साने गुरुजी –saane guruji

साने गुरुजी
जन्म 24 डिसेंबर 1899
मृत्यू 11 जुन 1950   
साने गुरुजी हे नाव मराठी साहित्यात आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अत्यंत तेजोमय नाव आहे
      साने गुरुजींनी समतेच्या क्रांतीची स्वप्ने पाहिली. बहिष्कृत, वंचितांच्या, उपेक्षितांच्या लढ्याचे नेतृत्व केले. गुरुजींनी कष्टकर्‍यांच्या, कामकर्‍यांच्या शेतकर्‍यांच्या हितासाठी लेखनी वाणी झिजवली.
      आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींना
            “साने गुरुजी शाम ची आई म्हणजे मातेचे महामंगल स्त्रोतच होय ” असे म्हटले
            साने यांचे घराने मूल देवरुख चे होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्त्यातील पालगड या गावाचे श्री सदाशिवराव उर्फ भाउराव आणि सौ यशोदाबाई उर्फ बायो या दांपत्यांच्या पोटी 24 डिसेंबर 1899 रोजी साने गुरुजींचा जन्म झाला
      त्यांचे बारश्याच्या दिवासी ठेवलेले नाव पंढरीनाथ हे होते. पुढे त्याचे शाळेत नाव घालण्या वेळी त्यांचे नाव झाले पांडुरंग. पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचे पूर्ण नाव नंतर पुढे ते महाराष्ट्राचे साने गुरुजी म्हणून प्रसिद्धीस आले.
     त्त्यांना घरात आणि गावात पांढरी म्हणून हाक मारली जात असे
राम नावाचा मित्र
      त्यांना राम हे नाव फार प्रिय होते. त्यांनी त्यांच्या आईला सुधा विचारून टाकले. की माझे नाव राम का ठेवले नाही. पण नंतर पुढे त्यांना राम नावाचा मित्र भेटला त्यांच्या शाळेत. ही त्यांची मैत्री पुढे आयुष्यभरासाठी टिकली. पुढे साने गुरुजींना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत राम नावाच्या मित्राची बरीच मदत लाभली
शामची आई पुस्तक
      साने गुरुजींनी शामची आई हे पुस्तक लिहिले. शाम कसा घडला, कसं वाढला, त्याची संपूर्ण हकीकत त्यांनी या पुस्तकात शब्दबद्द केली आहे.
      ह्या पुस्तकाच्या प्रारंभी आपल्याला बालपणी आईकडून मिळालेले उदंड प्रेम आणि शुभ संस्कार जीवनभर कसे पुरले ह्या विषयी लिहिण्यात आली आहे. माणूस कसा आई वडलामुळे घडतो या बद्दल या पुस्तकात सांगण्यात आले आहे . ह्या पुस्तकातील शाम म्हणजे स्वता साने गुरुजी होत.
लहानपणीच्या आठवणी
      आता साने गुरुजी चे बालपण सुरू झाले आहे आता आपण त्यांना शाम या नावाने संबोधू
      शाम चे वडील भल्या पहाटे उठून मुलांना श्लोक , भुपाळ्या, अभंग, आदि शिकवायचे त्यामुळे शामचे कितीतरी श्लोक आणि इतर पाठांतर झाले होते.
      जेवणाच्या वेळी श्लोक म्हणायचे असि घरात पद्धत होती वडील श्लोक म्हणून घ्यायचे आणि त्याचा अर्थही सांगायचे,
      एके दिवसी सारे जेवायला बसले होते. आईने रताळयांच्या पानांची भाजी केली होती. ती भाजीत मीठ घालायला विसरली. परंतु वडील या विषयी जेवताना काहीही बोलले नाहीत म्हणून मुलेही बोलली नाहीत. जेवणे झाली पसारा आवरून आई जेवायला बसली अरे हे काय भाजी तर  आळणी झाली . आईला वाईट वाटले. वडिलांनीही दुखावले नाही आणि आईलाही वाईट वाटले. दुसर्‍याचे मन न दुखवणारे वडील चांगले की मनाला लाऊन घेणारी आई चांगली, दोघेही चांगले. याचा परिणाम श्याम च्या मनावर झाला. संयम आणि समाधाना प्रमाणे कार्यकुशलतेवर भारतीय संस्कृती टिकलेली आहे. हे दोन्ही धडे मला आई वडिलांनी दिले असे शाम म्हणाला.
 गुरुजींचे शिक्षण
      कोकणातील पालगड गाव तसे लहान खेडेच. त्या काली तेथे माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. त्यावेळी श्याम ची एक आत्या दापोलीत रहात होती. दापोलीत इंग्रजी शाळा होती. भाऊरवाणी शामला आपल्या बहीणीकडे ठेवण्याचे ठरवले. दापोली पालगड अंतर सहा कोसांचे होते.
      श्याम अत्याकडे जायला निघाला. आणि सर्वांचा निरोप घेतला. आई म्हणाली “श्याम एनआयटी रहा हो मन लाऊन शीख ”
      10 जून 1912 रोजी दापोलीच्या मिशन हायस्कूल मध्ये श्यामचे नाव घालण्यात आले. टेकडीवर बांधलेल्या सुंदर इमारतीमधील ही शाळा. श्याम ला फार आवडली. या शाळेत श्याम ला चार वर्षे शिकायला मिळाले.
      दापोलीत शिक्षणासाठी काढलेल्या या दिवसाविषयी श्याम म्हणतो “ आत्याकडच्या चार वर्षाच्या आयुष्याक्रमात माझा पुष्कळ फायदा झाला. मी कधी आजारी पडलो नाही. वेळ फुकट न दवडण्यास मी शिकलो. लवकर निजणे लौकर उठणे हा नियम येथे सहज पाळला जाई . व्यवस्थित पणाची सोय लागली. कामाचा कंटाळा गेला. कोणतेही काम करण्याची लाज वाटेनाशी झाली . कितीही कष्ट पडले तरी ते विद्येसाठी केले पाहिजे हे शिकलो. माझ्या वर्तनामुळे माझ्या माय बापास पुष्कळ समाधान वाटू लागले.
      आत्याकडे शिकायला असतांना श्यामच्या व्यक्तिमत्वात खूप प्रगती झाली होती. लोकमान्यांची केसरी तो आधाश्या सारखे वाचून काढी. तो शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ लागला. कविताही लिही लागला.
      शनिवारी सहा कोस चालून श्याम पालगडला जात असे रविवारचा दिवस आईजवळ राहून तो परत दापोलीला येत असे.
      घराची बिकट परिस्थिति;—–
      भाऊरावांची स्थिति दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.  त्यांना धनहीन स्थितीत प्रपंचाचा गाडा ओढावा लागला. आशा बिकट परिस्थितीत श्यामला पुढे शिकवणे फार अवघड जात होते. श्यामला पुढे शिकवणे जमेल याचीही काही निश्चिती नव्हती म्हणून त्यांनी नाइलाजाने श्यामला ओळखीने रेलवेत नोकरीला लावण्याचा विचार केला होता. श्याम ची इच्छा पुढे शिकून खूप मोठे होण्याची होती. पण परिस्थिति ने त्यांची वाट आढवली होती.
      तेव्हा श्यामने स्वतःच्या जिवावर शिकण्याचा निर्णय घेतला व नौकरी साठी काही ठिकाणी चौकशीही केली होती. तेव्हा त्यांस कळले की औंध संस्थानात शिक्षणाची सोय आहे . गरीब विद्यार्थ्यांना अन्न छत्रातून मोफत जेवण मिळते श्यामने औंध ला शिकायला जायचे ठरवले.
      आई वडिलांनी समती घेऊन श्याम औंधला जायला निघाला. खडतर प्रवास करून तो औंधला पोहचला. पण तेथे पोहचल्यावर त्याच्या पदरी निराशा आली. तेथील बोर्डिंग चा नियम बदलण्यात आला होता. संस्थानाच्या बाहेरच्या मुलांना बोर्डिंग बंद करण्यात आले होते. श्याम संस्थानाच्या बाहेर होता.
पुढे काय
      श्याम औंधला ला पोहचला खरी पण तेथील बोर्डिंग च्या आशेवर श्याम औंधला आला होता पण बोर्डिंग ने नियम बादलाऊन संस्थानाच्या बाहेरच्या मुलांना बोर्डिंग मध्ये प्रवेश बंद केला होता. आशा वेळी पोटाचा भीषण प्रश्न श्याम समोर उभा राहिला होता. पण त्याचा सोबती जो आधीच तेथे राहायला आला होता आशा वेळी या मित्राने त्यास धीर दिला होता. आणि तो मित्रा म्हणाला “मला मिळणारी शिदोरी आपण दोघे खाऊ ” दोन भाकर्‍या आणि दोन मुठी भात एवढे अन्न त्यावेळी बोर्डिंग मधून विद्यार्थ्यांना मिळत होते.
      सखारामने मनाचा मोठेपणा केला पण पोट तरी कसे भरणार आशा परिस्थितीत देखील घरी जाण्याचा विचार श्याम च्या मनात आला नाही.
      शाळा आणि राहण्याची व्यवस्था ———–
      औंधच्या श्रीमाई श्रीनिवास विद्यालयात श्यामचे नाव घातले.  महिना आठ आणे प्रमाणे भाड्याची एक लहानशी अंधेरी खोली ठरवली. शाळेचा अभ्यास सुरू झाला. पोटासाठी माधुकरी मागण्याचे ठरवण्यात आले. “ओम भिक्षा देही ” म्हणत श्याम घरो घरी जाऊ लागला. दारोदार होणारी हेटाळणी त्याच्या हळुवार मनाला मानावेना मग त्याने हाताने स्वयपाक सुरू केला. भाकर्‍या करता येईनात एका वृद्ध माऊलीने भाकर्‍या करून दिल्या तुकाराम नावाचा मित्र गिरणीतले सांडलेले पीठ देऊ लागला.
      कधी कोरडी भाकरीच, कधी नुसती भाजीच, कधी मक्याचे दाणे खाऊन श्याम शिक्षणाचे खडतर ताप आचारीत होता. पण औंधला प्लेग ची साथ पसरली होती जवळची घोंगडी व पुस्तके विकून श्याम पालगड ला परतला . शिक्षण सोडून परत आला म्हणून भाउराव श्यामवर रागावले.
      शिक्षणासाठी पुणे गाठले
      श्यामने पुण्याला राम ला पत्र लिहून विचारले “मी तिकडे येऊ का ?” रामाने कळवले की “निः शंक पने निघून ये ” श्याम पुण्यात दाखल झाला . पुण्यात श्यामने सहावीच्या वर्गात नाव दाखल केले तो रमाकडे राहू लागला. अभ्यास सुरू झाला. श्याम कधी चुरमुरे खाऊन कधी राम च्या घरचा डब्बा खाऊन आपले पोट भरू लागला.  त्याने खानावळीत जेवतो म्हणून राम च्या आईला सांगितले होते. नंतर काही पुस्तके विकून श्याम ने खानावळीत पैसे भरले.  संध्याकाळी कुठे तरी चक्कर मारून येई आणि जेवलो म्हणून सांगे.
      श्याम पुढे शिकून मॅट्रिक मध्ये गेला पण जेवाय खावाय चा प्रश्न होताच. राम च्या आईने घरी जेवायला सांगितले पण श्याम ला राम च्या घरी जेवण्याचा संकोच वाटत होते श्याम राम च्या घरी वारानुसार जेउ लागला आणि राम च्या घरची सर्व कामे करू लागला. राम ची बहीण आजारी पडली तेव्हा श्याम ने तिची सेवा सुश्रुषा केली.
      श्यांच्या आईचे निधन
      श्यामचे पुण्याला शिक्षण चालू असताना तेव्हा त्याची आई पालगडला आजारी पडली. तिच्या सेवेसाठी श्याम ची सखू मावशी तिकडे गेली होती पण श्यामला शिक्षत असल्यामुळे श्यामला काही कळवण्यात आले नाही. तेवढ्यात दिवाळीची सुट्टी सुरू झाली म्हणून श्याम मुंबई ला आला मुंबई ला गेल्यावर श्याम ला आईच्या निधनाची बातमी कळाली. श्याम ला अतिशय दुख झाले. श्याम या गोष्टी ला असे म्हणतो माझ्या जीवनातील आशा गेली , प्रकाश गेला, सूत्रे तुटली श्याम ने आईच्या आठवणीत श्यामची आई नावाचे पुस्तक लिहिले .
मॅट्रिक पास
      आईच्या निधनाचे दुख घेऊन तसेच श्याम पुण्याला आला व दहावीचा अभ्यास सुरू केला 1918 साली श्याम मॅट्रिक ची परीक्षा पास झाला. त्याकाळी दहावीच्या प्रमाणपत्रावर श्याम ला एखादी नोकरी मिळाली असती पण शाम ला पुढे जाऊन खूप शिकायचे होते.
      महाविद्यालयीन शिक्षण
      श्याम न्यू पुना कॉलेज मध्ये दाखल झाला आजचे सर पारुशुराम भाऊ कॉलेज म्हणजेच त्या काळाचे न्यू पुना कॉलेज.
      1918 ते 1922  अशी चार वर्षे त्या महाविद्यालयात श्यामने शिक्षण घेतली. श्याम रामाकडेच राहात होता. त्या काळी विविध लेखकांच्या सहवासा श्यामला भेटला होता.
महाविद्यालयीन शिक्षण आणि पुढे
      चार वर्षाच्या कॉलेज मधील शिक्षणाबरोबर श्यामला अन्य सामाजिक कार्यातही भाग घेण्याची संधी त्यांना लाभली .
      त्यावेळी मुंसिपीलिटी च्या वतीने होण्यार्‍या खानेसुमारीच्या कार्यातही भाग घेण्याची संधी लाभली. घरोघरी जाऊन ही नोंदणी करताना श्यामला आज्ञान,दारिद्रय, जीर्ण, रूढी, विविध तर्‍हेचे मानवी स्वभाव  ह्यांचे सामाजिक दर्शन घडले.
      श्याम मुंबई ला उन्हाळ्याच्या सुट्टीत आला होता. एके संध्याकाळी चौपाटीवर गेला तेथे प्रचंड जनसमुदाय त्याला दिसला. स्वामी श्रद्धानंद चा खून झाला होता त्या निमित्ताने तेथे दुखवट्याची सभा होती. गांधीहि त्या सभेत बोलले. श्याम म्हणतो “त्यावेळेस मी महात्मा गांधीना प्रथमच पाहिले भारताचा आत्मा पाहिला भारताचे ताप पाहिले वैराग्य पाहिले, चालती बोलती गीता पाहिली सत्यप्रेमाचा नवा आवतार पाहिला माझे डोळे भरून आले माझे मन भरून आले ” अनेक तर्‍हेच्या अडचणी, संकटे  यांच्याशी झुंजुन श्यामने आपले शिक्षण पूर्ण केले. 1922 साली तो संस्कृत ओनर्स व मराठी विषय घेऊन बी ए झाले.
      तत्वज्ञानाचे विद्यार्थी
      1923 सालच्या जुलै महिन्यात तत्वज्ञानाचा एक विद्यार्थी म्हणून साने गुरुजी तत्वज्ञान मंदिरात दाखल झाले. या संस्थेची किर्ति दुरुवर पसरली होती. मंदिरात येण्यापूर्वी गुरुजींची मणीमाणशी एक इच्छा होती ज्या अद्वैताचे साधना त्या ठिकाणी चाललेली आसणार.
      वडिलांचे निधन
      तत्वज्ञान मंदिरात असतांना त्यांचे वडील भाउराव वारले. साने गुरुजींचे पितृधन हरवले. ते पालगडला जाऊन आले . तत्वज्ञान मंदिरात त्यांचे मन रमले नाही. म्हणून 1924 साली  एम ए झाल्यानंतर अमळनेर येथील खांदेश एड्युकेशन सोसायटी मध्ये ते पी एस साने सर म्हणून दाखल झाले. ते हायस्कूल आता प्रताप हायस्कूल म्हणून ओळखले जाते.
      काळी टोपी, ओठावर ठसठसित मिशा, गळ्याभवती उपरणे गुंडाळलेले, काला गळाबंद कोट, पायचोळ धोतर, पायात पुणेरी जोडा हातात एखादे पुस्तक अशी त्यावेळी साने गुरुजींची मूर्ति.
          साने गुरुजी त्या वेळेच्या पाचवीला इंग्रजी व संस्कृत, सहावीला मराठी आणि मॅट्रिक ला इतिहास व मराठी हे विषय शिकवीत असे. जो विषय शिकवावयाचा आहे ते त्या विषयाचा अभ्यास करून मगच मुला समोर विषय शिकवण्यास हजर रहात होते. म्हणजेच अध्यापणापूर्वी अध्ययन करणारे ते खरोखरच निष्ठावंत गुरुजी होते.
      साने गुरुजी उत्तम शिकवीत ही लोकप्रियता त्यांनी फार थोड्या दिवसात मिळाली. हायस्कूल चे मुख्याध्यापक गोखले यांनी वसतिगृहाची जिम्मेदारी त्यांच्यावर सोपविली
      छत्रालयाचे काम अंगावर घेतल्यावर गुरुजींचा विद्यार्थ्यांशी अधिक जवळून सबंध येऊ लागला.
      चांगले शिक्षक
      साने गुरुजींची शिक्षण दृष्टी निसर्ग प्रधान होती. साने गुरुजी हे निसर्ग शिक्षकच होते. शाळेतील चार भिंतीत सात आठ विषयांच्या शिक्षणालाच केवळ ते शिक्षण मानीत नसत तर मनुष्य मात्रांचे शिक्षण जन्माच्या पूर्वीपासुन सुरू होऊन जन्मा नंतर आखंड व अखेरपर्यंत चालू राहाते असे म्हणत असत.
      गुरुजी स्वतः विद्यासंपन्न बुद्धिमान होतेच पण त्याशिवाय त्यांना आईचे मन लाभले होते ते मातृधर्मी शिक्षक होते म्हणून शिक्षणावर त्याच जेवढ प्रेम होत तेवढच प्रेम मुलांवर देखील होते.
      पालगडला लहानपणी मराठी दुसरी तिसरीत शिकत आसताना त्यांना धोंडोपंत नावाचे शिक्षक होते. सकाळी शाळेत गेले की ते सार्‍या मुलांना ओळीत उभे करायचे हातात छडी घ्यायचे व एकेकाला विचारायचे दात घासले का, शौचास जाऊन आलास का सूर्यनमस्कार घातलेस का इत्यादि.
      शिक्षणाकडे पाण्याचा गुरुजींचा दृष्टीकोण परमपवित्र उदात्त मंगल होता . यालाच वेगळे रूप देत ते म्हणाले
                  करी मनोरंजन जो मुलांचे ;
                  जडले नाते प्रभूशी तयांचे ;
`     गुरुजी म्हणत असत “मुले ज्याच्या भोवती पिंगा घालतात तो शिक्षक चांगला ” अमळनेर च्या शाळेत काय पुढे महाराष्ट्रात काय, गुरुजींच्या भोवती सगळे मुले जमायचे.
      स्वातंर्‍य लढ्यातील उडी
      साने गुरुजी छत्रालयाच्या कामात खूप रंगून गेले होते म्हणून त्यांना छात्रनंद म्हणतात. 31 डिसेंबर 1929 च्या मध्यरात्री लाहोर कॉंग्रेस च्या अध्यक्षपदावरून भाषण करताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वातंर्‍य मिळविणेच ध्येय आहे असे भाषण केले. देशात नवचैत्यन्य उसळले.
      29 एप्रिल 1930 रोजी गुरुजींनी शाळेचा निरोप घेतला आणि गुरुजी स्वातंत्र्यालढ्यात सामील झाले.
      प्रारंभी ते जळगावजवळील पिंपराळ इथल्या आश्रमात दाखल झाले. काही दिवसांत आश्रमातील संचालकांनी गुरुजींची वृत्ती व वाणी हेरुण त्यांना बाहेर खेड्यापाड्यात प्रचारासाठी पाठवले. सत्यगृहाची मोहीम चालवण्यासाठी स्वयंसेवकाची व आर्थिक मदतीची गरज होती. तरुणांना आकर्षन करून घेण्याची हातोटी त्यांनी साधली होती.
      खांदेशात गावोगावी स्वातंत्र्याचा संदेश देत गुरुजी फिरले नंतर ते कोकणात शिरोड्यालाही गेले.  शिरोडा येथे मोठी सत्यागृही  छावणी उघडली होती.
      एक दिवशी संध्याकाळी अमळनेरला सभा होती. नदीच्या वाळवंटात प्रचंड जनसमुदाय जमलेला होता. सभेच्या आधी अटक होऊ नये म्हणून गुरुजी टांग्यात बसून आले . त्यांनी सभेत उभे राहून भाषण केले. गुरुजींनी विदेशी मालावर बहिष्कार घालण्याची कळकळीत विनंती जनतेला केली.
      सभा समताच गुरुजींना फौजदाराने अटक केली. गुरुजींनी 15 महीने सक्तमजुरी आणि 200 रुपये दंड न भरल्यास आणखी तीन महीने सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली.
      गुरुजींना धुळे तुरुंगात पाठवण्यात आले. 17 मे 1930  पासून गुरुजींनी पहिला कारावास भोगला. गुरुजी राजकीय कारणामुळे तुरुंगात आले. पण ते स्वतःला तथाकथित राजकीय नेते समजत नव्हते.
      धुळ्याच्या तुरुंगात गुरुजी दोन आधीच महीने होते. नंतर त्यांना त्रिचांनापल्ली तुरुंगात हलविण्यात आले धुळ्याच्या तुरुंगात असतांना तेथील काम धाम संपल्यावर ते काही तरी लिहीत असत.
            स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई.   
            सुखावू प्रियतम भारत माई
      खरा सत्यगृही नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिले होते. अस्पृश्यता खरी ग्रांसुधारणा इत्यादि विषयावर त्यांनी निबंधही लिहले होते.
      त्रिचांनापल्ली हा तुरुंग दक्षिण भारतातील एक फार मोठा तुरुंग. त्यावेळी 3000 कैदी तेथे होते. केरळ , तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक, बंगाल, महाराष्ट्र आशा विविध प्रांतातील सत्यागृही तेथे होते. त्यामुळे निरनिराळ्या भाषा त्यांच्या कानावर पडत असत.
      एका कन्नड मित्राकडून त्यांनी कानडीचे धडे गिरवण्याची सुरुवात केली एका तामिळ मित्राने बेबी सरोजिची गोष्ट सांगितली. 
      तिरूवल्लुर या तमिळ पंडितांच्या कुरळ नामक ग्रंथाचा अनुवादही साने गुरुजींनी केला.  1930 च्या अखेर पर्यंत निरनिराळ्या स्वरुपात,निरनिराळ्या ठिकाणी कायदेभांगाची चळवळ सुरूच राहिली. हजारो सत्यगृहिणी तुरुंग भरून गेले. परंतु गांधीजींना मुक्त करून सरकारने वाटाघाटी सुरू केल्या. 5 मार्च 1931 पर्यंत वाटाघाटी होऊन अखेरीस गांधी आयर्विण करार झाला.  ह्या करारानुसार सरकारने सत्यगृहींची सुटका केली. 23 मार्च 1931 रोजी साने गुरुजींना त्रिचांनापल्ली च्या तुरुंगातून सोडण्यात आले.
      शिरोडच्या मिठाच्या सत्यागृहाच्या वेळी 15 मे 1930 रोजी अमळनेरच्या मल्हारी चिकाटे या बाहादराने भीम पराक्रम केला होता. पोलिसांच्या लाठ्या झेलून मिठगरावर  हल्ला चढविला होता. त्यावेळी बयंकर लाठीमाराने मल्हारी बेशुद्ध पडला होता. जखमी झाला होता. मल्हारीचा अतुल्य पराक्रम पाहून त्या वेळेच्या महाराष्ट्र सत्यगृही मंडळाने त्याला कॅप्टन अशी पदवी बहाल केली आणि त्याचा गौरव केला. मल्हारी सभेतच होता. त्या सभेत गुरुजींनी मल्हारीचा गौरव केला. आणि त्याचा रक्ताने माखलेला सदरा तेथील उपस्थितांना दाखवला आणि तो रक्ताने माखलेला होता त्या सदर्‍याचा लिलाव गुरुजींनी पुकारला. एक व्यक्तीने तो 1500 रूपयास विकत घेतला होता.
      गुरुजींनी कायदे भांगाच्या चळवळीत भाग गेतला आणि शिक्षाही भोगली. याचा अभिमान व कौतुक पालगडच्या ग्रामस्थांना वाटले. याचा आभिमान म्हणून गुरुजी गावात आलेले पाहून ग्रामस्थांनी आपल्या या पंढरीच्या गणपतीच्या खेळात सभा भरवून सत्कार केला व 51 रुपयाची थैली  पंढरीला देण्यात आली.
      1931 सालच्या 2 ऑक्टोबर जवळ येत होता तो दिवस जयंतीचा होता. गांधीजिणे सांगितले होते , वाढदिवस पाळावयाचा असेल तर तो चरखा जयंती म्हणून पाळावा. सर्वत्र सुतयज्ञ व्हावेत. हजारो चरखे फिरावेत चरखा संगीत घुमावे.
      पूर्वी खांदेश म्हणजे आताचे जळगाव जिल्ह्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक वार सूत अर्पून गांधी जयंती साजरी करण्याचे ठरवले. पण जिल्ह्यात कार्यकर्त्याची जेव्हा सभा झाली तेव्हा आपल्या तालुक्यातून सूट देण्याचे आकडे कार्यकर्ते कमी देऊ लागले. तेव्हा आशा कमी आकड्याने एक कोटी वाराचा संकल्प कसा पूर्ण होणार.
      सभेत गुरुजी उठले आणि त्यांनी जाहीर करून टाकले “अमळनेर तालुका 20 लाख वार सूट देईल हा आकडा काही छोटा नव्हता सर्व कार्यकर्ते चिंताग्रस्त झाले आणि म्हणाले हा आकडा खूप मोठा आहे हे काम कसे पूर्ण होणार आशा वेळी साने गुरुजी म्हणाले तोंडून शब्द गेला तो गेला आता माघार नाही चला कामाला लागा.
      तरुण सोबत्यासह गुरुजींनी सुट्याज्ञाच्या प्रचारासाठी खेडोपाडी पिंजून काढली. सूट शाळा उघडल्या . नांदेड, मारवाड , डांगरी, अनेक गावातून चरखे व टाकळ्या फिरू लागल्या. विंनकामाचीही व्यवस्था केली. आशा तर्‍हेने तालुक्याने गांधी जयंतीपर्यंत 20 लाखच काय त्याहून कितीतर आधिक वार सूट दिले.
      त्यांनी गांधी जयंतीला सूतच अर्पण केले नाही तर त्या दिवशी साने गुरुजींनी साफ सफाईचे कार्यक्रम आखला होता. त्यांनी पथके तयार केली होती. त्यांनी साफ सफाईचे अनेक साधने जुळविली होती.  आणि त्या दिवशी अनेक साफ सफाईची कामे केली.
      4 जानेवारी 1932 ला गांधीजींना अटक झाली. विनोबानाही जळगावला अटक झाली यांना धुळे तुरुंगात पाठवण्यात आले.
      गुरुजी मात्र पोलिसांच्या तडाख्यात लवकर सापडले नाही. शक्यतो लवकर अटक करून घ्यायची नाही असे त्यांनी ठरवले. गांधीजींच्या अटकेचा निषेध करण्यासाठी त्यांनी अमळनेरला सभा घेतली. लोकांनी लढ्यासाठी भराभरा पैसे दिले एका गरीब गुजराती बाईने हातातली पाटली काढून दिली. 
      आठ ते दहा दिवसा नंतर गुरुजींनी गुप्तपणे सभा घेण्याचे ठरवले. गुरुजींनी अमळनेरला येऊन वळवंटात सभा घेतली. प्रचंड सभा झाली. यावेळी मात्र पोलिसांनी फारच सावध राहून बंदोबस्त केला होता. त्यांनी सभा संपताच गुरुजींना अटक केली.
      दुसर्‍या दिवसी खटला चालवण्यात आला आणि 17 जानेवारी 1932 रोजी गुरुजींनी दोन वर्षांचे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. गुरुजींना धुळे तुरुंगात पाठवण्यात आले आणि विनोबाची तेथेच होते.
      गुरुजींनी तुरुंगातून आल्यावर विनोबाच्या चक्की पथकात आपले नाव नोंदवले. त्यांच्या वाट्याला जे काही 25-30 पौंड धान्य दळण्याचे येई ते धान्य अतिशय वेगाने दळून टाकीत. गुरुजी स्वतः च्या कोट्याचे दळण दळतच पण ज्या कुणाचे बाकी राहिले त्यांचेही दळून देत असत.
       जेल मध्ये जेलच्या अन्नासबंधी जेल मध्ये कैद्यांची तक्रार वाढू लागली, तेव्हा सार्‍या जेलच्या स्वंयपाक विनोबानी आपल्या हाती घेतला. त्यांनी स्वंयपाकघरात ठाण मांडल्याचे पाहून गुरुजी सारखे लोकही त्यांना स्वयंपाक घरात मिळाले. त्यावेळी धुळे जेलचे जेवण प्रख्यात झाले.
      धुळे तुरुंगात लहान लहान म्हणजेच पंधरा सोळा वर्षाची मुले देखील असायची त्यांना साने गुरुजी चा सहवास फार आवडायचा त्या मुलांना कापूस पिंजायचे काम मिळाले होते गुरुजी कधी कधी तेथे जाऊन त्या मुलांना भेटायचे.
नाशिक चा कारावास
      1932 ला ऑगस्ट महिन्यात साने गुरुजींचे धुळे तुरुंगातून नाशिक च्या तुरुंगात स्थलांतर करण्यात आले त्यांच्या सोबत काही सत्याग्रहींचे देखील स्थलांतर करण्यात आले होते.  नाशिक चा तुरुंग हवापाण्याच्या दृष्टीनेही चांगला होता. शिवाय गुरुजींनी प्रिय श्रीरामाच्या प्रिय वास्तव्याने पुनीत झालेले ही भूमी. 
      नाशिक च्या जेल चा देपुटि जेलर रोच होता. भलताच कडक आणि निष्ठुर होता. तुरुंगातील शिस्त बिघडू नये म्हणून त्याने दहशतीचे तंत्र अवलंबविले होते. नाना तर्‍हेचे जाचक नियम आणि बंधने त्याने सत्यगृही कैद्यावर लादलेली होती. हुकुमाशिवाय बसायचे नाही की उठायचे नाही. हुकुम मिळाल्या शिवाय खायचे नाही. चक्की पिसण्याचे काम तर फारच त्रासाचे केले होते. पण रोचणे जेव्हा आणखी एक अपमानकारक फर्मान काढले तेव्हा मात्र राबंद्यांतही खळबळ माजली होती
      रोच चे नवे फरमान असे होते की , सायंकाळी जेव्हा कैद्यांची मोजदाड होते,गिनती होते, त्या वेळी राजबनद्याणा पायावर हात ठेवून मान गुडघ्यात घालून उकदिवे बसले पाहिजे. हा अपमानास्पद निर्बंध पाळण्याचे राजबनद्याणी जेव्हा नाकारले, तेव्हा पोलिस आणि वार्ड्स त्यांच्या डोक्यावर त्यांनी मान घालावी म्हणून, थपडा व दांडा मारू लागले.
      साने गुरुजींनी अशा प्रकारे मान खाली घालणार नाही असे तेजस्वी आणि निर्भयपणे सांगितले.
राष्ट्राची मान उंच करण्यासाठी आलेल्या राज्बंड्यावर अशी सक्ती होता कामा नये असे ते म्हणाले त्यांच्यावर दंड्याचे प्रहार पडले. पण गुरुजींची मान खाली झुकली नाही.
      गुरुजींच्या या तुरुंगातील सत्यागृहाणे इतर व्यक्तींनाही बळ मिळाले. ते ना बंधनाचा प्रतिकार करू लागले.
      साने गुरुजी मुळे हे घडले हे कळल्यावर रोचणे गुरुजींनाच छळायला सुरुवात केली. त्यांना सेपरेट ठेवले. खटल्यावर बोलावले त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवला. अंगात गोणपाटाचे टोचरे कपडे गांजिकपडा घालायला दिले. हातापायत साखळदंडाच्या बेड्या बेडी ठोकली. त्या जेल मध्ये साने गुरुजींना अनेक त्रास सहन करावे लागले.पण आता रोच चे दिवस भरले होते त्याने एका तरुन कैदयाला खूप मार दिला होता ही बातमी बाहेर पसरली व ह्या मुळे त्याला सजा मिळाली. त्यामुळे जेलचे इतर आधिकारी आता मऊ वागू लागले.
      नाशिक च्या तुरुंगात साने गुरुजींना स्वामी आनंद यांचा सहवास लाभला. स्वामी आनंद हे गांधीजींचे परिवारामधले . गांधीजींच्या वर्तमानपत्राचे मुद्रक,प्रकाशक व व्यवस्थापक स्वामी आनंद यांच्या आग्रहावरूनच गांधीजींनी सत्याचे प्रयोग हा ग्रंथ लिहिला. स्वामींनी गुरुजीवर भावनापूर्ती हा लेख 1950 साली गुरुजी गेल्यावर लिहिला होता.
      नाशिक च्या कारागृहातून गुरुजी 1933 साली सुटले. सुटल्यावर ते आपल्या कर्मभूमी अमळनेर येथील भूमीत आले.
      गुरुजी पारत खांदेशात आले आणि कामाला लागले. खेड्या पाडयातुन वाणी घुमू लागली. याच सुमारास सरकारचा जातीय निवाडा जाहीर झाला.
      साने गुरुजींनी वैयक्तिक सत्यगृह 26 जानेवारी 1934 रोजी सुरू केला आणि त्यांना चाळीसगाव तालुक्यात अटक झाली. मॅजिस्ट्रेट ने त्यांना चार महिन्यांची शिक्षा दिली. ब वर्ग नाकारून गुरुजींनी धुळे तुरुंगात क वर्ग स्वीकारला. आणि चक्की पिसली.
साने गुरुजी किसान कामगारांचे कैवारी
      कॉंग्रेस चे 50 वे सुवर्ण महोत्सव अधिवेशन महाराष्ट्रात आणि तेही फाईजपूरसारख्या खांदेशातील एका खेड्यात ठरले होते. आधिवेशनासाठी देशातून हजारो लोक व मोठे नेते येणार होते. तेव्हा पिण्याच्या पाण्यापासून ते सर्वांचे रहाणे-जेवणे स्वच्छता आशा सर्वच गोष्टी होत्या आणि त्यासाठी खर्चही बराच येणार होता. कॉंग्रेस विरोधक तर म्हणून लागले होते फैजपुरचे फजितपुर होणार.
      साने गुरुजी त्यावेळी पुण्यात होते. पण त्यांना जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा ते अस्वस्थ झाले. ते पुण्याहून निघाले आणि फैजपुर येथे दाखल झाले.
      फैजपुर ला टिळक नगर स्थापन करण्याची तयारी चालली होती. साने गुरुजी तेथे आले आणि त्यांनी वेगवान प्रचाराचे कार्य हाती घातले. गुरुजींची वाणी खेड्यापाड्यातून दुमदुमू लागली.  गाणी भाषणे इत्यादि त्यांनी केले. त्यांनी गावोगावो फिरून स्वयंसेवक आणि निधि मिळीविला. त्यांनी सगळ्या खेडोपाड्यातील लोकांना फैजपूर अधिवेशनाला हजार राहण्याचे आव्हान केले. 1936 चा डिसेंबर महिना होता थंडीचा कडाका वाढू लागला गुरुजी पहाटे उठले. प्रार्थना झाली कुणीतरी शेकण्यासाठी निखारयाणे भरलेली शेगडी विनोबापुढे आणून ठेवली. पण साने गुरुजी दूरच थंडीत कुडकुडत बसले होते तेव्हा वोनोबाची ती शेगडी घेऊन साने गुरुजीन कडे गेले आणि म्हणाले मोहम्मद पर्वताकडे आले नाहीत तर पर्वतालाच मोहम्मदाकडे गेले पाहिजे. गुरुजी संकोचून गेले.
      अधिवेशनाचा दिवस जवळ येऊन ठेपला गुरुजींनी साफ सफाईचे काम हाती घेतले आणि आपासाहेब पटवर्धन यांच्या नेतृत्वा खाली सफाई पथकात सामिल झाले. सफाई चे काम त्यांना फार पुरविपासून आवडे.
      27-28 डिसेंबर 1936 ला फैजपूर अधिवेशन झाले. अध्यक्षपदी पंडित जवाहरलाला नेहरू होते. गांधीजी,राजेंद्रप्रसाद,वल्लभभाई पटेल, मालविय आदि नेत्यांची भाषणे झाली. अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडले.
      कामगारांचे हाल आणि गुरुजी —–
      खांदेशात अमळनेर, धुळे, जळगाव, व चाळीसगाव येथे कापड गिरण्या आहेत. गिरण्यातील कामगारांचे गिरणीमालक शोषण करीत होते. ना भरपूर पगार, ना राहायला चांगली जागा कामगारात असंतोष धुमसत होता. कामगार संघटनेची न्याय हक्कासाठी लढा देण्याची तयारी चाललेली होती. अंतरीच्या कळविल्याने गुरुजी त्या लढ्यात उतरले. पगारवाढ ताबडतोब आशा घोषणांनी जळगाव, अमळनेर, धुळे, चाळीसगाव ही सारे शहरे दणाणली गुरुजींनी पुन्हा आपल्या शक्तिनिशी झुंज घेतली. कामगारांची मागणी मान्य झाली लढा येशस्वी झाला.
      टोल टॅक्स प्रकरण
      अमळनेर च्या मुंसिपालिटीने खेड्यापाड्यातून येणार्‍या बैलगाड्यावर टोल टॅक्स लागू केला. त्यामुळे गरीब शेतकर्‍यांना भुर्दंड पडणार होता. आधीच हालाखीची स्थिति त्यात हा टोल टॅक्स . गुरुजींना हा टॅक्स अन्यायी वाटत होता. त्यांनी त्या विरूढ कॉंग्रेस पत्रात जोरदार टीका केली. हा टॅक्स रद्द करावा अशी मागणी केली. मुंसिपालिटीने दाद दिली नाही. तेव्हा त्याविरुद्ध चळवळ करण्याची तयारी गुरुजींनी सुरू केली. साने गुरुजी मुळे हा टोल टॅक्स रद्द झाला.
      धुळ्याचे गिरणी कामगार आणि साने गुरुजी
      मध्यंतरी धुळ्याच्या गिरणिकामगारावर उपासमारीचे संकट उद्धभवले होते. गिरणी मालकांनी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतच, परंतु गिरणीलाही कुलपे ठोकली. गिरणी बंद ठेवल्याने अनवस्थ प्रसंग निर्माण झाला. गुरुजींनी या लढ्यात लक्ष घातले. वाटाघाटीचे सर्व मार्ग संपल्यावर व मालक हटवादी भूमिका सोडत नसल्यास गुरुजींनी 13 सेप्टेंबर 1939 रोजी दुपारी बारापर्यंत गिरणीचे दरवाजे उघडले नाहीत तर तापी नदीत जलसमाधी घेण्याची घोषणा केली ही बातमी सर्वत्र आगी सारखी पसरली आणि मोठी खळबळ माजली. धुळे शहरातील वातावरण फारच तापले. गुरुजींचा सहायाला सेनापति बापटही धावले. या वेळी मात्र गिरणीमालकासोबत वाटाघाटी होऊन गिरणी मालकांनी माघार घेतली. कामगारावरचे संकट दूर झाले त्यांच्या विजयगाथे मध्ये हा एक विजय दाखल झाला.
      कॉंग्रेस या साप्ताहिकाचे प्रकाशन मार्च 1940 मध्ये थांबले. त्यामुळे गुरुजी काही दिवस बडोदा येथे जाऊन मावशीकडे राहिले.
      श्यामचे पत्रे पुस्तक
      चांदवड ला त्यांनी जे भाषण केले होते होते, ते सरकारच्या दृष्टीने आक्षेपार्ह ठरले होते. त्यावरून गुरुजींना अटक करण्याची तयारी सुरू झाली. याची कुणकुण गुरुजींना लागली होती आणि तेही जेल यात्रे साठी सज्ज झाले. त्यांना पेन येथे अटक करण्यात आली त्यानुसार त्यांना 2 जानेवारी 1941 रोजी दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली धुळ्याच्या तुरुंगात त्यांना आणून ठेवण्यात आले.
      याच दरम्यान गुरुजींनी शाम ची पत्रे हे पुस्तक लिहिले. त्यातून सेवादलाची जातीधर्म निरपेक्ष भूमिका विशद करून त्यांनी सांगितली. सेवादल हा माझा प्राण वायु आहे असे ते म्हणत. पंढरपूर च्या अस्पृस्यांचा प्रवेश चळवळीत देखील त्यांनी भाग घेतला होता.
      त्यांच्यामुळे पंढरपूर चे विठ्ठल मंदिर हरिजनासाठी खुले झाले. पंढरपूरहून परतल्यावर साने गुरुजी एक दोन महीने बंधुकडे बोरडीला राहिले. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा गुरुजी पुण्यात आपल्या प्रसूत वहीणींची सेवा करीत होते. त्या दिवशी राहत्या खोलीवर राष्ट्रीय झेंडा लावला. तोरण बांधले. संध्याकाळी मेणबत्त्या लाऊन आरास केला. त्यांनी खूप जल्लोषात स्वातंत्र्याचे स्वागत केले. जेव्हा त्यांना कळले की गांधीजींची हत्या झाली तेव्हा त्यांना अतिशय दुख झाले “माझ्या जीवनातील सूर्य मावळाला ” असे उदगार त्यांनी काढले. त्यांना कळाले की गांधीजींना मारणारा एक महाराष्ट्रियन आहे तेव्हा त्यांनी 1 फेब्रुवारी 1948 पासून 21 दिवसांचे उपोषण सुरू केले.  त्यांनी ते उपोषण पूर्ण केले.
      त्यांनी आपल्या आयुष्य काळात अनेक चांगली कामे केली. ते चांगले गुरु झाले, चांगले समाजसुधारक झाले, त्यांनी शेतकर्‍या साठी आणि कामगारासाठी  चांगली कामे केली. 11 जून 1950 रोजी त्यांचा प्रवास संपला
      11 जून 1950 रोजी त्यांचे निधन झाले
       साने गुरुजी जगास सोडून गेले,अनंतात विलीन झाले, त्यांनी देह सोडला पण त्यांनी अनेक ग्रंथांचा वारसा सोडला. त्यांनी आपल्या आयुष्यकाळात अनेक ग्रंथे लिहिली


Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment