पंडिता रमाबाई जीवन परिचय सामाजिक कार्य-pandita ramabai in marathi

 

प्रारंभीक जीवन

——-पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 ला कर्नाटक येथील गंगामुळ या ठिकाणी झाला. त्यांचे लग्ना आधीचे पूर्ण नाव रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे असे होते. आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते.अनंतशास्त्री हे त्यांचे वडील होते. रमाबाई या अनंतशास्त्री यांच्या दुसर्‍या पत्नी ची मुलगी होती. त्यांचे मूळ गाव माळहेरंजी (जी. रत्नागिरी) हे आहे. रमाबाई यांचे वडील प्रख्यात समाजसेवक होते म्हणजेच समाजसेवेचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून प्राप्त झाला आहे. त्यांचे वडील म्हैसूर दरबारात नोकरीस होते. उत्तर भारतात आपल्या परिवारासोबत यात्रा करत असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला सन 1874. स्त्री शिक्षण क्षेत्रात पंडिता रमाबाई यांचे कार्य खूप मोलाचे आहे.

——–त्याकाळी स्त्रियांना संस्कृत शिकण्याची परवानगी नव्हती परंतु रमाबाई यांच्या वडिलांनी त्यांच्या दुसर्‍या पत्नी लक्ष्मीबाई यांना संस्कृत शिकवले. यामुळे त्यांना समाजाचा त्रास सहन करावा लागला. पुढे रमाबाईंनी देखील संस्कृत शिकून घेतली. कालांतरणाने रमाबाई यांचे वडील निर्धन झाले व दुखात त्यांचे निधन झाले. त्यांचे आईचे निधन आधीच झाले होते. यानंतर रमाबाई त्यांच्या ज्येष्ठ भावासह भारत भ्रमनावर निघाल्या. पुढे भारतात फिरत असता त्या कोलकत्ता या ठिकाणी पोहचल्या. संस्कृत मध्ये त्या कुशल होत्या त्यामुळे त्यांना तेथे पंडिता व सरस्वती अशा उपाधी देण्यात आली.

——–13 ऑक्टोबर 1880 ला पंडिता रमाबाईंनी बापू बिपिन बिहारीदास यांच्याशी लग्न केले. या विवाहनंतर नातेवाईकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. विवाहाच्या अवघ्या दोन वर्षांनंतर त्यांचे पती बापू बिपिन बिहारीदास यांचा मृत्यू झाला (फेब्रुवारी 1882). पतीच्या निधनानंतर न्या. म गो रानडे व रा. गो भांडारकर यांच्या निमंत्रणानंतर त्यांनी पुण्याला आपली मुलगी मनोरमासह पलायन केले (मार्च 1882).

पंडिता रमाबाई यांची विदेशयात्रा

  • इंग्लंड

……...30 एप्रिल 1883 ला त्या भारतातून इंग्लंड ला जाण्यास निघाल्या त्यांच्या सोबत त्यांची कन्या मनोरमा देखील होती व आनंदीबाई या शिक्षिका होत्या. 16 मे 1883 ला त्या इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी पोहचल्या. सदाशिव पांडुरंग केळकर यांना रमाबाईंनी आपले प्रवासातील अनुभव संगितले. ऑगस्ट 1883 साली आनंदीबाई भगत यांची श्रवणशक्ती गेली याचा धक्का त्या सहन करू शकल्या नाही त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. यातच पंडिता रमाबाई यांनी 30 सप्टेंबर 1883 रोजी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. यानंतर त्यांचे नाव बदलून मेरी रमा व मुलीचे नाव मेरी मनोरमा असे झाले. लंडनमध्ये सिस्टर जेराल्डिन व प्रा. बिल यांच्या शिकवणीचा प्रभाव रमाबाई यांच्यावर पडला. रमाबाईनी येथेच चेल्टनहॅम मध्ये शिक्षिकेचे शिक्षण घेतले.

  • अमेरिका

………. 17 फेब्रुवारी 1886 साली त्या इंग्लंडवरुण अमेरिकेस प्रवासास निघाल्या. आणि 6 मार्च 1886 रोजी त्या फिलाडेल्फिया या ठिकाणी पोहचल्या. 11 मार्च 1886 ला भारतातील प्रथम महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी त्या अमेरिकेत गेल्या. डॉ रचेल बौडले यांनी त्यांना आमंत्रित केले होते.

  • जपान

………… रमाबाई नोव्हेंबर 1888 ला सॅनफ्रान्सिस्को या ठिकाणाहून जपान ला जाण्यासाठि निघाल्या. 19 डिसेंबर 1888 ला त्या जपान येथील योकोहामा या ठिकाणी पोहचल्या.या दौर्‍यात त्यांनी जपान चे युवराज व युवराजज्ञी यांच्या वाड्याला भेट दिली.

  • चीन

………….रमाबाई 15 जानेवारी 1989 रोजी हाँगकाँग येथे पोहचल्या. 22 जानेवारी पर्यंत त्या चीनमध्ये होत्या. येथून निघून त्या 27 जानेवारी1889 रोजी भारतात पोहचल्या.

पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्था

शारदा सदन

  • 11 मार्च 1889 ला मुंबई या ठिकाणी शारदा सदनची स्थापना करण्यात आली. विलसण कॉलेज जवळ या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
  • सुरूवातीला 2 विद्यार्थिनी घेऊन या संस्थेची स्थापना करण्यात आली. सदनात आलेली पहिली मुलगी शारदा गद्रे हिच्या नावावरून या सदनाचे नाव शारदा सदन असे ठेवण्यात आलेले होते.
  • हे सदन विधवा महिलासाठी स्थापन करण्यात आले होते.
  • शारदा सदन स्थापना समारंभाच्या अध्यक्षा काशीबाई कानिटकर होत्या.
  • शारदा सदन मध्ये इंग्रजी शिकवण्यासाठी मिस मेडण या शिक्षिका नेमण्यात आल्या होत्या.
  • शैक्षणिक अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम अशा दोन स्वरुपात या संस्थेत अभ्यासक्रम उपलब्ध होता.
  • शारदा सदन मुंबईत असताना या संस्थेच्या सल्लागार मंडळात पंडिता रमाबाई, डॉ आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्या. का त्र्य तेलंग, ना म चंदावार, सदाशिव वामन काणे व सदाशिव केळकर, रामचंद्र वी माडगावकर हे होते.
  • नोव्हेंबर 1890 रोजी शारदासदन चे स्थलांतर पुणे या ठिकाणी करण्यात आले.
  • शारदा सदन च्या पुण्याच्या सल्लागार मंडळात न्या. महादेव गोविंद रानडे व गोपाळहरी देशमुख हे होते.
  • शारदा सदन च्या दुसर्‍या वर्धापन दिनी स्त्री पुरुष मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे अध्यक्ष पंडिता रमाबाई या होत्या.
  • शारदा सदन मधील काही मुलींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता यातूनही बरेच वाद झाले होते. लोकमान्य टिळकांनी तर सदनवर केसरी वृत्तपत्रातून टीका केली.
  • महर्षि धोंडो केशवकर्वे यांनी 1893 ला शारदासदन मधील विधवा गोदुबाई हिच्याशी विवाह केला. या वेळी पंडिता रमाबाईनी गोदुबाई च्या नावाने 3000 रु ची विमा पॉलिसी काढण्यास सांगतले जे की कर्वे यांना काढावायचे होते.
  • शेवटी शारदा सदन पुण्याजवळ 34 मैलावर असणार्‍या केडगाव या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

आर्य महिला समाज

  • 30 एप्रिल 1882 साली रमाबाईनी पुण्यात आर्य महिला समाज स्थापन केले.
  • स्त्रियांची अत्याचारापासून सुरक्षा करण्यासाठी त्यांनी या समाजाची स्थापना केली.
  • रमाबाईना या संस्थेच्या स्थापनेत मदत करणारे व्यक्ति ;– रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, रखमाबाई राऊत.
  • रमाबाई या पुण्याला गेल्या तेव्हा तिथे त्यांच्या सभा भरत, त्यांची भाषणे ऐकण्यासाठी लोक जमा होत असे परंतु त्यांनी एक अट ठेवली होती ती म्हणजे माझ्या सभेला येताना पुरुषांनी त्यांच्या पत्नीस किवा त्यांच्या घरातील कोणत्याही स्त्रीस सोबत आणावे .
  • आर्य महिला समाजाचा विस्तार पुढील जिल्ह्यात होता ; सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, बार्शी, ठाणे.

रमाबाई असोसिएशन

  • रमाबाई असोसिएशन ची स्थापना 13 डिसेंबर 1887 साली अमेरिकेत करण्यात आली.
  • अमेरिकेत पैसे जमा करून दरवर्षी 5000 डॉलर भारतात पाठवण्यासाठी त्यांनी ही संस्था स्थापन केली. दर वर्षी डिसेंबरमध्ये असोसिएशन ची सभा भरत असे. याच दिवशी रक्कम जमा केली जात असे.
  • असोसिएशन च्या सभासदांनी दरवर्षी कमीत कमी 1 डॉलर वर्गणी जमा करण्याचा नियम बनवण्यात आला होता हा नियम दहा वर्षांसाठी बनवण्यात आला होता.
  • याच पैशातून रामबाईंनी शारदा सदन ची

मुक्ति सदन

  • 1897 साली रामबाईंनी मुक्ति सदन ची स्थापना केली होती.
  • शारदा सदन ला स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी मुक्ति सदन ची स्थापना केली होती.
  • मुक्ति मिशन मध्ये 300 अनाथ महिला होत्या. येथे महिलांच्या स्वावलंबीपणा भर दिला जात असे.

कृपा सदन

  • 1899 साली केडगाव या ठिकाणी कृपा सदन ची स्थापना करण्यात आली.
  • लैंगिक शोषणाला बळी पाडलेल्या व पतीता म्हणून समाजाने नाकारलेल्या स्त्रीयांचे पुनर्वसन करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.
  • लंडनमधील सीएसएमव्ही तर्फे चालवण्यात येणार्‍या पतीतगृहावरुण याची स्थापना करण्यात आली.

प्रीतीसदन

  • समाजातील लंगड्या, लुळया, अपंग बहिर्‍या इत्यादि सदस्यासाठी शारदा सदन ची स्थापना करण्यात आली.

सदानंद सदन

  • अनाथ मुलांसाठी सदानंद सदन ची स्थापना करण्यात आली. मुक्ति मिशन मध्ये हा स्वतंत्र विभाग होता.
  • येथे दुष्काळी भागातील देखील मुले येत असे.

बातमी सदन

  • अंध मुली व स्त्रियांसाठी मुक्ति मिशन मध्ये हा स्वतंत्र विभाग होता. येथे रामबाईंच्या मुली मनोरमा शिकवण्याचे कार्य करत असे.
  • ही भारतातील पहिली अंधासाठींची शाळा होय.

पंडिता रमाबाई यांनी लिहिलेले ग्रंथ

स्त्री धर्मनीती – जून 1882 साली लिहिले.

उच्चवर्णीय हिंदू स्त्री – जून 1887 साली लिहिले.

युनायटेड स्टेट ची लोकस्थिति – प्रवासवर्णन – 1886 साली लिहिले.

बाबल च मराठीत अनुवाद – 1905 साली केला.

माझी साक्ष – हे आत्मवृत्तपर लिखाण 1907 साली केले.

द टेस्टीमनी – हे इंग्रजी पुस्तक 1907 साली लिहिले.

नवा करार – हे पुस्तक 1912 साली लिहिले

इंग्लंड चा प्रवास – हे पुस्तक 1883 साली लिहिले

पंडिता रमाबाई यांचे राजकीय कार्य

पंडिता रामबाईंनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली. त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये स्त्रियांना सदस्यत्व मिळावे यासाठी देखील मागणी केली. 1889 च्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये देखील त्या सहभागी झाल्या.

पंडित रमाबाई यांना कैसर ए हिंद पदवी कधी मिळाली

19 डिसेंबर 1919 रोजी ब्रिटिश सरकारने त्यांनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भात केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी कैसर ए हिंद ही पदवी दिली.

पंडिता रमाबाई यांचा मृत्यू 5 एप्रिल 1922 रोजी झाला.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment