विज्ञान 8 वी नोट्स भाग 2 — 8th science notes part 2

Chapter 12: पदार्थांचे गुणवैशिष्ट्य  : – स्थायू, द्रव, वायु या पदार्थांच्या तीन आवस्था आहेत. पदार्थातील उर्जेवर पदार्थाची आवस्था अवलंबून असते. या उर्जेत बदल केल्यास म्हणजे पदार्थाला उष्णता दिली किंवा पदार्थ थंड केल्यास पदार्थाची अवस्था बदलते. स्थायू पदार्थाला उष्णता दिली की स्थायूचे रूपांतर द्रवात होते.

 
            प्रत्येक पदार्थाचा द्रवनांक आणि उत्कलनांक वेगवेगळा असतो. ज्या तापमानावर एखाद्या पदार्थाचे स्थायुतून द्रवात अवस्थांतर होते त्याला त्या पदार्थाचा द्रवनांक असे म्हणतात. बर्फाचा द्रवनांक 0 अंश सेल्सिअस तर लोखंडाचा 1535 अंश सेल्सिअस इतका असतो.
 
           ज्या तापमानावर द्रव पदार्थ वायु अवस्थेत जातो तो त्याचा उत्कलनांक होय. पाण्याचा उत्कलनांक 100 अंश सेल्सिअस तर लोखंडाचा उत्कलनांक 2750 अंश सेल्सिअस इतका असतो.
 
          ऊर्ध्वपातन:— एखाद्या द्रवपदार्थाला त्याच्या उत्कलनांकापर्यंत तापवून नंतर त्याच्या वाफेला थंड करून पुन्हा द्रव पदार्थ मिळवण्याच्या पद्धतीला ऊर्ध्वपातन असे म्हणतात.
         प्रभाजी ऊर्ध्वपातन :– प्रभाजी ऊर्ध्वपातन ही पद्धत ऊर्ध्वपातन पद्धती सारखीच आहे, मात्र प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीत ऊर्ध्वपातन पात्र आणि संघननि यांच्या मध्ये प्रभाजी स्तंभ जोडलेला असतो. एखाद्या द्रवात अनेक पदार्थ विरघळलेले असतील, तर ते वेगळे करण्यासाठी प्रभाजी ऊर्ध्वपातन उपयुक्त ठरते.
 
 

Chapter 13:- धातू – आधातु

         मूलद्रव्याचे धातू आणि अधातु अशा दोन प्रकारात विभागणी करतात. धातू आणि आधातु यांचे गुणधर्म एकमेकाहून भिन्न असतात.
धातू आणि अधातूंचे काही भौतिक गुणधर्म
 
        वर्धनियता :– स्थायू पदार्थावर घाव घालून त्याचा पातळ पत्रा करता येण्याच्या गुणधर्माला वर्धनियता म्हणतात. वर्धनियता हा धातूचा गुणधर्म आहे.
तन्यता :– पदार्थापासून तार काढता येण्याच्या गुणधर्माला तन्यता म्हणतात. धातूंची तार काढता येते. प्लॅटीनम, सोने हे धातू तन्य म्हणून प्रसिद्ध आहेत. 1.27 ग्रॅम प्लॅटिनमची 2.5 किमी लांब तार काढता येते.
 
       उष्णता व विद्युतवाहकता :– लोखंड, तांब्यासारखे धातू उष्णतेचे सुवाहक आहेत. बहुतेक सर्व धातू उष्णतेचे व विद्युत ऊर्जेचे सुवाहक आहेत.     
 

धातू व अधातू यांच्यातील फरक 

धातू अधातू
1. धातुस चकाकी असते. 1. अधातुस चकाकी नसते.
2. धातू वर्धनिय असतात. 2. अधातु वर्धनिय नसतात.
3. तन्य असतात. 3. तन्य नसतात.
4. उष्णता विजेचे सुवाहक 4. उष्णता विजेचे दुर्वाहक
5. धातू सामान्य तापमानाला स्थायूरूपात असतात. 5. सामान्य तापमानाला स्थायू किंवा वायु अवस्थेत आढळतात.
6. सर्वसाधारणपणे धातूची घनता सर्वोच्च असते. 6. घनता कमी असते.
 धातूंची रासायनिक गुणधर्म :
 
             ऑक्सिजनशी अभिक्रिया :– धातू ऑक्सिजनशी संयोग पावतात तेव्हा त्यांची ऑक्साइडे तयार होतात. धातूंची ऑक्साइडे आम्लधर्मी असतात.  उदा :– ओलसर-दमट हवेत ठेवलेले लोखंड गंजते. त्यावर लाल रंगाचा पदार्थ पसरतो. ही लोखंडाची हवेतील ऑक्सिजनशी होणारी रासायनिक अभिक्रिया होय.
आम्लांची धातूवर होणारी अभिक्रिया
             बहुतेक धातू जेव्हा आम्लाशी संयोग पावतात, तेव्हा हायड्रोजन वायु बाहेर पडतो. हायड्रोजन ज्वलनशील असल्याने नळीच्या तोंडाशी जळती काडी नेल्यावर पॉप असा आवाज येतो.
 
आम्लारींची धातुवर होणारी अभिक्रिया
 
            आम्लारींची धातुवर अभिक्रिया होत असताना हायड्रोजन वायु बाहेर पडतो.
 
             राजधातू :-
            प्लॅटिनम आणि सोने यांसारखे धातू निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरुपात आढळतात. त्यांच्यावर हवा, पाणी, आम्ल, उष्णता, यांचा परिणाम होत नाही त्यांना राजधातू असे म्हणतात. हे सहसा रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत.
 
             राजधातूंचे उपयोग :–
सोने आणि प्लॅटिनम यांचा मुख्य वापर अलंकार बनवण्यासाठी होतो. पूर्वी सोन्याची नाणी वापरत असत. चांदीवर मुलामा देण्यासाठी सोने वापरतात. काही वैद्यकीय उपकरणे बनवण्यासाठी प्लॅटिनम चा वापर केला जातो.
 
             सोन्याची सुद्धता :
             सोन्याची सुद्धता कॅरट मध्ये मोजतात. 24 कॅरट म्हणजे 100 टक्के सुद्ध सोने, त्यावरून सोन्याची किंमत ठरते. 24 कॅरट चे सुद्ध सोने फार मऊ असते त्यामुळे त्यापासून दागिने तयार केले जात नाहीत. सोन्याचे दागिने बनविताना त्यात तांबे किंवा चांदी आवश्यक त्या प्रमाणात मिसळतात. दागिने तयार करण्यासाठी साधारणतः 22 कॅरट चे सोने वापरतात.   
कॅरट सोन्याची शुद्धता (टक्केवारी)
24 100
22 91.8
18 75
14 58.5
12 50
10 42
 
 
            क्षरण:— लोखंडाच्या वस्तूवर काही दिवसांनी तांबूस रंगाचा लेप दिसतो. तांब्याच्या भांड्यावरही ओल राहिल्यास हिरवट, पिवळट दाग पडतात. चांदीची भांडी काळी पडतात.
            वरील सर्व उदाहरणात लोखंड, तांबे, चांदी या धातुवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची क्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात. या क्रियेमुळे धातुवर परिणाम होऊन ते झिजतात. यालाच क्षरण असे म्हणतात.
            लोखंडावर ऑक्सिजन वायूची क्रिया होते. तांब्यावर कार्बन डायऑक्साइड वायूची क्रिया होते. चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायु क्रिया करतो.
            धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्याच्यावर तेलाचा, ग्रीसचा थर दिला जातो. तसेच दुसर्‍या न गंजणार्‍या धातूंचा मुलामा दिला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन क्षरण थांबवता येते. समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यापासून जहाजाच्या पत्र्याचे क्षरण थांबण्यासाठी त्यावर एनॅमलच रंग लावला जातो. त्यात जस्त किंवा मॅग्नेशीअम या धातूंचा वापर करतात. यामुळे धातूच्या पृष्टभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक क्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही.
 
समिश्रे :–
            दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व आधातूंच्या एकजीव मिश्रणाला समिश्र असे म्हणतात. संमिश्रातील धातूंचे प्रमाण विशिष्ट असते. संमीश्रे तयार झाल्यावर त्याचे भौतिक गुणधर्म बदलतात. परंतु रासायनिक गुणधर्म तसेच राहतात.
उदा :– तांबे व टिन या धातूंचे मिश्रण केले की, कांस्य हा धातू तयार होतो. लोखंड व कार्बन यांच्या संमिश्रनातून पोलाद मिळते. लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल यापासून स्टेनलेस स्टील मिळते.
 
 
 

Chapter 14:-कार्बन आणि कार्बनची संयुगे

 
 
 
 
            सर्व वनस्पति आणि प्राणीजन्य पदार्थातात कार्बन हा प्रमुख घटक असतो. हवेतील कार्बनडायऑक्साइड, तसेच इंधन म्हणून वापरत असलेल्या बायोगॅस, पेट्रोलियम आणि मार्शगॅसमध्येही कार्बन आढळते.
           कार्बन चा अणूक्रमांक 6 असून अणूवस्तमानांक 12 आहे. त्याची संयुजा 4 आहे.
निसर्गात कोळसा कसा तयार झाला
           कोळसा हे इंधन किंवा ऊर्जास्त्रोत म्हणून प्रसिद्ध आहे. ही ऊर्जा कोळशात कोठून आली? वनस्पति आणि प्राणी हे सतत सौरऊर्जा घेत असतात. लाखो वर्षापूर्वी त्यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले. त्यांच्यावर सूक्ष्मजीवांची प्रक्रिया होऊन त्यांतील वायुपदार्थ वातावरणात निघून गेले आणि अवेषांत मुख्यतः कार्बन संयुग कायम राहिले.
त्यानंतर भूगर्भात प्रचंड दाबाखाली या संयुगातील द्रवपदार्थाचा निचरा झाला आणि उरलेले खनिज दगडासारखे घट्ट आणि कठीण बनले. याला कोल किंवा दगडी कोळसा म्हणतात.
कोल किंवा दगडी कोळसा अनेक प्रकारचा असतो. त्यापासून मिळणार्‍या उष्णतेनुसार त्याची वर्गवारी करण्यात आली. खनिज तेल, वीज यांसारखे ऊर्जास्त्रोत उपलब्ध असले, तरीही आपण आपली 80 टक्के ऊर्जेची गरज कार्बनी पदार्थापासून भागावतो.
 
कोळशाचे प्रकार व कार्बन ची टक्केवारी
 
अॅथ्रासाईट——————–80 टक्के
बिटुमीनस——————–60 टक्के
लिग्नाईट———————22 टक्के
पिट—————————11 टक्के
कार्बन गुणधर्म
 
बहुरूपता :–
 
              निसर्गात काही मूलद्रव्य एकापेक्षा अधिक रूपांत आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले, तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात. या गुणधर्माला बहूरूपता असे म्हणतात. कार्बन, सल्फर, फॉस्फरस निसर्गातील काही बहुरूपी मूलद्रव्य आहेत.
 
कार्बन ची बहूरूपता :
              कार्बनची बहूरूपता स्फटिक रूप आणि अस्फटीक रूप अशा दोन प्रकारची असते.
स्फटिक रूपाट हिरा, ग्रॅफाईट, फूलेरिन्स आढळतात.  स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते, तर स्फटिक रूपातील अणूंची रचना अनियमित असते. अस्फटीक रूपांत कोक, कोल किंवा दगडी कोळसा इत्यादि आढळतात.
 
हिरा (डायमंड):–
 
              तेजस्वी. मौल्यवान प्रचंड दाबाखाली कार्बनचे स्फटिकीकरण होऊन तयार झाला. तेजस्वी, शुद्ध हिरा हा अतिशय कठीण पदार्थ असून, तो विद्युत दुर्वाहक आहे.  हिर्‍याच्या स्फटिकात प्रत्येक कार्बन अणूभोवती ठराविक अंतरावर चार कार्बन अणू असतात.
उच्च तापमानावर हिरा तापवल्यास त्यातून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. हिर्‍यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. हिर्‍याचा उपयोग काच कापण्यासाठी, अलंकार म्हणून,तसेच ड्रिलिंग मशीनमध्ये होतो.
शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापवल्यास कृत्रिम हिरा तयार होतो.
 
ग्रॅफाईट :-
 
              ग्रॅफाईटचे स्फटिकरूप षट्कोनी असते. यामध्ये अणूंची नियमित मांडणी थराच्या रूपात असते. म्हणजे सहा कार्बन अणूंची एकमेकांशी षटकोनात मांडणी असून ते एमेकांपासून ठराविक अंतरावर असतात. प्रत्येक कार्बनी अणूभोवती ठराविक अंतरावर तीन कार्बन अणू असतात.
              निसर्गात सापडणारे सापडणारे ग्रॅफाईट काळे, मऊ आणि गूळगुळीत असते. ते उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात. जुन्या काळापासून लिहिण्यासाठी ग्रॅफाईट चा वापर होत आला आहे. शिसेपेन्सिलीत ग्रॅफाईट चा वापर होतो. ग्रॅफाईट वंगण म्हणूनही वापरतात. खूप प्रकाश देणार्‍या आर्कलॅम्पमध्ये ग्रॅफाईट वापरतात.
 
 
फुलेरिन्स :–
 
              फुलेरिन्स हे नव्याने माहीत झालेले कार्बनचे एक बहुरूप आहे. बकीबॉल म्हणून ओळखल्या जाणार्‍या C60 या प्रकारात कार्बन चे अणू पंचकोणी आणि षटकोनी मांडणीच्या रूपात एकमएकांशी जोडलेली असतात. त्यामुळे फुलेरिन्सच्या रेणुची रचना एखाद्या फूटबॉलसारखी असते. रिचर्ड बकमिन्सटर फुलर या वास्तुशास्त्रज्ञाने केलेले गोलाकार रचनेवरून कार्बनच्या या बहूरूपाला फुलेरिन्स हे नाव देण्यात आले. 1996 चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक C60 या फुलेरिन्सच्या कार्बनी रूपासाठी हँराल्ड क्रोटो, रॉबर्ट कर्ल आणि रिचर्ड स्मॅली यांना देण्यात आले.
 
 
            कार्बनची विद्राव्यता :– कार्बन कोणत्याही द्रावणात विरघळत नाही.
 
 
            कार्बन ची ऑक्सीजनबरोबर क्रिया : कार्बन हवेत जाळल्यास ऑक्सीजनशी संयोग पावतो आणि कार्बनडायऑक्साइड वायु तयार होतो.
 
            कार्बन डायऑक्साइड :-– हवेत कार्बनडायऑक्साइड मुक्त स्वरुपात आढळतो. प्राणी आणि वनस्पतीच्या श्वसनातून तो हवेत सोडला जातो. खडू, शहाबादी फारशी, लाईम स्टोन यामध्ये तो संयुग स्वरुपात आढळतो.
            भौतिक गुणधर्म :– कार्बन डायऑक्साइड वायुला चव, वास, रंग नाही. हा हवेपेक्षा जड आहे. पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो.
            काही रसायनीक गुणधर्म :–
            चुन्याच्या निवळीतून कार्बन डायऑक्साइड पाठवला असता ती, पांढरी होते. कॅल्सियम कार्बोनेट हे पांढर्‍या रांगाचे असते.
 
Ca(OH)2  +   CO2 ——————à CaCO3  +  H2O
कॅल्सिअम      कार्बन                 कॅल्सिअम    पाणी
हायड्रोक्साइड  डायऑक्साइड             कार्बोनेट     
धातूंची ऑक्साइडे आणि कार्बनडायऑक्साइड यांच्या संयोगाने धातूंची कार्बोनेट मिळतात.
 CaO      +    CO2 ———————à CaCO3
कॅल्सिअम       कार्बन                    कॅल्सिअम
ऑक्साइड      डायऑक्साइड               कार्बोनेट
 
पाण्यातून कार्बन डायऑक्साइड पाठवल्यास तो अल्प प्रमाणात विरघळून कार्बोनिक  आम्ल मिळते.
 
2NaOH    +   CO2 ——————–à  Na2CO3 + H2O
सोडीअम        कार्बन                    सोडीअम   पाणी
हायड्रॉक्साइड   डायऑक्साइड                कार्बोनेट
सोडीअम कार्बोनेटच्या पाण्यातील द्रावणातून कार्बन डायऑक्साइड पाठवला असता सोडीअम बायकार्बोनेट मिळते.
 
Na2CO3   +  H2O + CO2 ————–à 2NaHCO3
सोडीअम        पाणी   कार्बन               सोडीअम    
कार्बोनेट              डायऑक्साइड          बायकार्बोनेट
अग्निरोधक यंत्र :-
 
               यामध्ये सोडिअम बाय कार्बोनेट असून, एका कुपित विरल सल्फ्युरिक आम्ल असते. कळ दाबल्यावर कुपीतील आम्ल सोडीअम बाय कार्बोनेटवर पडते. रासायनिक अभिक्रिया होते व कार्बन डायऑक्साइड वायु मुक्त होऊन बाहेर पडतो.
सोडीअम बाय कार्बोनेट (2NaHCO3) + सल्फ्युरिक आम्ल (H2SO4)——à सोडीअम सल्फेट (Na2SO4) +पाणी (2H2O)+कार्बन डायऑक्साइड (2CO2).
उपयोग :–
               शीतपेयाच्या निर्मितीत कार्बन डायऑक्साइडचा उपयोग होतो. शुष्क बर्फ तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड चा वापर होतो. अग्निशमन वायु म्हणून कार्बन डायऑक्साइड चा वापर होतो. धुण्याचा सोडा तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड चा वापर होतो. खाण्याचा सोडा निर्मितीत कार्बन डायऑक्साइड वापरतात. वनस्पतींना कार्बन डायऑक्साइड चा उपयोग होतो.
मिथेन :–
                कार्बन आणि हायड्रोजन यांच्या संयोगातून जे ऊर्जा देणारे हायड्रोकार्बन मिळतात, त्यांतील पहिले संयुग म्हणजे मिथेन. मिथेन चे रेणुसूत्र CH4 आहे. त्यात कार्बन चा एक अणू तर हायड्रोजन चे चार अणू असतात.
                निसर्गात मिथेन वायु दलदलित सापडतो, म्हणून मिथेनला मार्शगॅस म्हणतात. दाब देऊन मिथेनचे द्रविकरण करता येत नाही. त्यामुळे तो सिलेंडरमध्ये न भरता नळाद्वारे हवा त्या ठिकाणी न्यावा लागतो. मिथेन वायु हवेच्या सानिध्यात पेटवला असता निळ्या ज्योतिने भराभर जळू लागतो. एक नैसर्गिक इंधन मिथेन चे विशेष महत्व आहे.
 
मिथेनची निर्मिती :
 
                गोबरगॅस संयंत्रातून मिथेन हा वायु मिळतो. गोबरगॅस सयंत्रातून हवेच्या अनुपस्थितीत वनस्पति आणि प्राण्यांच्या टाकाऊ पदार्थापासून मिथेन वायु मिळतो.
प्रयोगशाळेत हायड्रोजन आणि कार्बन मनोक्साइड यांचे मिश्रण 300 अंश से. ला निकेल या धातूच्या उपस्थितीत तापवल्यास मिथेन वायु तयार होतो.
 
मिथेन चे गुणधर्म:–
 
               मिथेन हा वायु गंधहीन, चवहीन आणि रंगहीन असून तो हवेपेक्षा हलका असतो. तो पाण्यात विरघळत नाही. मिथेन हा अतिशय ज्वालाग्राही असून जळताना त्याची ज्योत निळी दिसते.
मिथेन चा उपयोग :–मिथेन प्रामुख्याने इंधन म्हणून उपयोग होतो. अॅसीटिलीन या कार्बन संयुगाच्या निर्मितीसाठी मिथेन चा उपयोग होतो,

Chapter 15: हवा

 
 
               हवेत 78% नायट्रोजन, 21% ऑक्सीजन आणि इतर वायु 1% असतात.
ऑक्सिजन :– वातावरणात ऑक्सिजन मुक्त अवस्थेत आढळतो. पाण्यातही तो विरघळलेल्या अवस्थेत असतो सजीवांचे अस्तित्व ऑक्सिजनवर अवलंबून असते.
प्रयोग शाळेत ऑक्सिजन तयार करण्याच्या पद्धती :–
प्रयोगशाळेत ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी एका परीक्षानळीत पोटॅशियम क्लोरेट आणि मॅगनीज डायऑक्साइड यांचे 5:1 असे मिश्रण घ्यावे लागते. त्यांच्या या मिश्रणाला 300 अंश से. पर्यंत उष्णता दिल्यास ऑक्सिजन वायु तयार होतो. ऑक्सिजन हा वायु हवेपेक्षा किंचित जड आहे.
 
ऑक्सिजन चे भौतिक व रासायनिक गुणधर्म :–
                  ऑक्सिजन हा रंगहीन, गंधहीन व चवहीन वायु आहे. ऑक्सिजन अल्प प्रमाणात पाण्यात विरघळतो. ऑक्सिजन इतर मूलद्रव्यांशी सहज संयोग पावून त्यांची ऑक्साइडे तयार होतात.
 
ऑक्सिजनचे उपयोग :–
 
                  सजीवांच्या श्वसनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. श्वसनाला अडथळा येत असल्यास ऑक्सिजन चा पुरवठा करतात. रुग्ण, उंच पर्वतावर जाणारे गिर्यारोहक, सागरतळाशी जाणारे पाणबुडया यांना ऑक्सिजन चा पुरवठा सिलंडर मधून करतात. वेल्डिंग ची कामे करण्यासाठी ऑक्सिहायड्रोजन (2800 से. तापमान) किंवा ऑक्सिअॅसिटिलीन (3300 अंश से तापमान) या मिश्र ज्योतींचा वापर करतात.
नायट्रोजन :–
 
                 हवेत सर्वात जास्त प्रमाणात नायट्रोजन आहे. नायट्रोजन हा प्रथींनांचा महत्वाचा घटक आहे. म्हणूनच सजीवांच्या वाढीसाठी तो आवश्यक आहे. हवेतील नायट्रोजन जशाचा तसा वापरता येत नाही. त्यासाठी त्याचे स्थिरीकरण होणे आवश्यक असते.
 
नायट्रोजनचे स्थिरीकरण :–
                वातावरणातील नायट्रोजन जसाच्या तसा वापरता येत नाही, म्हणून सजीवांना उपयुक्त ठरणार्‍या नायट्रोजनचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेट्स अशा संयुगात होण्याला नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतात. हे स्थिरीकरण जैविक आणि वातावरणीय असा दोन्ही घटकात होते.
 
नायट्रोजन चे जैविक स्थिरीकरण :–
 
                 नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणणारे सूक्ष्मजीव दोन प्रकारचे असतात. त्यांपैकी एका प्रकारचा सूक्ष्मजीव वनस्पतीच्या मुळावरील गाठीत असतात. मुळावरील गाठीत असणारे सूक्ष्मजीव वातावरणातील नायट्रोजन शोषून त्यांचे नायट्रोजन संयुगात रूपांतर करतात.
                 मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव वातावरणातील नायट्रोजनचे अमोनिया, नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल यांच्यात रूपांतर करून सरतशेवटी त्यांचे नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात.
 
                वातावरणीय स्थिरीकरण :-– आकाशात जेव्हा वीज चमकते, तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साइड तयार होते. या नायट्रिक ऑक्साइडचे पुन्हा ऑक्सिडीकारण होऊन नायट्रोजन डायऑक्साइड बनते.
पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साइड विरघळते आणि सरतशेवटी त्याचे नायट्रिक आम्लात रूपांतर होते. हे नायट्रिक आम्ल रूपांतर होते. हे नायट्रिक आम्ल पावसाबरोबर जमिनीवर येते आणि जमिनीतील क्षारांची क्रिया होऊन त्याचे नायट्रेट्स बनातात. वनस्पति स्वतःच्या वाढीसाठी त्यांचा उपयोग करून घेतात.
                अशा प्रकारे हवेतील नायट्रोजन जैविक आणि वातावरणातील स्थिरिकरण होऊन सजीववांना नायट्रोजन उपलब्ध होतो.
                स्थिरीकरण झालेल्या नायट्रोजनचे जैविक आणि वातावरणीय उत्सर्जन, कुजणे, तसेच ज्वलन अशा क्रियाद्वारे नायट्रोजन पारत हवेत सोडला जातो. अशा प्रकारे हवेतील नायट्रोजनचे वातावरणातील प्रमाण कायम राखले जाते.
 
नायट्रोजन चे काही उपयोग :–
 
                सजीवांच्या वाढीसाठी नायट्रोजन चा उपयोग होतो. नायट्रेट्स व खतांच्या स्वरुपात वनस्पतिना जमिनीतून नायट्रोजन मिळतो व त्यांची वाढ होते. वनस्पति या नायट्रोजन मिळतो व त्यांची वाढ होते. वनस्पति नायट्रोजनपासून प्रथिनेयुक्त पदार्थांची निर्मिती करतात. इतर सजीव हे पदार्थ अन्न म्हणून घेतात व त्यांची वाढ होते. खतांच्या निर्मिती साठी नायट्रोजन चा उपयोग होतो. उद्योगधंद्यामध्ये अमोनिया व नायट्रिक आम्लाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. उच्च तापमानाची तापमाप तयार करण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो.
 
आम्ल पर्जन्य :-
 
                मोठमोठ्या औद्योगिक शहरांत कारखान्यातून नायट्रोजन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड वे वायु निघतात. ते पावसाच्या पाण्यात विरघळून नायट्रट्स आणि सल्फ्युरस आम्ल तयार होते. ते पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते. यालाच आम्ल पर्जन्य म्हणतात. याचाच परिणाम म्हणून काही वेळा मोठाले वृक्ष उन्मळून पडतात, तसेच संगमरवरावरही पिवळे डाग दिसतात.

Chapter 16: मृदा.

  
                चीन देशातील काउलिंग नावाच्या टेकडीजवळ मिळणार्‍या मातीला चीनीमाती किंवा केओलीन म्हणतात. ही पांढर्‍या रंगाची असते. चीनी मातीच्या वस्तु सुशोभित करण्यासाठी निरनिराळ्या ऑक्साइडचा उपयोग करतात. लाल रंगासाठी आयर्न ऑक्साइड, हिरव्या रंगाकरिता कॉपर ऑक्साइडचा उपयोग केला जातो.
Chapter 17: शेती
 
  टिश्यू कल्चर (उती संवर्धन) :-
 
                 सजीवांच्या पेशी किंवा पेशीसमुहांची कृत्रिम पद्धतीने वाढ करणे, याला टिश्यू कल्चर म्हणतात. टिश्यू कल्चर म्हणजे सूक्ष्मरूपात केलेले पुनरुत्पादन. टिश्यू कल्चर करण्यासाठी स्थायुरूप माध्यमांचा वापर केला जातो. टिश्यू कल्चर करण्यासाठी केळी, औषधी वनस्पति अशी काही उदाहरणे आहेत.
                 सध्या चांगल्या वनस्पति किंवा प्राणी संख्या कमी होत आहे किंवा ते नामशेष पावत आहेत. त्यांची संख्या वाढावी यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे.
या पेशीमध्ये चांगल्या सजीवांच्या पेशींची कल्चर माध्यमाद्वारे निरीक्षणाखाली वाढ करून, नवीन सजीव निर्माण केले जातात. त्यामुळे चांगली फळे, फुले देणार्‍य वनस्पतींची संख्या वाढवता येते.
                 जेव्हा वनस्पतिमध्ये परागीभवन होण्यासाठी माध्यम उपलब्ध होत नाही, तेव्हा या पद्धतीचा वापर करून मूळ वनस्पतिसारख्या नवीन वनस्पति मिळवता येते.
 

Chapter 18: पशूसंगोपन.

 
                 टेबल एग्ज :— खाण्यासाठी उपयोगात येणारी अंडी फलित नसतात. म्हणजेच त्यापासून पिल्लू मिळू शकत नाही. अशा अंड्याना टेबल एग्ज असे म्हणतात.
 
मोती उत्पादन:-
 
                 प्राचीन काळा पासून मोत्याला फार महत्व आहे. अलंकार, शोभेच्या वस्तु, भरतकाम यासाठी मोत्यांचा उपयोग होतो. समुद्रात आढळणार्‍य आयस्टर प्राण्यापासून मोती मिळतात. पूर्वी आयस्टरमध्ये मोती तयार करण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागे. आता मानवाने वाळूच्या कणाचे आयस्टर च्या शरीरात योग्य वेळी रोपण करण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे मोठ्या आकाराच्या मोत्यांचे व्यापारी तत्वावर उत्पादन घेणे शक्य झाले आहे. यालाच कल्चर्ड मोती असे म्हटले जाते.
 
लाखउद्योग:–
 
                 भारतात औद्योगिक दृष्ट्या लाखेचे उत्पादन केले जाते. लाखेची निर्मिती केवळ भारतातच केली जाते. लाखेला व्यापारी मूल्य असल्यामुळे लाखेचे उत्पादन केले जाते.
रेशीमकिड्यांची पैदास :–
रेशीम किडयापासून उच्च प्रतीचा रेशीम धागा मिळत असल्याने मानव रेशीम किड्यांची पैदास भारतात होते.
 
मत्स्योत्पादन :–
                 सध्या समुद्रात किंवा साठलेल्या पाण्यात विशिष्ट मत्स्यबीज सोडून माशांचे संवर्धन केले जाते आणि त्यांचा अन्न म्हणून उपयोग केला जातो. उत्तम प्रतीचे मत्स्यबीज उप्ल्बद्ध होण्यासाठी शासनाद्वारे मदत केली जाते.    
         
         
 
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment