स्वातंर्‍य पूर्व काळातील काही महत्वाच्या स्त्री समाजसुधारक

इतिहासात समाजसुधारनेच्या कार्यात स्त्रियांनी देखील महत्वाचे कार्य  केले आहे.  त्यांचीच माहिती खालील थोड्या प्रमाणात दिली आहे.

सावित्री बाई फुले 

       
      सावित्रीबाई फुले —— पूर्ण वाचन्यासाठी येथे क्लिक करा.
पंडिता रमाबाई
      (1858 – 1922)
      स्त्रियांच्या सुधारणे मध्ये पंडित रमाबाईनी खूप मोलाचे योगदान दिले. रमाबाई यांनी पुण्यात आल्यानंतर न्या. रानडे व रमाबाई रानडे यांच्या मदतीने आर्य महिला समाजाची स्थापना केली (1882). स्त्रियांच्या उन्नती संदर्भात शिक्षण प्रसाराचे करी केले. भारताच्या शिक्षण पद्धतीची पुनर्रचना करण्यासाठी नेमण्यात आलेले कमिशन हांटर कमिशन ची स्थापना इंग्रजा तर्फे करण्यात आली त्या कमिशन समोर रमाबाई यांनी साक्ष दिली (सुधारणा सुचवल्या). 
      व्हाईसरॉय च्या पत्नी लेडी डफरीन च्या नावाने फंड स्थापन करून त्यांनी स्त्रियांना वैद्यकीय सेवा उप्लब्द करून दिल्या.
      पंडिता रमाबाई यांनी मार्च 1889 रोजी दोन विद्यार्थिनींना घेऊन मुंबई येथे शारदा सदन ची स्थापना करण्यात आली. 1891 मध्ये विधवासाठी शारदा सदन ची शाखा सुरू केली.
      1896 मध्ये पंडित रमाबाईनी केडगाव येथे मुक्ति सदन या ख्रिस्ती संस्थेची स्थापना केली. अंधासाठी पहिली शाळा बातमी सदन व अनाथ मुलींसाठी सदानंद सदन सुरू केले. त्या नंतर पतीत स्त्रियांसाठी कृपा सदन ची स्थापन केली. 1919 मध्ये सरकारने कैसार ए हिंद हा सन्मान देऊन पंडिता रमाबाईचा सत्कार केला.
      5 एप्रिल 1922 रोजी त्यांचा मृत्यू झाला.  
रमाबाई रानडे —
      1862-1924
      रमाबाई रानडे या खूप प्रभावी समाजसेविका होत्या. 1882 मध्ये पंडिता रमाबाई, कशिताई कानिटकर, आणि रमाबाई रानडे यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब 1894 मध्ये स्थापन केला. 1908 मध्ये रमाबाई रानडे यांनी मुंबई येथे सेवा सदन ची स्थापना केली. त्याच्या पुढच्या वर्षीच 1909 मध्ये पुण्यात सेवा सदन ची शाखा सुरू केली. 1918 मध्ये त्यांनी मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे या साठी प्रयत्न केले.
डॉ आनंदीबाई जोशी –
      1865 – 1887
      डॉ आनंदीबाई जोशी या अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या देशातील पहिल्या महिल्या होत. मिसेस टी इ कारपेंटर यांच्या मदतीने फिलाडेल्फिया येथील वुमेंस मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पेन्सिल्वानिया विद्यापीठातून 1886 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
ताराबाई शिंदे—1840 – 1910
      महात्मा फुले यांच्या कार्यापसून प्रेरणा घेऊन ताराबाई शिंदे 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला.
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment