रामकृष्ण मिशन – mpscmaster.in

रामकृष्ण मिशन ची स्थापना 1 मे 1897 साली स्वामी विवेकानंद यांनी केली होती. ही एक धार्मिक, अध्यात्मिक व मानवतावादी संस्था होती. स्वामी विवेकानंदन यांनी या मिशन द्वारे लोकांना धार्मिक व अध्यात्मिक शिक्षण दिले. ही संस्था स्थापन करण्याची मूळ प्रेरणा म्हणजे रामकृष्ण परमहंस आहेत. स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या प्रेरणेने ही संस्था स्थापन केली होती. ही संस्था स्थापन करण्यात रामकृष्ण परमहंस यांच्या इतर शिष्यांचा देखील हातभार लागला होता जसे स्वामी प्रेमानंद, स्वामी शिवानंद, स्वामी शारदानंद. रामकृष्ण मिशन चे मूळ नाव रामकृष्ण संघ असे होते.

रामकृष्ण मिशनने कर्मकांड, अंधश्रद्धा व अत्यांकीत ग्रंथप्रामाण्य याला विरोध केला होता. रामकृष्ण मिशनने हिंदू तत्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व जागतिक पातळीवर सिद्ध केले. वेदांचा प्रचार प्रसार करणे हा या संस्थेच्या स्थापने मागचा उद्देश होता. रामकृष्ण मिशन चे ध्येयवाक्य – आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच ( आपला मोक्ष व संसाराच्या हितासाठी)

रामकृष्ण मिशन ची स्थापना कलकत्ता या ठिकाणी करण्यात आली असली तरी या संस्थेचे दोन मुख्यालय होते ते म्हणजे एक वेल्लूर आणि दुसरे अलमोडा येथे.

रामकृष्ण मिशन चे विचार

  1. वेदांवर विश्वास होता.
  2. ईश्वराचे अस्तित्व मान्य, ईश्वरावर आस्था होती.
  3. मूर्तिपूजा मान्य
  4. अवडंबर, कर्मकांड इत्यादी चा विरोध होता.
  5. सामाजिक दुष्ट चालीरीती चा विरोध होता.
  6. सर्व धर्माना मान्यता
  7. इंग्रजी शिक्षणाचे समर्थक

संस्थेच्या स्थापनेपासून स्वामी विवेकानंद स्वतः 1901 पर्यंत या संस्थेचे अध्यक्ष राहीले. रामकृष्ण मिशन ने धर्म सुधारणा चळवळीत मोलाचे कार्य केले व या कार्यात आपली छाप सोडली.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment