कृष्णा नदी (krushna driver in marathi)

कृष्णा नदी

       कृष्णा नदीची लांबी किती ?

       भारतातील लांबी 1400 किमी
       महाराष्ट्रातील लांबी 282  किमी

       कृष्णा नदीचे क्षेत्रफळ किती ?

       भारतातील क्षेत्रफळ :-  2,58,948 चौ कीमी
       महाराष्ट्रातील क्षेत्रफळ  :- 28,700 चौ किमी.
  

       कृष्णा नदी कोणत्या जिल्ह्याचा संपूर्ण भाग व्यापते ? 

       कृष्णा नदी कोल्हापूर जिल्ह्याचा संपूर्ण भाग व्यापते व सातारा जिल्ह्यातील खंडाळा, माण व फलटण चा भाग सोडून सातारा जिल्ह्यातून वाहते तसेच सांगली जिल्ह्यातून वाहात जाते (जत व खानापूर चा पूर्व भाग सोडून )

      कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो ? 

       सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ला कृष्णा नदीचा उगम होतो. कृष्णा नदीचा प्रवाह सुरुवातीला दक्षिणेस नंतर पूर्वेस व आग्नेयेस होतो. 

      कृष्णा नदी कोणत्या राज्यातून वाहत जाते?

       कृष्णा नदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातून वाहात जाते. 
   

     कोणत्या डोंगरांच्या दरम्यान कृष्णा नदी वाहते ?

       पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगररांगे दरम्यान कृष्णा नदी वाहते. शंभू महादेव डोंगररांगे मुळे भीमा नदी कृष्णा नदीपासून वेगळी झाली आहे.
     महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यास अप्पर कृष्णा खोरे असे म्हणतात. 

      कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या ?

      कोयना, वारणा पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी  या नद्या कृष्णा नदीला उजव्या तिराने मिळता तसेच येरळा नदी कृष्णा नदीला डाव्या तिराने मिळते

      हे पण वाचा ;– भीमा नदी

    
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment