकण रेल्वे चे बांधकाम 1998 ला पूर्ण झाले. कोकण रेल्वेची एकूण लांबी 843 किमी एवढी आहे. कोकण रेल्वे मार्गावर एकूण स्टेशन किती आहेत असे विचारले असता आपल्याला त्यांची संख्या 68 सांगता येईल.
कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या दृष्टीने
………….कोकण रेल्वे ची महाराष्ट्रातील लांबी 382 किमी एवढी धावते. कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्रातील स्टेशन ची संख्या 34 एवढी आहे. कोकण च्या विशिष्ट अशा नैसर्गिक रचनेमुळे कोकण रेल्वे दर्यांतून व घाटातून प्रवास करते. या वैशिष्ट्यामुळे कोकण रेल्वे पर्यटकांना आकर्षित करण्यात देखील यशस्वी ठरली आहे. कोकण रेल्वे मार्गावर एकूण 1360 छोटे मोठे पूल आहेत त्यातीलच एक आशिया खंडातील सर्वात उंच पूल पानावळ पूल महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे ज्याची ऊंची 65 मीटर एवढी आहे. तो पूल पानावळ नदीवर स्थित आहे.
…………कोकण रेल्वे मार्गावर एकूण 73 बोगदे आहेत आणि या बोगद्यांचा एकत्रित विचार करता एकूण लांबी 37 किमी आहे. म्हणजेच कोकण रेल्वे 37 किमी एवढा प्रवास केवळ बोगद्यातून करते.कोकण रेल्वे मार्गात सर्वात लांब पूल शरावती नदीवर आहे ज्यांची लांबी आपणास 2.2 किमी एवढी सांगता येईल. कोकण रेल्वे मार्गातील सर्व पूलांच्या लांबीची बेरीज केली असता 273 किमी एवढी येईल म्हणजेच कोकण रेल्वे एकूण प्रवासापैकी 273 किमी एवढा प्रवास केवळ पुलावरुण करते. कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा करबुडे हा आहे ज्याची लांबी 6.45 किमी एवढी आहे. उक्षी ते भोके या दोन ठिकाणादरम्यान हा बोगदा आहे.
कोकण रेल्वे मार्गावर वरील बोगदे लांबी नुसार
- करबुडे बोगदा – याची लांबी 6.45 किमी एवढी आहे
- नातूवाडी बोगदा – याची लांबी 4.40 किमी एवढी आहे (जी. रायगड)
- टिके बोगदा – याची लांबी 4.07 किमी एवढी आहे (जी. रत्नागिरी)
- बर्डेवादी बोगदा – याची लांबी 4 किमी एवढी आहे. (जी रत्नागिरी)
- सावर्डे बोगदा – याची लांबी 3.42 किमी एवढी आहे (जी रत्नागिरी)
कोकण रेल्वे मुळे महत्वाच्या शहरांतील कमी झालेले अंतर व वेळेची बचत
- कोकण रेल्वे मुळे मुंबई ते कोचीन दरम्यान चे अंतर 513 किमी ने कमी झाले.
- कोकण रेल्वेमुळे मुंबईत ते मंगलोर दरम्यान चे अंतर 1127 किमी ने कमी झाले.
- कोकण रेल्वेमुळे मुंबई ते गोवा दरम्यान चे अंतर 185 किमी ने कमी झाले.
- कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यान प्रवासाची वेळ 12 तासाने कमी झाली.
- कोकण रेल्वेमुळे मुंबई ते मंगलोर दरम्यान प्रवासाची वेळ 26 तासाने कमी झाली.
- कोकण रेल्वेमुळे मुंबई ते गोवा दरम्यान ची वेळ 10 तासाने कमी झाली
———-कोकण रेल्वे मार्गातील महत्वाची स्थानके उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढील प्रमाणे सांगता येतील. मुंबई, रोहा, कोलड, इंदापूर, मानगाव, गोरेगाव, वीर, कारंजा, खेड, अंजणी, चिपळूण, कामठा, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, वेळवंडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग. हे परीक्षेला विचारले जात नाही तरीही आपण नकाशा पाहून घ्यावा.
———– हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात अवघड व सर्वात मोठा प्रकल्प मानता येईल कारण ज्या मार्गावर ही रेल्वे उभी करण्यात येणार होती तो मार्ग नैसर्गिकरित्या अव्हानांनी भरलेला होता. अनेक डोंगर दर्या, नैसर्गिक वातावरण, प्रचंड पाऊस असा तो भाग होता परंतु हा प्रकल्प अवघ्या काही वर्षात पूर्ण करण्यात आला. हा रेल्वे मार्ग उभारणीत मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस नेत्यांनी विशेष प्रयत्न केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मदुरे या स्थानकानंतर कोकण रेल्वे गोवा राज्यात प्रवेश करते. कैलासवासी अ ब वालाकर यांनी कोकण रेल्वे ची संकल्पना मांडली व सतत वृत्तपत्रांच्या माध्यमातून व माहिती पुस्तिका प्रकाशित करून ती कोकणच्या नागरिकांना पटवून दिली. भारताच्या पहिल्या लोकसभेत कोकण रेल्वेची मागणी करणारे पहिले भाषण स्वातंत्र्यसैनिक advocate मोरोपंत जोशी यांनी केले. एवढेच नाही तर नाथपै यांनी रेल्वे च्या अर्थसंकल्पात कोकणात रेल्वे साठी आर्थिक तरतूद नाही यासाठी 1 रु ची कपात सुचवली होती आणि आपल्या माहीत आहे की ही कपात मंजूर झाल्यास सरकार कोसळते. परंतु ती कपात नामंजूर झाली. पुढे बिगर 1990 च्या बिगर कॉंग्रेसी सरकार मध्ये मधु दंडवते अर्थमंत्री झाले व जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री झाले.
————कोकण रेल्वे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा निधि उभारणे गरजेचे होते आणि त्यासाठीच कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली. याचे पहिले अध्यक्ष कुशल व अनुभवी अभियंता इ-श्रिधरण हे होते. या महामंडळाच्या माध्यमातून केंद्र व लाभार्थी राज्यांकडून निधि संकलित करण्यात आला तसेच यासाठी कर्जरोखे देखील काढण्यात आले होते. कोकण रेल्वे मार्गातील मंगळूर ते उडपी या मार्गावर 20 मार्च 1993 ला पहिली रेल्वे धावली असे म्हणता येईल. या रेल्वे उभारणीत भूमी अधिग्रहणात देखील अनेक अडचणी आल्या. मुख्यत्वे गोवा या ठिकाणी अशा अडचणी उभ्या राहिल्या होत्या. आणि अशा अनेक अडचणीतुन कोकण रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली. ही रेल्वे रेल्वेच्या इतिहासातील चमत्कारच मानली जाते.