जनगणना 2011, janagananaa 2011 भारत. पुन्हा वाचण्याची गरज नाही

       भारताची जनगणना 2011 – bharaataachi janaganana 2011

 
        दर दहा वर्षानी भारताची जनगणना केली जाते. आयुक्त सी चंद्रमौळी यांच्या द्वारे 2011 ची जनगणना राष्ट्राला समर्पित करण्यात आली. 2011 च जनगणना ही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची 15 वी जनगणना आहे व स्वातंत्र्यानंतरची 7 वी जनगणना आहे. भारताची पहिली अधिकृत जनगणना लॉर्ड मेयो च्या काळात 1872 मध्ये करण्यात आली. भारताची नियमित साखळीची जनगणना 1881मध्ये करण्यात आली. 2011 ची जनगणना 28 राज्य व 7 केंद्रशासित परदेशात करण्यात आली. भारतातील विविध भागातून आकडेवारी एकत्रित करण्यात आली.    
 
        2011 च्या जनगणनेची जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली. 
  •   2011 च्या जनगणनेनुसार  भारताची लोकसंख्या 1. 247 अब्ज एवढी म्हणजेच शंभर कोटी च्या वर गेलेली आहे. (121 करोड)
  • 1 मे 2010 मध्ये  भारताच्या जनगणनेची सुरुवात करण्यात आली होती. 
  • भारताचे पहिले जनगणना आयुक्त हेनरी प्लाउडण हे होते. 
  • नियमाती शृंखलेची जनगणना 1881 मध्ये लॉर्ड रिपण च्या काळात करण्यात आली. 
  • भारताची एकूण जनसंख्या 121 कोटी आहे (2011 च्या जनगणने नुसार.)
  • जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17 टक्के जनसंख्या भारतात. राहते (एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळापैकी 2.25 टक्के जमीन भारताकडे आहे.)
  • भारतातील दशाकीय जन्म वृद्धीदर 18.14 करोड म्हणजेच 17.7 टक्के एवढा राहिला. 
  • भारताची पुरुष संख्या 62.31 करोड एवढी आहे व महिलांची संख्या 58.47 करोड एवढी आहे. 
  • भारताची घनता 382 प्रती चौ की,मी एवढी आहे. 
  • सर्वाधिक जनसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश तर सर्वात कमी जनसंख्या असलेल राज्य सिक्किम होय. 
  • सर्वाधिक लोकसंख्येचा  जिल्हा —विभाजनपूर्व ठाणे (महाराष्ट्रा)
  • सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा दिवांग वॅल्ही (अरुणाचल प्रदेश) 
  • भारताचे लिंग गुणोत्तर पुरुष : महिला –1000:943
  • सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश दिल्ली होय –1.67 करोड लोकसंख्या.
  • अरुणाचल प्रदेशातील कुरूंगकुमे जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या वृद्धी दिसून आली (111%)
  • नागालँड च्या लोंगलेंग जिल्ह्यात नकरार्थी लोकसंख्या वृद्धी दिसून आली (-58 %)
  • मिझोराम राज्यातील सेरच्श्चिप जिल्ह्यात सर्वात जास्त साक्षरता दर दिसून आला (98.76%)
  •  मध्ये प्रदेशातील अलीराजपुर या जिल्ह्यात देशातील सर्वात कमी साक्षरता दिसून आली. (37.22%). 
 
 
 
 

लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील पहिले दहा राज्य 

 

 

NO राज्य लोकसंख्या घनता
1 उत्तर प्रदेश 19.98 करोड 829
2 महाराष्ट्रा 11.24 करोड 365
3 बिहार 10.41 करोड 1106
4 पश्चिम बंगाल 9.13 करोड 1028
5 आंध्र प्रदेश 8.43 करोड 308
6 मध्ये प्रदेश 7.26 करोड 236
7 तमिळनाडू 7.21 करोड 555
8 राजस्थान 6.85 करोड 200
9 कर्नाटक 6.11 करोड 319
10 गुजरात 6.04 करोड 308
 
 

लोकसंखेच्या बाबतीत शेवटची दहा राज्य 

 
 
नो. राज्य लोकसंख्या घनता
1 गोवा 14,58,545 394
2 अरुणाचल प्रदेश 1,383,727 938
3 पद्दूचेरी 1,247,953 1037
4 मीझोराम 1,097,206 976
5 चंदिगढ 1,055,450 9,258
6 सिक्किम 610,577 86
7 अंदमान व निकोबर बेटे 380,581 46
8 दादरा आणि नगरहवेली 343,709 700
9 दमन व दीव 243,247 2,191
10 लक्षद्वीप 64,473 2,149
 
           वरील तक्त्यात लक्षद्वीप हा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात शेवटचे राज्य  आहे.  तर गोवा हा  लोकसंख्येच्या बाबतीत शेवटुन दहावे राज्य आहे. कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी.

           घनतेच्या बाबतीत भारतातील प्रथम दहा राज्य 

 
 
 
 
क्र राज्य घनता
1 दिल्ली 11320
2 चंदीगढ 9258
3 पाद्दूचेरी 2547
4 दमन व दीव 2191
5 लक्षद्वीप 2149
6 बिहार 1106
7 पश्चिम बंगाल 1028
8 केरळ 860
9 उत्तर प्रदेश 829
10 दादरा नगर हवेली 700
 
 

घनतेच्या बाबतीत भारतातील शेवटची दहा राज्य

 
 
क्र. राज्य घनता
1 छत्तीसगढ 189
2 मेघालय 132
3 मणीपुर 128
4 हिमाचल प्रदेश 123
5 नागालँड 119
6 सिक्किम 86
7 जम्मू व कश्मीर 56
8 मिझोराम 52
9 अंदमान व निकोबर बेट 46
10 अरुणाचल प्रदेश 17
 

लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील प्रथम दहा जिल्हे 

 
क्र जिल्हे लोकसंख्या
1 विभाजनपूर्व ठाणे (महाराष्ट्रा) 1.11 करोड
2 परगणा जिल्हा(प. बंगाल) 1 करोड
3 बंगळूर(कर्नाटक) 96.22 लाख
4 पुणे(महाराष्ट्रा) 94.29 लाख
5 मुंबई उपनगर(महाराष्ट्रा) 93.57 लाख
6 द.चोवीस परगणा(प. बंगाल) 81.62 लाख
7 बर्ध्वामान(प. बंगाल) 77.18 लाख
8 अहमदाबाद (गुजरात) 72.14 लाख
9 मुर्शिदाबाद(प. बंगाल) 71.04 लाख
10 जयपुर (राजस्थान) 66.26 लाख
 

लिंग गुणोत्तराच्या बाबतीत देशातील प्रथम दहा राज्य. 

 

 
क्र राज्य लिंग गुणोत्तर
1 केरळ 1084
2 पाददूचेरी 1037
3 तमिळनाडू 996
4 आंध्र प्रदेश 993
5 छत्तीसगड 991
6 मेघालय 989
7 मणीपुर 985
8 ओरिसा 979
9 मिझोराम 976
10 गोवा 973
 
 

लिंग गुणोत्तराच्या बाबतीत भारतातील शेवटची दहा राज्य 

 
क्र राज्य लिंग गुणोत्तर
1 उत्तर प्रदेश 912
2 पंजाब 895
3 सिक्किम 890
4 जम्मू आणि कश्मीर 889
5 हरियाणा 879
6 अंदमान व निकोबार 876
7 दिल्ली 868
8 चंदिगड 818
9 दादरा व नगरहवेली 774
10 दमन व दिव 618
 

लिंग गुणोत्तरच्या बाबतीत प्रथम दहा जिल्हे

 
क्र जिल्हे गुणोत्तर
1 माहे(पददूचेरी) 1184
2 अलमोरा(उत्तराखंड) 1139
3 कानूर(केरळ) 1136
4 पतनमतिटा(केरळ) 1132
5 रत्नागिरी(महाराष्ट्रा) 1122
6 रुद्रप्रयाग(उत्तराखंड) 1114
7 कोल्लम(केरळ) 1113
8 थ्रिसुर(केरळ) 1108
9 पौरिगरवाल(उत्तराखंड) 1103
10 अल्लापुझा(केरळ) 1103
 

लिंग गुणोत्तराच्या बाबतीत भारतातील शेवटची दहा जिल्हे

 

 

क्र जिल्हे गुणोत्तर
1 दमन(दमन दिव) 534
2 लेह(जम्मू व कश्मीर) 690
3 तवांग(अरुणाचल प्रदेश) 714
4 उत्तर सिक्किम 767
5 दादरा नगर हवेली 774
6 निकोबार 777
7 सूरत(गुजरात) 787
8 कारगिल (जम्मू व कश्मीर) 810
9 दिबोंग वॅल्ही(अरुणाचल प्रदेश) 813
10 चंदीगड 818
 

भारतातील साक्षरता दर

साक्षरतेच्या बाबतीत प्रथम राज्य 

  •         भारतातील केरळ हे राज्य भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य असून त्याची एकूण साक्षरता 93.91 टक्के एवढी आहे. त्याच्या पाठोपाठ लक्षद्वीप ची साक्षरता आहे आणि त्याची एकूण साक्षरता 92.28 एवढी आहे. 
  • साक्षरतेच्या बाबतीत प्रथम येणारी प्रथम दहा राज्य पुढीलप्रमाणे सांगता येतील. केरळ (93.91%), लक्षद्वीप (92.28%), मिझोराम(91.58%), त्रिपुरा(87.75%), गोवा(87.40%),  दमन दिव(87.07%), पडूचेरी (86.55%), चंदिगढ(86.34%), अंदमान निकोबार(86.27%)(86.43%),

साक्षरतेच्या बाबतीत शेवटची दहा राज्य 

  •    बिहार ———————————————- 63.82 टक्के 
  • तेलंगणा ———————————————–66.5 टक्के 
  • अरुणाचल प्रदेश ————————————-66.95 टक्के 
  • राजस्थान ———————————————67.06 टक्के 
  • आंध्र प्रदेश ——————————————–67.4 टक्के 
  • झारखंड ———————————————–67.63 टक्के 
  • जम्मू आणि कश्मीर————————————68.74 टक्के 
  • उत्तर प्रदेश———————————————69.72 टक्के 
  • मध्य प्रदेश ———————————————70.63 टक्के 
  • छत्तीसगड———————————————-71.04 टक्के 
 
 
 
 
 
 

साक्षरतेच्या बाबतीत भारतातील प्रथम दहा जिल्हे 

  1. सेराश्चिप (मिझोराम)————————-97.91 टक्के 
  2. ऐझवाल (मिझोराम)————————-97.89 टक्के 
  3. माहे (पद्दूचेरी )—————————–97.87 टक्के 
  4. कोट्टायम (केरळ)—————————-97.21टक्के
  5. पठाणमतीता(केरळ)————————96.55 टक्के 
  6. चांफाइ(मिझोराम)—————————95.91 टक्के 
  7. एरणाकुलम(केरळ)————————-95.89 टक्के 
  8. अल्लापुझा(केरळ)—————————95.72 टक्के 
  9. कानूर (केरळ)——————————-95.10 टक्के 
  10. थ्रिसुर (केरळ)——————————-95.08 टक्के     
 

 काही महत्वाचे मुद्दे

 
  • 2011 च्या जनगणनेचे आयुक्त चंद्रमौली हे होते. 
  • 2011 च्या जनगणनेनुसार भारताची घनता 382 चौ किमी एवढी होती. 2001 च्या जनगणनेनुसार भारताची घनता 325 प्रती  चौ किमी एवढी होती.  
  • भारतातील सर्वात जास्त घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची आहे ती एकूण 11297 प्रती चौ किमी एवढी आहे. तीच 2001 च्या जनगणने नुसार 9340 प्रती चौ किमी एवढी होती. 
  •  भारतातील सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश या राज्याची आहे ती 17 प्रती चौ किमी एवढी आहे तीच 2001 साली 13 प्रती चौ किमी एवढी होती. 
  • केवळ राज्याचा विचार करता बिहार या राज्याची घनता सर्वात जास्त आहे ती एकूण 1102 प्रती चौ किमी एवढी आहे.
  • केंद्रशासित प्रदेशाच्या विचार करता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची घनता सर्वात जास्त आहे. तर त्यापाठोपाठ चंदीगड, पद्दूचेरी, दमन व दिव, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, अंदमान व निकोबार बेटे यांचा क्रमांक लागतो. 
  • 2011 ची जनगणना ही भारताची 15 वी जनगणना होती व स्वातंत्र्यनंतरची 7 वी जनगणना होती. 
  • 2011 जनगणेला एकूण 2200 करोड एवढा खर्च आला. 
  • 2011 च्या जनगणनेनुसार भारताने 17.64 टक्के एवढी वृद्धी दर्शवली. 
  • जगाची लोकसंख्या 7 अब्ज एवढी आहे. 
  • सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळ ने दर्शवले आहे ते एकुण 1084 एवढी आहे. 
  • राज्याचा विचार करता सर्वात कमी लिंगगुणोत्तर हरियाणा चे होते ते एकूण 879 एवढे आहे. 
  • केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता पददूचेरी चे लिंग  गुणोत्तर सर्वात जास्त आहे ते एकूण 1037 एवढे आहे. 
  • 0 ते 6 या वयोगटातील लिंगगुणोत्तर सर्वात जास्त  मिझोराम या राज्याचे आहे. (971)
  • 0 त 6 या वयोगटातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणा या राज्याचे आहे.  (830.)
  • भारतातील पुरूषामधील साक्षरता 82.14 टक्के एवढी आहे तर महिला मधील साक्षरता 65.46 टक्के एवढी आहे. 
  • राज्यांचा विचार करता सर्वात जास्त साक्षरता केरळ (94 %) ची आहे तर सर्वात कमी साक्षरता बिहार (61.8%) ची आहे. 
  • केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला असता सर्वात जास्त साक्षरता पददूचेरीची आहे (91 टक्के). 
  • केवळ केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला असता सर्वात कमी सरक्षरता दादरा व नगर हवेली ची आहे (76.24 टक्के ).  
 

भारतातील लोकसंख्येचे धर्मनिहाय प्रमाण

धर्म टक्केवारी
हिंदू 79.8 टक्के
मुस्लिम 14.2 टक्के
ख्रिश्चन 2.3 टक्के
शीख 1.7 टक्के
बौद्ध 0.7 टक्के
जैन 0.4 टक्के
     
 

       2011 च्या जनगणने विषयी काही प्रश्न असल्यास खाली कमेंट करा किंवा आमच्या facebook  पेज द्वारे मेसेज करा. 

                            —–   धन्यवाद  ——

 
 
 
 
 
 

हे पण वाचा

महाराष्ट्रातील महामार्गाचे नवीन क्रमांक

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment