नोबेल पारितोषिक :–
दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तिला नोबेल पारितोषिक देण्यात येते. याची स्थापना इ. स. 1900 मध्ये अल्फ्रेड नोबेल या वैज्ञानिकाद्वारे करण्यात आली. 1901 मध्ये पहिल्यांदाच रसायनशास्त्र, साहित्य, शांती, भौतिकशास्त्र, शरीरविज्ञान शास्त्र या क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना नोबेल पारितोषिक देण्यात आले. दरवर्षी स्टॉकहोम येथे हा आवार्ड देण्यात येतो. हे पारितोषिक प्रदान करताना प्रशस्तीपत्रा सोबत $14 लाख एवढी राशी प्रदान केली जाते. अल्फ्रेड नोबेल यांनी एकूण 355 शोध लावले ज्यांच्या पैकी डायनामईट हा एक आविष्कार होता. डिसेंबर 1986 मध्ये मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या संपत्ति चा मोठा हिस्सा एका ट्रस्ट कडे सुरक्षित ठेवला. त्यांची अशी इच्छा होती की ज्या व्यक्तींनी मानवाच्या कल्यानासाठी खूप मोठे योगदान दिले अशा व्यक्तींना या पैशाच्या व्याजातून दरवर्षी सम्माणीत करण्यात यावे. स्वीडिश बँकेत जमा असलेल्या नोबेल यांच्या संपत्ती च्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या व्यक्तींना नोबेल पारितोषिकाने सन्मानीत करण्यात येते.
अर्थशास्त्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींना 1968 पासून नोबेल पारितोषिक देण्याची सुरुवात करण्यात आली. पहिला नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये रेस क्रॉस चे संस्थापक ज्यां हैरी दूरांत आणि फ्रेंच पीस सोसायटी चे संस्थापक व अध्यक्ष फ्रेडरीक पैसी यांना संयुक्तरित्या देण्यात आला.
या शास्त्रज्ञाने आपल्या हयातीत 350 हून अधिक शोध लावले. या शोधा मधून मिळालेली संपत्तीपैकी 265 दशलक्ष डॉलर एवढी रक्कम त्यांनी पारितोषिकासाठी राखून ठेवली. 1981 पासून 24 कॅरट सोन्यापासून बनविलेले 175 ग्रॅम चे पदक विजेत्यांना प्रदान करण्यात येते. मलाला युसुफझाई ही सर्वात कमी वयात नोबेल मिळवणारी व्यक्ति आहे. 2014 साली वयाच्या 17 व्या वर्षी तिला शांततेचा नोबेल पारितोषिक देण्यात आला. तर लिओनिड हरविंग्ज हे सर्वाधिक वयाचे नोबेल पारितोषिक विजेते असून त्यांना 2007 साली 90 व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला.
या शास्त्रज्ञाने आपल्या हयातीत 350 हून अधिक शोध लावले. या शोधा मधून मिळालेली संपत्तीपैकी 265 दशलक्ष डॉलर एवढी रक्कम त्यांनी पारितोषिकासाठी राखून ठेवली. 1981 पासून 24 कॅरट सोन्यापासून बनविलेले 175 ग्रॅम चे पदक विजेत्यांना प्रदान करण्यात येते. मलाला युसुफझाई ही सर्वात कमी वयात नोबेल मिळवणारी व्यक्ति आहे. 2014 साली वयाच्या 17 व्या वर्षी तिला शांततेचा नोबेल पारितोषिक देण्यात आला. तर लिओनिड हरविंग्ज हे सर्वाधिक वयाचे नोबेल पारितोषिक विजेते असून त्यांना 2007 साली 90 व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला.
नोबेल यांच्याविषयी :–
अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्टॉकहोम येथे 21 ऑक्टोबर 1833 मध्ये झाला. त्यांचा जन्म एका समृद्ध परिवारात झाला. ज्या परिवारात जास्तीत जास्त व्यक्ति इंजीनीरिंग क्षेत्राशी निगडीत होते. अल्फ्रेड हे अत्यंत हुशार होते व त्यांना रसायनशास्त्राचे खोल ज्ञान होते तसेच ते एक संशोधक देखील होते. त्यांनी आपल्या संपत्तीच्या जवळपास 94 टक्के हिस्सा मानव जातीचे कल्याण करणार्या व्यक्तींना पारितोषिक देण्यासाठी राखून ठेवलेला आहे.
नोबेल पारितोषिक महत्वाचे मुद्दे :–
नोबेल परितोषिक मिळवणारी पहिलीमहिला मारी क्युरि (marie curie) ही आहे. तिने 1903 मध्ये भौतिक शास्त्रात केलल्या कामगिरीसाठी तिला तिच्या पती सोबत नोबेल पारितोषिक देण्यात आले.
नोबेल पारितोषिक जिंकणारी भारतातील पहिली महिला मदर तेरेसा होय त्यांना शांतता या क्षेत्रासाठी 1979 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.
नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय रविंद्रनाथ टागोर हे होत. साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.
भौतिक शास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ति सी व्ही रमन हे आहेत. त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नोबेल पारितोषिक 2017 :—
शांततेचे नोबेल :–
जगातील अण्वस्त्रे नष्ट व्हावीत म्हणून आंतरराष्ट्रीय चळवळ चालवणार्या ICAN (International campaign to abolish nuclear weapons) या संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. या संस्थेची स्थापना मेलबर्न मध्ये करण्यात आली. स्वीत्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथे या संस्थेचे मुख्यालय आहे.
वैद्यकशास्त्रातील नोबेल :–
वैद्यकशास्त्रातील नोबेल पुढील तीन व्यक्तींना देण्यात आले आहे. जेफ्री सी. हॉल, मायकेल रोशबॅश व मायकेल यंग. त्यांनी शरीरातील जैविक घड्याळाच्या कार्याविषयी संशोधन केले.
भौतिकशास्त्रातील नोबेल :–
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पुढील व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे. अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञ बॅरि बॅरीश, किप थोर्ण, रणर वेस. यांनी 2015 मध्ये गुरुत्वीय लहरींचा शोध लावला. कृष्णविवरांची टक्कर झाल्यानंतर गुरुत्वीय लहरी निर्माण होतात.
भौतिकशास्त्रातील नोबेल :–
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पुढील व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे. अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञ बॅरि बॅरीश, किप थोर्ण, रणर वेस. यांनी 2015 मध्ये गुरुत्वीय लहरींचा शोध लावला. कृष्णविवरांची टक्कर झाल्यानंतर गुरुत्वीय लहरी निर्माण होतात.
रसायनशास्त्रातील नोबेल :—
क्रायो- इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी च्या शोधाला रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. रसायनशास्त्रातील पुरस्कार मिळवणारे व्यक्ति पुढीलप्रमाणे सांगता येतील. जॅक्स डुबेशी, जेकीम फ्रँक, रिचर्ड हँडरसन. या व्यक्तींनी पेशीच्या अंतरंगाची छायाचित्रे काढण्यासाठी इलेक्ट्रॉन बिम चा वापर करण्याची अतिशय उपयुक्त व नवी पद्धती शोधून काढली.
साहित्यातील नोबेल :–
ब्रिटिश लेखक काझुओ ईशीग्यूरो यांना यंदाचा नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आला. द रिमेन्स ऑफ द डे या प्रसिद्ध कादंबरी चे ते लेखक आहेत. त्यांनी त्यांच्या कादंबर्या मध्ये जगाशी जोडल्या गेलेल्या आपल्या भ्रामक अर्थाचा उलघडा केलेला आहे. काझुओ यांचे लएखान आठवणी काळ या गोष्टीवर आधारित आहे.
अर्थशास्त्रातील नोबेल :–
वर्तनवादी अर्थ विषयातील योदानाबदल अमेरिकी तज्ञ रिचर्ड थलर यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाला. रिचर्ड हे अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आहेत