चालू घडामोडी क्विझ 21 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 – mpsc current affairs quiz 21 feb to 29 feb 2024

1-बापू टावर कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले आहे ?
  • बिहार
  • राजस्थान
  • मध्य प्रदेश
  • उत्तर प्रदेश
  • बिहार
  • 2-हडप्पा संस्कृतीशी संबंधित आणखी एक नवीन स्थळ सापडले आहे त्या स्थळाचे नाव लोद्राणी असे आहे, हे स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
    • बिहार
    • गुजरात
    • मध्य प्रदेश
    • उत्तर प्रदेश
  • गुजरात
  • 3-लिग्नोसॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने निर्माण केला आहे ?
    • चीन
    • फ्रांस
    • जपान
    • इटली
  • जपान
  • लिग्नोसॅट सॅटेलाईट माईंडमॅप pdf Download करा

    4-ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचे नुकतेच निधन झाले. खालीलपैकी कोणत्या घटनेशी त्यांचा संबंध होता ?
    • भोपाळ गॅस दुर्घटना
    • ग्लोबल वार्मिंग
    • कारगिल युद्ध
    • कारगिल युद्ध
  • भोपाळ गॅस दुर्घटना
  • फली नरिमन यांच्या विषयी माईंडमॅप Download करा.

    5-अलीकडेच कोणत्या व्यक्तीला फ्रांस चा सर्वोच्च सन्मान नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर मिळाला आहे ?
    • अक्षय कुमार
    • शशी थरूर
    • डी वाय चंद्रचूड
    • किरण आहुजा
  • शशी थरूर
  • 6-कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो ?
    • 22 फेब्रुवारी
    • 21 फेब्रुवारी
    • 24 फेब्रुवारी
    • 27 फेब्रुवारी
  • 21 फेब्रुवारी
  • 7-अलीकडेच भारतीय अंतराळ क्षेत्रात किती टक्के FDI ला मंजुरी देण्यात आली ?
    • 100 टक्के
    • 80 टक्के
    • 75 टक्के
    • 65 टक्के
  • 100 टक्के
  • 8-भारतीय अंतराळ क्षेत्रात ऑटोमॅटिक रूट ने किती टक्के FDI ला मंजुरी देण्यात आली आहे ?
    • 46 टक्के
    • 74 टक्के
    • 76 टक्के
    • 84 टक्के
  • 74 टक्के
  • 9-मॉर्निंग कन्सल्ट च्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण ठरले आहे ?
    • नरेंद्र मोदी
    • इमॅन्युअल मॅक्रोन
    • जो बायडन
    • लोपेझ अब्रॉडर
  • नरेंद्र मोदी
  • 10-खालीलपैकी कोणती संस्था शालेय विद्यार्थ्यासाठी ओपन बुक परीक्षा घेणार आहे ?
    • NCERT
    • CBSE
    • महाराष्ट्र बोर्ड
    • तामिळनाडू बोर्ड
  • CBSE
  • 11-नुकतेच मनोहर जोशी यांचे निधन झाले. ते महाराष्ट्राचे माजी ——– होते.
    • अर्थ सचिव
    • महान्यायवादी
    • मुख्यमंत्री
    • यापैकी नाही
  • मुख्यमंत्री
  • 12-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे विभागीय नाट्यसंमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे ?
    • महाबळेश्वर
    • लोणावळा
    • पन्हाळा
    • मुंबई
  • महाबळेश्वर
  • 13-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे विभागीय नाट्यसंमेलन कोणत्या कालावधीत होणार आहे ?
    • 22 ते 24 फेब्रुवारी 2024
    • 25 ते 28 फेब्रुवारी 2024
    • 23 ते 25 फेब्रुवारी 2024
    • 21 ते 23 फेब्रुवारी 2024
  • 23 ते 25 फेब्रुवारी 2024
  • 14-ऑडीसीयस स्पेसक्राफ्टने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग केली आहे हे कोणत्या देशातील खाजगी कंपनीचे स्पेसक्राफ्ट आहे ?
    • फ्रांस
    • अमेरिका
    • इंग्लंड
    • इटली
  • अमेरिका
  • 15-कोणत्या कंपनीने इंडस नावाचे पहिले स्वदेशी app स्टोअर सुरू केले आहे ?
    • फोन पे
    • पेटीएम
    • भारत पे
    • भीम
  • फोन पे
  • 16-पहिले स्वदेशी app स्टोअर इंडस चे उदघाटन कोणत्या व्यक्तीच्या हस्ते करण्यात आले ?
    • नरेंद्र मोदी
    • अश्विन वैष्णव
    • अजय मेहता
    • अमित शहा
  • अश्विन वैष्णव (रेल्वे व तंत्रज्ञान मंत्री)
  • 17-नुकताच आर्मेनिया देश CSTO ( Collective Security Treaty Orgnisation) करारातून बाहेर पडला आहे. हा करार कोणत्या वर्षी करण्यात आला ?
    • 1993
    • 1992
    • 1994
    • 1996
  • 1992
  • 18-देशातील सर्वात मोठा केबल ब्रिज सुदर्शन सेतू कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आला ?
    • राजस्थान
    • गुजरात
    • मध्य प्रदेश
    • हरियाणा
  • गुजरात मधील द्वारका येथे हा ब्रिज उभारण्यात आला. मोदी यांच्या हस्ते या ब्रिज चे उदघाटन करण्यात आले.
  • हा ब्रिज 4.77 किमी लांबीचा आहे आणि रुंदी 27.20 मीटर आहे
  • 979 कोटी रु खर्च करून हा ब्रिज उभारण्यात आला
  • 2017 पासून या ब्रिज च्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती
  • 19-महाराष्ट्राने कोणत्या देशासोबत मनुष्यबळ पुरवण्यासाठी करार केला आहे ?
    • फ्रांस
    • सौदी अरेबिया
    • जर्मनी
    • इटली
  • जर्मनी
  • 20-भारतात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे ?
    • आर अश्विन
    • रवींद्र जडेजा
    • हार्दिक पांड्या
    • यापैकी नाही
  • आर अश्विन
  • याने 351 विकेट्स घेऊन अनिल कुंबळे यांचा रिकोर्ड मोडला आहे
  • 21-खालीलपैकी कोणत्या राज्याने 1935 चा मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे ?
    • मेघालय
    • आसाम
    • राजस्थान
    • मध्य प्रदेश
  • आसाम
  • 22-महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाच्या रकमेत किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे ?
    • 13 हजार रु
    • 11 हजार रु
    • 10 हजार रु
    • 19 हजार रु
  • 10 हजार रु
  • 23- कोणत्या तारखेला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो ?
    • 22 फेब्रुवारी
    • 26 फेब्रुवारी
    • 27 फ्रेब्रुवारी
    • 28 फेब्रुवारी
  • 27 फेब्रुवारी
  • ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो
  • 24- खालीलपैकी कोणत्या देशात सामान्य व्यक्तीस गांजा लागवडीस कायदेशीर मान्यता नाही ?
    • जर्मनी
    • माल्टा
    • नेदरलँड
    • लक्झेबर्ग
  • नेदरलॅंड
  • नेदरलँड कायदेशीर मान्यता देण्यास उत्सुक आहे परंतु अजून कायदेशीर मान्यता दिली नाही
  • 25-महाराष्ट्राच्या 2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात किती रुपयांची राजकोषीय तूट सांगितली आहे ?
    • दीड लाख कोटी
    • दोन लाख कोटी
    • एक लाख कोटी
    • पाऊने दोन लाख कोटी
  • एक लाख कोटी
  • 26-महाराष्ट्राच्या 2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात महाराष्ट्राची महसुली तूट किती सांगितली आहे ?
    • 9734 कोटी
    • 9867 कोटी
    • 9756 कोटी
    • 9744 कोटी
  • 9734 कोटी
  • 27-2024 च्या महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पात जिल्हा वार्षिक योजनेसाठीच्या तरतुदीत किती टक्क्यांची वाढ केली आहे ?
    • 22 टक्के
    • 20 टक्के
    • 34 टक्के
    • 16 टक्के
  • 20 टक्के
  • 28-महाराष्ट्राच्या 2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किती कोटी डॉलर वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले ?
    • एक लाख कोटी डॉलर
    • दोन लाख कोटी डॉलर
    • तीन लाख कोटी डॉलर
    • चार लाख कोटी डॉलर
  • एक लाख कोटी डॉलर
  • 29-महाराष्ट्राच्या 2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यात किती नवीन वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ?
    • 11
    • 13
    • 15
    • 18
  • 11
  • 30-महाराष्ट्राच्या 2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्या शहरात नवीन एम्स रुग्णालय उभे करण्याची तरतूद करण्यात आली आहे ?
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • पुणे
    • नांदेड
  • पुणे
  • पुण्यातील औंध येथे ही संस्था उभारण्यात येणार आहे.
  • 31-महाराष्ट्रात 2030 पर्यंत किती टक्के ऊर्जा अपारंपारिक पद्धतीने निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ?
    • 30 टक्के
    • 22 टक्के
    • 40 टक्के
    • 65 टक्के
  • 40 टक्के
  • 32-महाराष्ट्राच्या 2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी सोयाबीन संशोधन व प्रक्रिया उपकेंद्र शासकीय महाविद्यालये आणि कृषि व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे ?
    • झिरेवाडी
    • पावडेवाडी
    • भावसार नगर
    • सेतुपुर
  • झिरेवाडी
  • 33-गगनयान मोहिमे अंतर्गत किती अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे ?
    • चार
    • तीन
    • दोन
    • एक
  • चार
  • नुकतीच त्या चार अंतराळवीरांची नावे घोषित करण्यात आली ती पुढील प्रमाणे सांगता येतील – प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण, शुभांशु शुक्ला यावर अधिक माहिती मिळवून नोट्स काढा व गगनयान मिशन पुन्हा एकदा वाचा
  • 34-सर्वात वयोवृद्ध खासदार शफीकुर रहमान यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या पक्षाचे खासदार होते ?
    • भाजपा
    • माकप
    • आप
    • समाजवादी
  • समाजवादी
  • वयाच्या 94 व्या वर्षी 27 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचे निधन झाले
  • ते लोकसभेत संभल (उत्तर प्रदेश) मतदार संघाचे नेतृत्व करत होते
  • ते चार वेळा आमदार व 5 वेळा खासदार राहिले आहेत
  • 35 – महाराष्ट्राच्या पुलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना गृह विभागाने दोन वर्षांची मुदत वाढ दिली आहे. त्यांचा कार्यकाळ ———- पर्यंत असेल.
    • 12 जानेवारी 2026
    • 3 जानेवारी 2026
    • 15 फेब्रुवारी 2026
    • 19 मार्च 2026
  • 3 जानेवारी 2026
  • रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पुलीस महासंचालक आहेत
  • 36-कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो ?
    • 23 फेब्रुवारी
    • 28 फेब्रुवारी
    • 26 फेब्रुवारी
    • यापैकी नाही
  • 28 फेब्रुवारी
  • 2024 ची थीम – विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान
  • 37-पहिला फ्रेंच चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी सुरू झाला ?
    • हैद्राबाद
    • कलकत्ता
    • जयपूर
    • पुणे
  • कलकत्ता
  • 38 – इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन च्या संख्येच्या बाबतीत अव्वल राज्य कोणते आहे ?
    • महाराष्ट्र
    • राजस्थान
    • कर्नाटक
    • मध्य प्रदेश
  • कर्नाटक
  • 39-कोणत्या देशाने पदसूरी-6 या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे ?
    • उत्तर कोरिया
    • दक्षिण कोरिया
    • इस्राईल
    • इराक
  • उत्तर कोरिया
  • जमिनीवरून समुद्रात मारा करणारे क्षेपणास्त्र
  • 40-कोणत्या राज्याने स्वयम योजना सुरू केली आहे ?
    • ओडिशा
    • राजस्थान
    • मेघालय
    • मिझोराम
  • ओडिशा
  • या योजनेअंतर्गत तरुणांना एक लाख रु पर्यंत चे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. वयोगट 18 ते 35
  • 41-नौदल सराव मिलन 2024 कोठे आयोजित केला जाणार आहे ?
    • हैद्राबाद
    • विशाखापट्टणम
    • नाशिक
    • मुंबई
  • विशाखापट्टणम
  • 42-दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे ?
    • शाहरुख खान
    • अजय देवगण
    • रवींद्र चॅटर्जी
    • अरुण गोडेकर
  • शाहरुख खान
  • जवान चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला
  • 43-100 टक्के घरगुती नळ जोडणी मिळवणारे पहिले ईशान्येकडील राज्य कोणते आहे ?
    • अरुणाचल प्रदेश
    • मेघालय
    • मिझोराम
    • सिक्कीम
  • अरुणाचल प्रदेश
  • 44-जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे बांधकाम कोणत्या नदीवर नुकतेच पूर्ण झाले आहे ?
    • रावी
    • सतलज
    • चिनाब
    • गोदावरी
  • चिनाब
  • हा पूल काश्मीर मध्ये आहे
  • उंची 359 मीटर व लांबी 1.315 किमी
  • 45-खालीलपैकी कोणत्या तारखेला केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा करण्यात येतो ?
    • 23 फेब्रुवारी
    • 28 फेब्रुवारी
    • 24 फेब्रुवारी
    • 21 फेब्रुवारी
  • 24 फेब्रुवारी
  • 46-आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होणारा माल्टा हा देश कितवा देश ठरला आहे ?
    • 100 वा
    • 118 वा
    • 114 वा
    • 119 वा
  • 119 वा
  • 47-भारताने कॉलराने प्रभावित असलेल्या कोणत्या देशाला मदत पुरवली आहे ?
    • दक्षिण आफ्रिका
    • झांबिया
    • नामीबिया
    • यापैकी नाही
  • झांबिया
  • 48- भारतातील सर्वात लांब वाहतूक बोगद्या चे नाव सांगा ?
    • T44
    • T50
    • T56
    • T51
  • T51
  • 12.77 किमी लांबीचा बोगदा
  • हा बोगदा जम्मू काश्मीर मध्ये आहे
  • 49-देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटर चे उदघाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
    • मेघालय
    • ओडिशा
    • मिझोराम
    • राजस्थान
  • ओडिशा
  • 50-कोणती कंपनी हनुमान AI लाँच करणार आहे ?
    • olx
    • reliance
    • flipkart
    • smartcard
  • reliance
  • 51-indus-x परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?
    • हैद्राबाद
    • मुंबई
    • वारंगल
    • नवी दिल्ली
  • नवी दिल्ली
  • 52-Dabbling in Diplomacy हे पुस्तक कोणी लिहिले ?
    • एस डी मुनी
    • किरण जैन
    • विकास भालेकर
    • मुकेश अडाणी
  • एस डी मुनी
  • 53-दोस्ती 16 सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला ?
    • नेपाळ
    • भारत
    • म्यानमार
    • मालदीव
  • मालदिव
  • भारत, श्रीलंका व मालदीव देशातील हा सराव आहे
  • द्विवार्षिक सराव आहे
  • सुरुवात 1991
  • 2012 साली यात श्रीलंकेचा समावेश करण्यात आला
  • 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हा सराव पार पडला
  • 54-sculpted stones mystries of mamallapuram या नावाचे पुस्तक कोणी लिहिले?
    • अश्विन प्रभू
    • रामचंद्र मेहता
    • केतकी पांडे
    • यापैकी नाही
  • अश्विन प्रभू
  • 55- नुकतेच मनोहर जोशी यांचे निधन झाले ते महाराष्ट्राचे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते ?
    • 8 व्या
    • 14 व्या
    • 12 व्या
    • 10 व्या
  • 12 व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते.
  • Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment