महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 ला आफ्रिकेहून भारतात आले. 9 जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्वाचे व्यक्ति असून त्यांनी भारतीय राजनीति ला संपूर्णतया बदलून टाकले होते. सत्याग्रह व अहिंसा हे त्यांचे प्रमुख साधने होत ज्या द्वारे त्यांनी अनेक चळवळी यशस्वी केल्या. कोणतीही हिंसा न करता आपल्या मागण्या पूर्ण करून घेणे हे त्यांच्या सत्याग्रहाचे प्रतीक होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात आफ्रिकेमध्येच केली होती. त्यांनी आफ्रिकेमध्ये गोर्या लोकांच्या वर्णद्वेषा च्या धोरणाच्या विरोधात सत्याग्रह केला होता. राजकरणाला पूर्णतया वेगळे वळण लावणारे व्यक्ति म्हणून गांधीजी इतिहासात प्रसिद्ध आहेत. शांततेच्या मार्गाने चळवळ करावयाची त्यासाठी तुरुंगवास, क्लेश सोसण्यास तयार असत. परिस्थिति प्राण घेण्यावर आली तरीही सत्याग्रहाचा मार्गा सोडावयाचा नाही हे त्यांचे धोरण असे.
चंपारण्य सत्याग्रह (1917)
बिहार मध्ये नीळ पिकवणार्या शेतकर्यावर तेथील इंग्रज मळेवाले व्यक्ति नीळ लावण्याची सक्ती करत असत. तेथील सर्व मळे ब्रिटीशांच्या मालकीची असत. नीळ हे नगदी पीक असून ती नीळ विकून तेथील मळे वाली भरपूर धन कमावित पण त्याच्या विपरीत खूप कष्ट करून काम करणारे तेथील शेतकरी त्यांची आरतीक परिस्थिति खूप बिकट होती. अशा परिस्थितीत गांधीजींनी शेतकर्यांचे नेतृत्व करून त्यांचा लढा यशस्वी केला. गांधीजींना चंपारण्यात प्रवेश करण्यात ब्रिटिश पोलिसांनी मनाई केली होती. त्यांनी तसे न करते चंपरण्यात प्रवेश केला त्यामुळे इंग्रजी पोलिसांनी त्यांच्या विरोधात खटला भरला होता. गांधीजींनी गुन्हा कबूल करून आपल्याला शिक्षा करावी असे संगितले. सर्व देशभर या खटल्याची चर्चा झाली. लोकमताच्या दबावाखाली सरकारला हा खटला वापस घ्यावा लागला. तसेच चंपरण्यात शेतमजुरावर होणारे अन्याय देखील इंग्रज मळेवाल्यांना थांबवावे लागले. आता भारतीय राजकरणात नवे व्यक्तिमत्वे आले आहे याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. येथूनच गांधींचा भारतीय राजकरणात प्रवेश झाला.
अहमदाबादच्या गिरणी कामगारांचा संप (1918)
शेतकर्यांच्या प्रश्नाप्रमाणे गांधीजींनी गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे देखील लक्ष दिले. अहमदाबाद येथील गिरणीत काम करणार्या मजुरावर तेथीतल गिरणी मालक खूप अन्याय करीत. या न्यायाविरुद्ध कोण्या ना कोण्या व्यक्तिला आवाज उठवावा लागणार होता. याचा भार गांधीजींनी आपल्या डोक्यावर घेतला त्यांनी तेथील सर्व गिरणी कामगारांना संघटित केले व 1918 साली संप पुकारला. हा संप रेंगाळला गिरणी कामगार देखील ढीले पडू लागले गांधीजींनी हे पाहून आमरण उपोषण जाहीर केले. हे पाहून गिरणी कामगारात नवचैतन्य पसरले व त्यांनी पुन्हा संपात सहभाग घेतला. उपोषणाच्या चौथ्या दिवसी तेथील गिरणी कामगारांनी कामगारांना 35 % वेतनवाढ देण्याचे कबूल केले. अशा प्रकारे अहमदाबाद येथील गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यात आला.
खेडा सत्याग्रह -1918
गुजरात मधील खेडा गावी शेतकर्यांच्या शोशांनाविरुद्ध गांधीजी सत्याग्रह पुकारला. अशा प्रकारे तेथील जुलमी लोकांना देखील शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या.
रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह-1919
इंग्रज सरकारने 1919 साली अन्यायकारक रौलेट कायदा लादला. हिन्दी जनतेची गळचेपी करणारा हा अन्यायकारक कायदा कायदेपुस्तिकेत राहू देणार नाही अशी शपथ गांधीजींनी घेऊन याविरुद्ध सत्याग्रहास सुरुवात केली. गांधीजींनी 6 एप्रिल 1919 रोजी संपूर्ण देशात हरताळ पाळण्याचे जनतेला आव्हान केले. या कायद्यिरुद्ध अनेक ठिकाणी मोर्चे निघाले. तसेच या मोर्चावर इंग्रज पोलिसांनी लाठी हल्ले देखील केले परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. रौलेट कायद्याक्या विरोधात सत्याग्रहासाठी 6 एप्रिल व 30 मार्च हे दोन दिवस ठरवण्यात आले होते. ह्या चळवळीला हिंसक वळण लागल्याने गांधीजींनी ही चळवळ तहकूब केली
खिलाफत चळवळ 1919 व गांधीजी
तुर्कस्तान येथील खलिफा हा सर्व मुस्लिमांचा धर्मगुरू म्हणून ओळखला जातो. 1914 ला पहिले महायुद्ध सुरू झाले या युद्धात तुर्कस्तान इंग्रजाच्या विरोधात जर्मनीच्या बाजूने उतरला. इंग्रजांच्या सैन्यात बरेच सैनिक मुस्लिम होते ते आपल्या खलिफाच्या विरोधात लढण्यास तयात नव्हते परंतु इंग्रजांनी त्यांच्या खलिफाला काही त्रास होणार नाही असे मुस्लिम सैनिकांना आश्वासन दिले होते. परंतु इंग्रजांनी ते आश्वासन पाळले नाही. परिणामी तुर्कस्थान चे साम्राज्य नष्ट करू नाही म्हणून मौलाना महम्मद अली व मौलाना शौकत अली यांनी इंग्रजांच्या विरोधात खिलाफत चळवळ सुरू केली. स्वतः टिळकांनी सुधा या चळवळीला पाठिंबा दिला.
तुर्कस्तान च्या राजास त्रास दिल्या बद्दल भारतीय मुसलमानात इंग्रजाच्या विरोधात मत तयार झाले. याचा फायदा आपण घ्यावा असे महात्मा गांधी व लाला लाजपतराय यांना वाटू लागले. त्यामुळेच 24 नोव्हेंबर 1919 रोजी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय खिलाफत कॉन्फरन्स ही सभा स्थापन करण्यात आली. आणि यातच सर्व हिंदू व मुस्लिम यांनी खिलाफत चळवळीच्या सोबत उभे राहावे असे आव्हान केले. पुढे तुर्कस्तान मधील परिस्थिति भारतीय मुस्लिमांच्या मनासारखी झाल्या मुळे पुढे ही चळवळ थंडावली.
भारतीय राजकरणावर परिणाम करणार्या चळवळी
असहकार चळवळ:
खिलाफत चळवळी नंतर महात्मा गांधीजींनी संपूर्ण देशव्यापी चळवळ उभी करण्याचा निर्णय घेतला. पुढे सेप्टेंबर 1920 च्या कॉंग्रेस च्या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीचा ठराव मंजूर करवून घेतला. सी. आर. दास. बेझंट इत्यादि नेत्यांनी या चळवळी ला विरोध केला होता परंतु हा ठराव शेवजी मंजूर झाला. आणि लवकरच असहकार चळवळ हे राष्ट्रीय सभेचे अधिकृत धोरणच बनले. या ठरावात पुढील बाबींचा समावेश होता.
- हिन्दी लोकांनी इंग्रजी प्रशासनातील सर्व नोकर्यांचा त्याग करावा.
- ब्रिटिश शासनाच्या प्रत्यक सभा, समारंभावर बहिष्कार टाकावा.
- ब्रिटिश शाळा कॉलेज वर बहिष्कार टाकावा. व स्वदेशी शाळेची निर्मिती करून राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करावा.
- सरकारी न्यायालयावर बहिष्कार टाकून आपापसातील तंटे ग्रामसभेच्या मध्येमातून सोडवावे.
- इंग्रजांच्या कायदेमंडळावर बहिष्कार टाकावा.
- दैनंदिन उपभोगामध्ये केवळ स्वदेशी वस्तूंचा वापर करावा.
- प्रत्येकाने ब्रिटिश मलावर बहिष्कार टाकावा.
- प्रत्येक माणसाचे अंतिम ध्येय स्वराज्य प्राप्त करणे हेच असावे.
राष्ट्रसभेने मंजूर केलेला ठराव जर प्रत्येक हिन्दी व्यक्तीने अमलात आणला तर एका वर्षाच्या आत हिंदुस्तानाला स्वराज्य मिळवून देईल असा प्रचार महात्मा गांधी करू लागले. जवळपास सर्व हिन्दी लोकांनी स्वदेशी मालाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. व परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. देशातील लघु व कुटीर उद्योगामध्ये पुन्हा उत्पादन कार्य सुरू झाले.
चळवळीचा शेवट : असहकार चालवलीने पूर्ण हिंदुस्थानातील इंग्रजाच्या मनात भीती चे वातावरण निर्माण केले होते. चळवळीचे कार्यक्रम सर्वत्र जोमाने सुरू असतानाच अशी घटना घडली जी नको व्हायला पाहिजे होती.
उत्तरप्रदेशातील चौराचौरी या ठिकाणी 5 फेब्रुवारी 1922 रोजी एका मिरवणुकीवर गोळीबार केला.गोळीबार केल्यामुळे उठाव वाले संतापले व त्यांनी पुलीस कचेरीवर हल्ला करून पोलिस स्टेशन जाळले यात जवळ जवळ 21 पोलिसवाले मारले गेले. हे महात्मा गांधीजीनच्या कानी पडल्यावर त्यांनी ही चळवळी मागे घेतली या सोबतच या चळवळीचा शेवट झाला. याचा फायदा घेऊन महात्मा गांधीजींना 10 मार्च 1922 रोजी अटक करून सहा वर्षाची सजा सुनावण्यात आली.
कायदेभंग चळवळ
कायदामोडून इंग्रजांचा विरोध करावा यासाठी कायदेभंग चळवळ सुरू करण्यात आली. 14 फेब्रुवारी 1930 रोजी राष्ट्रीय सभेने संपूर्ण जनतेला सविनय कायदेभांगाचा आदेश दिला. यात गांधीजींनी स्वतः पुढाकार घेतला. 12 मार्च 1930 साबरमतीच्या आश्रमातून 78 निष्ठावंत कार्यकर्त्या सोबत महात्मा गांधी दांडी यात्रेला निघाले. ते 5 एप्रिल ला दांडी येथे पोहचेल त्या ठिकाणी महात्मा गांधींनी समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवले व कायद्याचा भंग केला. आशा प्रकारे सर्वत्र कायदेभंग होऊ लागले. परदेशी मालाची होळी होऊ लागली.
गांधीजी यांचा जन्म आणि मृत्यू
गांधीजी यांचा जन्म
गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 ला गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला.
गांधीजी यांचा मृत्यू
गांधीजी यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 ला झाला. दिल्ली येथील बिर्ला मंदिरात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आपाबेन च्या मांडीवर आपले प्राण सोडले. त्यांचे शेवटचे वाक्य हे राम होते.
गांधीजींची हत्या नथुराम गोडसे
30 जानेवारी 1948 ला दिल्ली येथील बिर्ला मंदिरात नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली होती. नथुराम चा सहकारी नारायण आपटे हा होता.
मृत्यू च्या वेळी गांधीजींचे वय
1948 ला गांधीजींचा मृत्यू झाला होता तेव्हा त्यांचे वय 78 होते.
महात्मा गांधीजी यांची समाधी
महात्मा गांधीजी यांची समाधी दिल्ली येथील राजघाट येथे आहे.