राष्ट्रीय सभा —-rashtriy sabhaa

राष्ट्रीय सभा स्वातंत्र्य पूर्व काळातिल महत्वपूर्ण संघटन
      




     इंग्रज भारतात व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजांचा भारताच्या राजकारणात प्रवेश झाला. बक्सार लढाईमुळे प्रथमच इंग्रजांना आपल्या सैन्याची ताकद कळाली हळू हळू इंग्रजांनी संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले त्यानंतर इंग्रजांनी व्यापारावर भारताच्या परकीय धोरणावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली त्यांनी भारतीय जनतेवर अनेक कायदे करून अन्याय केला. त्याचा उद्रेक म्हणून 1857 चा उठाव घडून आला.
      पुढील काळात अनेक सुशिक्षित तरुण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत उतरले. भारतीय जनतेच्या संतापाला वाट काढून देण्यासाठी एखादी संघटना असावी असे डॉ अँलन ह्युम ला वाटू लागले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील शिक्षित वर्गाला देखील इंग्रजा विरुध्द्ध लढण्यासाठी सामूहिक रित्या प्रयत्न करावे असे वाटू लागले आशा वेळी एखादी संघटना स्थापना करण्यात यावी असा विचार समोर आला. या विचारातून डॉ अॅलन ह्युम, विल्यम वेडबर्न इत्यादि यूरोपियन लोकांनी भारतीय असंतोषाला विधायक वळण देण्यासाठी 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबई येथे गोकुलचंद विद्यालयाच्या प्रांगणात बॅंरिस्टर व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसभेची स्थापना करण्यात आली.
      राष्ट्रसभेच्या स्थापनेच्या वेळी दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, डॉ भांडारकर, सुरेद्रनाथ सेन,फिरोजशाहा मेहता, आगरकर, गंगाप्रसाद शर्मा इत्यादि व्यक्ति उपस्थित होते. राष्ट्रसभेच्या पहिल्या बैठकीस एकूण 72 प्रतींनिधी उपस्थित होते.
राष्ट्रसभेची उद्दिष्टे—-
      भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये पहिल्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेची काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे ठरवण्यात येतील.


·         भारतात विविध भागात जे लोक कार्य करीत आहेत त्यांचा परस्पर परिचय करून घेणे व त्यामध्ये प्रेमभावणा वाढवणे.
·         या देशावर प्रेम असणार्‍या लोकामध्ये प्रांत, धर्म, जात या घटकामध्ये प्रांत निरपेक्ष प्रेम सबंध निर्माण करणे. तसेच राष्ट्रीय ऐक्याची भावना लोकामध्ये जागृत करणे.
·         पुढील एका वर्षात राष्ट्रहिताचे जे कार्य करावयाचे आहे त्याचा अहवाल तयार करून रूपरेषा ठरवणे.
·         महत्वाच्या प्रश्नावर सुशिक्षित लोकांच्या मतांच्या आधारे विचार करणे.
या अधिवेशना मध्ये संमत करण्यात आले ठराव
     
     
·         इंग्रजांच्या भारतातील राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी हिन्दी कमिशन असलेले रोयल कमिशन ची नेमणूक करावी.
·         इंग्रजांच्या कायदे मंडळात हिन्दी प्रतींनिधींचा समावेश असावा.
·         इंग्लंडमधील भारतीय मंडळ रद्द करण्यात यावे किंवा त्या मंडळावर होणारा खर्च तिजोरीतून करावा.
·         लष्करी खर्च कमी करावा.
·         सिव्हिल सर्विसेस परीक्षा इंग्लंडप्रमाणे भारतातही व्हावी.
·         इंग्रज्जी प्रशासनात हिन्दी प्रतींनिधींचा समावेश अधिक प्रमाणात असावा.
राष्ट्रसभेचे कालखंड—-
     
      राष्ट्रसभेने आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. राष्ट्रसभेवर अनेक नेत्यांचा प्रभाव होता. त्यांनी वेग वेगळ्या काळी राष्ट्रसभेवर आपले वर्चस्व गाजवले त्यानुसार राष्ट्रसभेचे खालील कालखंड सांगता येतील.
पहिला कालखंड (1885-1905)-
      हा राष्ट्रसभेचा सुरुवातीचा कालखंड होता. या कालखंडास सुधारणाचे युग किंवा उदारमतवादी चळवळीचा कालखंड असेही म्हणतात. या कालखंडात राष्ट्रसभेवर मवाळ नेत्यांचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे या कालखंडास मवाळांचा कालखंड असे म्हणतात. या काळातील मवाळवादी नेत्यांचा इंग्रजांच्या न्याय बुद्धीवर पूर्ण विश्वास होता. आपले दुख इंग्रजा समोर मांडल्यास इंग्रज जरूर न्याय करतील असे या नेत्यांना वाटत होते. मवाळ नेत्या मध्ये व्योमेश चंद्र बॅनर्जी, फिरोज शहा मेहता, गोपाल कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, रसबिहारी बोस, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी इत्यादि नेत्यांचा समावेस होता.
दूसरा कालखंड (1906-1920)—
      या कालखंडास जहालवाद्यांचा कालखंड असे म्हणतात. कारण या कालखंडात राष्ट्रसभेवर जहालवादी नेत्यांचा प्रभाव होता. विनंत्या, अर्ज करून इंग्रज प्रशासन काहीच सुधारणा करत नाही हे पाहून काही नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारी मार्गांचा अवलंब केला व अनेक चळवळी उभारल्या. इंग्रजांना जसे च्या तसे प्रत्युत्तर देल्यासच इंग्रज वटणी वर येतील असे या नेत्यांना वाटत होते. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुति द्यायला देखील हे नेते घाबरत नसत.  जाहलवाडी नेत्या मध्ये बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय इत्यादि जहालवाडी नेत्यांचा समावेस होता.  तर क्रांतिकारा मध्ये दामोदर चाफेकर, अनंत कान्हेरे, खुदिराम बोस, राजगुरू,भगतसिंग, चंद्रसेखर आझाद इत्यादि क्रांतिकारांचा समावेस होता.
तिसरा कालखंड (1920–1947)
      जाहलवादी नेते लोकमान्य टिळक यांचा अकाली मृत्यू झाला (1 ऑगस्ट 1920). त्यामुळे राष्ट्रसभेचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्यावर येऊन पडले आणि तेथेच जहावादाचा कालखंड संपला. म्हणजेच टिळक युग संपून गांधी युगास प्रारंभ झाला. गांधीजींनी राष्ट्रीय सभेला पाहिल्यासारखे म्हणजेच मवाळवादी बनवले. गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अहिंसा व सत्यगृह या तत्वांचा अवलंब केला. त्यांनी केलेल्या काही चळवळी मध्ये असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, चलेजाव चळवळ इत्यादि. गांधीजी व इतर नेत्यांनी अखेर भारतास स्वातंत्र्य मिळून दिले.       
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment