अर्थशास्त्र टेस्ट 2 – online mpsc economics test 2

  • भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न कोणत्या व्यक्तीने केला ? 
  • दादाभाई नौरोजी. (1867-68 मधये) 
  • राष्ट्रीय उत्पन्न समिति ची स्थापना कधी करण्यात आली ? 
  • 4 ऑगस्ट 1949 (अध्यक्ष : पी सी महालनोबिस ) 
  • भारतातील केंद्रीय सांख्यिकी संघटनेची स्थापना कधी करण्यात आली ?
  • 1954 मध्ये. (एप्रिल 1955 मध्ये कार्यारंभ ). 
  • CSO चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? 
  • दिल्ली. 
  • राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण ची स्थापना कधी करण्यात आली ?
  • 1950 मध्ये. 
  • राष्ट्रीय नमूना सर्वेक्षणाची पुनर्रचना कधी करण्यात आली ? 
  • मार्च 1970. 
  • राष्ट्रीय सांख्यिकी आयोग कधी स्थापन करण्यात आला ?
  • जानेवारी 2000 मध्ये. 
  • राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली ?
  • डॉ सी रंगराजन. 
  • कायमस्वरूपी सांख्यिकी आयोगाची स्थापना कधी करण्यात आली व कोणाच्या अध्यक्षते खाली करण्यात आली ?
  • 12 जुलै 2006 (अध्यक्ष : प्रो सुरेश तेंडुलकर). 
  • मौद्रिक जिडीपि ची व्याख्या द्या ?
  • बाजारभावाला मोजलेल्या जिडीपि ला मौद्रिक जिडीपि असे म्हणतात. 
  • वास्तविक जिडीपि ची व्याख्या द्या ?
  • स्थिर किंमतीस मोजलेल्या जिडीपिला वास्तविक जिडीपि असे म्हणतात. 
  • भारताचे पहिले आधारभूत वर्ष कोणते ते सांगा ?
  • 1948-49 
  • दादाभाई नौरोजींच्या मते 1868 मते भारताचे दरडोई उत्पन्न किती होते ?
  • 20 रु. 
  • आर्थिक वृद्धी कोणत्या प्रकार ची संकल्पना होय ?
  • संख्यात्मक संकल्पना. 
  • राष्ट्रीय उत्पाद कोणत्या किंमतीला मोजला जातो ?
  • बाजारभावाला. 
  • राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या किंमतीस मोजले जाते ?
  • घटक किंमतीस. 
  • दादाभाई नौरोजींच्या मते 1868 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न किती होते ?
  • 340 कोटी. 
  • कोणता निष्कर्ष काढण्यासाठी लोरेंझ वक्र रेषा व गिनी गुणांकाचा वापर केला जातो ?
  • उत्पन्न व संपत्तिची समानता/विषमता
  • यूएनडीपी ने पहिल्यांदा मानवविकास अहवाल कधी जाहीर केला ?
  • 1990 मध्ये. 
  • भारतातील नियोजन मंडळाची स्थापना कधी करण्यात आली होती?
  • 15 मार्च 1950. 
  • राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी करण्यात आली ?
  • 6 ऑगस्ट 1952. 
  • कोणत्या काळात पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आली होती ?
  • 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956                     
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment