भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीस मिळणारे फायदे – Bharatranta puraskar prapt vyaktis milnare fayde. Bharat ratna awards and benefits given to the bharatna winner

भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या पुरस्काराची स्थापना 2 जानेवारी 1954 ला करण्यात आली. हा पुरस्कार कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता दिला जातो. वंश, धर्म, जात, व्यवसाय इत्यादी कोणत्याही गोष्टीचा विचार हा पुरस्कार देताना करण्यात येत नाही. 1954 साली जेव्हा हा पुरस्कार स्थापन करण्यात आला होता तेव्हा हा पुरस्कार केवळ कला, साहित्य,विज्ञान, सार्वजनिक सेवा या पुरता मर्यादित होता परंतु डिसेंबर 2011 मध्ये यात बदल करून ‘मानवी प्रयत्नांच्या कोणत्याही क्षेत्रासाठी’ असा बदल करण्यात आला. तसेच या पुरस्काराच्या स्थापने वेळी हा पुरस्कार मरणोत्तर देण्याचा कोणताही नियम नव्हता जानेवारी 1966 साली यात बदल करून हा पुरस्कार मरणोत्तर देण्याचा नियम करण्यात आला व लाल बहादूर शास्त्री यांना याच वर्षी मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला.

हे पुरस्कार आता पर्यंत दोन वेळेस बंद करण्यात आले होते. जुलै 1977 ते जानेवारी 1980 व ऑगस्ट 1992 ते डिसेंबर 1995.

भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला पुढील सुविधा/ फायदे मिळतात. bharatratna puraskar prapt vyaktila pudhil suvidha/fayade miltat

  1. भारतरत्न प्राप्त व्यक्तीला कोणताही आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरण्याची आवश्यकता नसते.
  2. भारतरत्न प्राप्त व्यक्ती कोणत्याही रेल्वेगाडी च्या वर्ग एक च्या डब्यात फ्री सेवा मिळवण्याचा हकदार असतो.
  3. भारतरत्न प्राप्त व्यक्तीने अर्ज केल्यास त्याची गरज बघता भारत सरकार त्या व्यक्तीला झेड प्लस (Z+) सुरक्षा प्रदान करू शकते.
  4. पुरस्कार प्राप्त व्यक्ती संसदच्या कोणत्याही सदनात उपस्थित राहू शकते.
  5. कॅबिनेट मिनिस्टर ला मिळणाऱ्या सर्व सुविधा भारतरत्न प्राप्त व्यक्तीलाही मिळतात. उदा- भत्ते, राहण्याची सुविधा इत्यादी.
  6. आपण भारतात कोणत्याही राज्यास भेट दिल्यास तिथली राज्य सरकार आपल्याला पर्सनल गेस्ट हाऊस उपलब्ध करून देते. म्हणजेच पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या राहण्याची सोय राज्य सरकार करते.
  7. पुरस्कार प्राप्त व्यक्तीस बाहेर देशात कोणतीही समस्या आल्यास त्या देशातील राजदूत कार्यालय सर्व प्रथम आपल्या समस्या सोडविल.
  8. भारतरत्न प्राप्त व्यक्तीस इंडियन एअरलाईन मध्ये पैसे न देता प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होती. परंतु सध्या त्या एअरलाईन चे खाजगीकरण करण्यात आले आहे.
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment