भाऊ दाजी लाड– bhau daji laad

  • जन्म:– 7 सप्टेंबर 1824
  • मृत्यू:– 31 मे 1874

त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी झाला. मांजरे हे त्यांचे आजोळ होते. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड हे होते. ते निष्णात डॉक्टर होते व त्यांची रोगापासून इलाज करण्याची हातोटी त्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून देखील ओळखले जात होते. ते एक समाजसेवक होते.

त्यांचे मूळ गाव गोव्यातील पेडणे तालुक्यातील पोर्से होते. त्यांच्या वडलांना दाजी म्हणून ओळखले जात असे. रामकृष्णास भाऊ म्हणून मित्रपरिवारात ओळखले जात असे त्यामुळेच त्यांचे पुढे चालून नाव भाऊ दाजी लाड असे प्रसिद्ध झाले. भाऊ दाजी लाड यांचे वडील पोर्से गावी शेती तसेच कारकुनी चे काम करत असे. नंतर त्यांचा परिवार 1832 साली व्यवसायानिमित्त मुंबई ला आले.

        शिक्षण:—–

त्यांनी 1836 मध्ये इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. 1840 मध्ये त्यांनी परीक्षा उत्तीर्ण होऊन एलिफिन्स्टंट कॉलेजात प्रवेश घेतला. 1840 ते 43 दरम्यान त्यांना दरमहा 40 रुपये फी मिळाली. 1843 मध्ये एलिफिन्स्टंट कॉलेजातच ते शिक्षक म्हणून रुजू झाले. इतिहास, भूगोल, संस्कृत, रसायनशास्त्र इत्यादी विषयात त्यांना रस होता. मुंबई प्रांत सरकार तर्फे आयोजित बालकन्या हत्या विषयावरील निबंध स्पर्धेत त्यांच्या निबंधास प्रथम पारितोषिक मिळाले.  1875 मध्ये त्यांनी ग्रांट मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. विद्यार्थी दशेत त्यांनी ग्रंथपाळाची नोकरी केली. 1851 साली त्यांना बॅचलर डिग्री मिळाली. 8 नोव्हेम्बर 1851 साली त्यांनी ग्रॅंट कॉलेज मेडिकल सोसायटी ची स्थापना केली.

      डॉक्टर ची पदवी मिळाली

1851 साली त्यांना वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळाली. नंतर त्यांनी स्वतंत्र वैद्यकिय व्यवसाय सुरू केला. गरिबांसाठी त्यांनी मोफत दवाखाना सुरू केला. त्यांनी औषधा मधील संशोधन करणे सुरू ठेवले. त्यांनी कुष्ठरोगावरील औषध शोधून काढले. त्यामुळेच ते पुढे धन्वंतरी म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्ञानाचे महत्व त्यांना जाणवेल व त्यांनी स्त्री सुधारणेसाठे शिक्षणा शिवाय पर्याय नाही हे जाणवले. त्यांनी स्वतः आर्थिक नुकसान सहन करून स्त्री शिक्षणासाठी कार्य केले. त्यांनी काही काळ कापसाची दलाली केली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध संपल्यानंतर त्यांना व्यवसायात प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे त्यांना ग्रंथालय व घरदार विकावे लागले.

सामाजिक कार्य:–

       
त्यांनी स्त्री शिक्षणा साठी कार्य केले त्यासाठी त्यांनी आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यांनी स्वतंत्र खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता तेव्हा त्यांनी गरिबांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. त्यांनी संशोधनावर भर देऊन कुष्ठरोगावर औषध शोधले तसेच ते औषधासाठी अनेक प्रयोग करीत असत त्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी देवीची लस लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ते डोळ्याच्या मोतिबिंदूवर शस्त्रक्रिया करत असत.

            बॉम्बे असोसिएशन संबंध :–

26 ऑगस्ट 1852 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेचे ते पहिले सरचिटणीस होते. संस्थेतर्फे त्यांनी ब्रिटिश पार्लमेंट ला अर्ज केला अनेक लोकांच्या साह्य घेतल्या. त्यांनी केलेला अर्ज म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचे पाहिले पान आहे असे काहीजण म्हणतात. त्यांनी जनतेच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा दिला.

  शिक्षणविषयक कार्य:–

              
ते पाश्चात्य शिक्षणाचे पुरस्कर्ते होते.  मुंबईत एलिफिन्स्टंट कॉलेजात विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रसारक सभा स्थापन केली. भाऊंनी 1852 मध्ये सरकारकडे अर्ज करून मुंबईत विद्यापीठाची मागणी केली. भाऊ एलिफिन्स्टंट निधीचे विश्वस्त व्यक्ती होते.

  ग्रंथ विषयक :–

               भाऊंना ग्रंथ खूप आवडतं असत. 1845 मध्ये स्थापन झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररी चे ते बरेच वर्षे अध्यक्ष होते.  ते इतिहास संशोधक व अभ्यासक होते. कालिदासाचा कालनिर्णय, शंकांचे हल्ले, जैन धर्माची परंपरा, जैन पत्तावतीचा काळानुक्रम हेमाद्रीचा काळ इत्यादी विषयावर त्यांनी शोधपर ग्रंथ लिहिले. भाऊ मुंबईतील रॉयल ऐतिहासिक सोसायटीचे सदस्य होते. दी लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी लाड या नावाने त्यांचे वाङ्मय प्रसिद्ध आहे.

   स्त्री शिक्षणाचे कार्य

मुंबईच्या लोहरचाळीतील स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन या संस्थेच्या कन्या हायस्कूल ला त्यांनी 16500 रु ची मदत केली. या संस्थेने मुंबईत 3 मराठी व 4 गुजराती शाळा सुरू केल्या. भाऊ या संस्थेचे अध्यक्ष होते.

विधवा विवाहविषयक कार्य–

  •            1869 मध्ये वेणूबाई या विधावेच्या पुनर्विवाह पांडुरंग विनायक करमकर यांच्याशी तर कुवर नावाच्या स्त्रीचा पुनर्विवाह झाला या विवाहाला भाऊ दाजी लाड उपस्थितीत होते.

            31 मे 1874 ला त्यांचा मृत्यू झाला.
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment